एक्स्प्लोर

Astrology : आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; कुंभसह 5 राशींना लाभच लाभ, मिळणार मोठं सरप्राईझ

Panchang 28 October 2024 : आज रविवारचा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे, या दिवशी ब्रम्ह योग निर्माण झाल्याने याचा सर्वाधिक लाभ 5 राशींना होणार आहे. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

Astrology Panchang 28 October 2024 : आज सोमवार, 28 ऑक्टोबर रोजी चंद्र कन्या राशीत जाणार आहे, त्यामुळे चंद्र आणि गुरू एकमेकांपासून केंद्रस्थानी असल्यामुळे गजकेसरी योग तयार होत आहे. तसेच आज कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी असून या तिथीला रमा एकादशीचे व्रत केले जाणार आहे. रमा एकादशी व्रताच्या दिवशी गजकेसरी योग, ब्रह्मयोग आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना (Zodiac Signs) या शुभ योगांचा फायदा होणार आहे, या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

मेष रास (Aries)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा म्हणजे रमा एकादशी दिवस शुभ असणार आहे. मेष राशीच्या लोकांना आज काही जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही दैनंदिन कामातून पूजेसाठी वेळ काढाल. आज नोकरी करणाऱ्यांना ऑफिसमधून दिवाळी भेट किंवा सुट्टी मिळू शकते, ज्यामुळे ते खूप आनंदी दिसतील. त्याच वेळी, आज व्यावसायिक आपली धोरणं बदलतील, ज्यामुळे त्यांना अधिक पैसे कमवण्याची संधी मिळेल. कुटुंबात दिवाळीच्या सणाची तयारी सुरू राहील आणि घर सजवण्याचं काम पूर्ण होईल. संध्याकाळी आपण कुटुंबातील सदस्यांसाठी काही खरेदी करू शकता, ज्यामुळे प्रत्येकजण खूप आनंदी दिसेल.

कर्क रास (Cancer)

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा म्हणजे रमा एकादशी व्रताचा दिवस खूप चांगला असणार आहे. कर्क राशीचे लोक आज त्यांच्या कामात समाधानी दिसतील आणि ते त्यांच्या जोडीदारासह घरातील खरेदीसाठी देखील जाऊ शकतात. काल केलेली गुंतवणूक तुम्हाला भविष्यात अनुकूल परतावा देईल आणि तुमच्या जीवनात सकारात्मक बदल अनुभवेल. अविवाहित लोकांसाठी आज चांगलं स्थळ येऊ शकतं. स्वत:चा व्यवसाय करणाऱ्यांना आज त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांकडून कठीण स्पर्धेला सामोरं जावं लागेल आणि चांगला नफा मिळवण्यातही ते यशस्वी होतील. कुटुंबातील कोणताही सदस्य घरापासून दूर राहत असेल तर तो आज दिवाळीच्या सुट्टीत घरी परतू शकतो. संध्याकाळी घरात हशा आणि मस्तीचं वातावरण असेल.

सिंह रास (Leo)

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा असणार आहे. महादेवाच्या कृपेने आज तुमच्या सुखसोयींमध्ये वाढ होईल आणि तुमच्या बँक बॅलन्समध्ये चांगली वाढ होईल. जर तुमचा पैसा एखाद्या नातेवाईकाकडे अडकला असेल तर तो आज परत मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे नातेसंबंधही सुधारतील. दुकानदार आणि व्यावसायिक आज संपूर्ण दिवस व्यस्त राहतील आणि चांगला नफा मिळाल्याने आनंदी राहतील. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात काही समस्या चालू असतील तर आज त्या संपताना दिसतील आणि परस्पर संबंध मजबूत होतील. संध्याकाळ घरातील लहान मुलांसोबत मस्ती करत व्यतित होईल.

मकर रास (Capricorn)

आजचा दिवस मकर राशीच्या लोकांसाठी रोमांचक असणार आहे. आजची सकाळ मकर राशीच्या लोकांसाठी खूप खास असणार आहे कारण आज सकाळपासून तुम्हाला अनेक चांगल्या बातम्या मिळतील, ज्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल आणि तुमचा आत्मविश्वासही वाढेल. लव्ह लाईफमधील लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल, ते आपल्या जोडीदाराची त्यांच्या कुटुंबातील सदस्यांशी ओळख करून देऊ शकतात, ज्यामुळे तुमच्या नात्याला मान्यता मिळेल आणि लवकरच लग्नाची सनई वाजेल. स्वत:चा व्यवसाय करणारे आज चांगला नफा कमावतील. या राशीचे जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना आज या दिशेने यश मिळेल. संध्याकाळचा वेळ कुटुंबातील सदस्यांसोबत महत्त्वाच्या चर्चेत घालवाल.

कुंभ रास (Aquarius)

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विशेष फलदायी असणार आहे. कुंभ राशीच्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती आज मजबूत असेल, त्यामुळे आरोग्य देखील चांगले राहील. आज तुम्ही वेगाने पैसे कमवू शकाल, ज्यामुळे तुम्हाला जुन्या कर्जापासून मुक्ती मिळेल आणि तुम्ही स्वतःसाठी वाहने किंवा तंत्रज्ञानाशी संबंधित गोष्टी खरेदी करू शकता. तुम्ही सामाजिक आणि धार्मिक कार्यात सहभागी व्हाल, ज्यामुळे तुम्हाला शांती मिळेल आणि तुमचा आदरही वाढेल. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांना आज चांगला नफा मिळेल आणि ते आपापल्या क्षेत्रात नवीन मापदंड प्रस्थापित करू शकतील. कुटुंबातील सर्व सदस्य एकमेकांना कामात मदत करतील आणि वडिलधाऱ्यांसोबत कोणत्याही कार्याबद्दल चर्चा करू शकतात. संध्याकाळी तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत काही धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Horoscope Today 28 October 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sameer Bhujbal vs Suhas Kande : समीर भुजबळांच्या सभेत भाषण, कार्यकर्त्यास सुहास कांदेंकडून शिवीगाळ? भरसभेत कॉल रेकॉर्डिंग ऐकवल्यानं खळबळ
समीर भुजबळांच्या सभेत भाषण, कार्यकर्त्यास सुहास कांदेंकडून शिवीगाळ? भरसभेत कॉल रेकॉर्डिंग ऐकवल्यानं खळबळ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 ऑक्टोबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 ऑक्टोबर 2024 | सोमवार
Maharashtra Assembly Elections 2024 : मोठी बातमी : उद्धव ठाकरेंना जबर धक्का, जाहीर केलेला उमेदवार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार!
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंना जबर धक्का, जाहीर केलेला उमेदवार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार!
Maharashtra Assembly Consituency 2024 : विधानसभेची खडाजंगी : येवला मतदारसंघाचा गड छगन भुजबळ राखणार की परिवर्तन होणार?
विधानसभेची खडाजंगी : येवला मतदारसंघाचा गड छगन भुजबळ राखणार की परिवर्तन होणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shrinivas Pawar on Ajit Pawar : अजितदादांचा शब्द अन् शब्द खोटा ठरवला, सख्खा भाऊ भडकलाSada Sarvankar on Amit Thackeray : अमित ठाकरेंसाठी राज ठाकरेंचा फोन आला?सरवणकर म्हणतात..Ajit Pawar emotional : डोळ्याच्या कडा ओल्या, आवंढा गिळला, शब्द फुटेना, दादा भर सभेत भावूकEknath Shinde Thane Rally : अर्ज भरण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांचं ठाण्यात जोरदार शक्तिप्रदर्शन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sameer Bhujbal vs Suhas Kande : समीर भुजबळांच्या सभेत भाषण, कार्यकर्त्यास सुहास कांदेंकडून शिवीगाळ? भरसभेत कॉल रेकॉर्डिंग ऐकवल्यानं खळबळ
समीर भुजबळांच्या सभेत भाषण, कार्यकर्त्यास सुहास कांदेंकडून शिवीगाळ? भरसभेत कॉल रेकॉर्डिंग ऐकवल्यानं खळबळ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 ऑक्टोबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 ऑक्टोबर 2024 | सोमवार
Maharashtra Assembly Elections 2024 : मोठी बातमी : उद्धव ठाकरेंना जबर धक्का, जाहीर केलेला उमेदवार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार!
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंना जबर धक्का, जाहीर केलेला उमेदवार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार!
Maharashtra Assembly Consituency 2024 : विधानसभेची खडाजंगी : येवला मतदारसंघाचा गड छगन भुजबळ राखणार की परिवर्तन होणार?
विधानसभेची खडाजंगी : येवला मतदारसंघाचा गड छगन भुजबळ राखणार की परिवर्तन होणार?
Sameer Bhujbal : ...म्हणून मी नांदगाव मतदारसंघात आलोय, समीर भुजबळांनी सांगितलं सुहास कांदेंविरोधात अपक्ष लढण्याचं कारण
...म्हणून मी नांदगाव मतदारसंघात आलोय, समीर भुजबळांनी सांगितलं सुहास कांदेंविरोधात अपक्ष लढण्याचं कारण
अनिल देशमुखांनी लेकास उतरवलं मैदानात, सलील देशमुखांनी भरला अर्ज, तरीही म्हणाले, मी मंत्री होणार
अनिल देशमुखांनी लेकास उतरवलं मैदानात, सलील देशमुखांनी भरला अर्ज, तरीही म्हणाले, मी मंत्री होणार
Kolhapur Uttar Vidhan Sabha :माजी नगरसेवकांच्या 'हात'घाईने मिळालेलं उत्तर धर्मसंकटात! कोल्हापूर उत्तरमध्ये थेट उमेदवार बदलाची चर्चा; आता मधुरिमाराजे रिंगणात?
माजी नगरसेवकांच्या 'हात'घाईने मिळालेलं उत्तर धर्मसंकटात! कोल्हापूर उत्तरमध्ये थेट उमेदवार बदलाची चर्चा; आता मधुरिमाराजे रिंगणात?
Vasant Deshmukh : मोठी बातमी : जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुखांना जामीन मंजूर, 24 तासांत सुटका
मोठी बातमी : जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुखांना जामीन मंजूर, 24 तासांत सुटका
Embed widget