एक्स्प्लोर

Horoscope Today 28 October 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 28 October 2024 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...

Horoscope Today 28 October 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Today Horoscope) 

ज्यांना नुकतीच नवीन नोकरी मिळाली आहे, त्यांनी सतत रजा घेऊ नका. अन्यथा, तुमच्या नोकरीवरही परिणाम होऊ शकतो आणि तुमच्या ऑफिसमध्ये तुमची प्रतिष्ठा खराब होऊ शकते. व्यापारी वर्गाने खूप मेहनत केली तर ते डील मिळवू शकतात ज्यासाठी ते बरेच दिवस प्रयत्न करत होते. बाहेरील व्यक्ती तरुणांचे मन दुखवू शकते, म्हणून तुम्ही कोणाचेही बोलणे मनावर घेऊ नका. अन्यथा तुम्हाला मानसिक तणावाचाही सामना करावा लागू शकतो. आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. जास्त कामामुळे तुम्हाला अशक्तपणा जाणवू शकतो, त्यामुळे तुमची प्रकृतीही बिघडेल. 

वृषभ रास (Taurus Today Horoscope)

नोकरीच्या ठिकाणी काम करताना थोडा गोंधळ होईल. तुमच्या वरिष्ठांचा सल्ला घ्या, कारण तुम्ही जितक्या लवकर तुमच्या वरिष्ठांचा सल्ला घ्याल तितक्या लवकर तुमचे काम पूर्ण होईल. जे लोक आपला वडिलोपार्जित व्यवसाय चालवतात त्यांनी आपल्या वडिलांच्या सल्ल्यानेच पुढे जावे, तरच तुमचा व्यवसाय चांगला चालेल. मज्जासंस्थेशी संबंधित काही समस्या आज देऊ शकतात, जर तुम्हाला जुनाट समस्या असेल तर तुम्हाला  आराम मिळेल. 

मिथुन रास (Gemini Today Horoscope)

जे बँकिंग क्षेत्राशी निगडीत आहेत ते त्यांच्या कामाच्या ठिकाणी त्यांच्या पदोन्नतीबद्दल बोलू शकतात आणि तुमचे वरिष्ठ  तुमच्यावर खूश होऊन तुम्हाला बढती देऊ शकतात. व्यवसायात काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील आणि तुम्ही भागीदारीत कोणताही व्यवसाय करत असाल तर तुमच्या पार्टनरच्या सल्ल्याशिवाय कोणतेही काम करू नका. आपले कौशल्य अद्ययावत करण्याचे नियोजन केले पाहिजे. तरच तुम्ही तुमच्या करिअरमध्ये पुढे जाऊ शकता.  तुमच्या डोळ्यांची थोडी काळजी घ्या, कारण तुम्हाला डोळ्यात पाणी येणे किंवा जळजळ होणे इत्यादीमुळे खूप त्रास होऊ शकतो.

कर्क रास (Cancer Today Horoscope)

तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली करण्यासाठी तसेच कामात दिवस चांगला जाण्यासाठी देवाची पूजा आराधना करा. आज कोणताही आडपर्दा न ठेवता सगळे एकत्र काम करताना दिसतील. त्यामुळे व्यवसाय देखील चांगला चालेल. पैसे कमावण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत आहात खासकरून सोशल मीडियाचा वापर करत असाल तर त्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल. आज तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. वातावरण बदलाचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे लाईट आहारच घ्या. 

सिंह रास (Leo Today Horoscope)

नोकरदार वर्गाबद्दल बोलायचं झाल्यास, तुम्ही केलेल्या कामाचा आज तुम्हाला लाभ मिळेल. अचानक धनलाभ होईल. व्यवसायासाठी किंवा नवीन प्रोजेक्टसाठी तुम्ही तुमची जी काही जमापुंजी साठवली होती ती आज खर्च होऊ शकते. आज तुम्ही जे कोणतेही प्लॅन करत असाल ते नीट विचार करूनच करा. तरच तुम्हाला त्यात यश येईल. जर तुम्ही यात्रा करण्याचा विचार करत असाल तर तुमचा प्रवास सुखाचा होईल. फक्त मनात भीती ठेवू नका. 

कन्या रास (Virgo Today Horoscope)

जर तुम्हाला तुम्ही ठरवलेलं ध्येय गाठायचं असेल तर त्यासाठी आजपासूनच तयारीला लागा. तरच तुम्हाला यश मिळेल. व्यापारी वर्गाने एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की तुम्हाला ग्राहकांच्या मागणीनुसार व्यवसायात बदल करायला हवा. तरच तुमचा व्यवसाय चांगला चालेल. जे तरूण मोठमोठ्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करतायत  त्यांनी आपल्या कामावर लक्ष देणं गरजेचं आहे. आज तुमची तब्येत सामान्य असणार आहे. तुम्हाला कोणत्याच गोष्टीचा त्रास होणार नाही. फक्त तुमची औषधं वेळेवर घ्या. 

तूळ (Libra Today Horoscope) 

तूळ राशीच्या लोकांची अनेक सरकारी कामं आज पूर्ण होतील आणि कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला सरकारी नोकरीही मिळू शकते. तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत काही मालमत्ता आणि जमिनीत गुंतवणूक करण्याची संधी मिळेल आणि अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपासून कुटुंबातील वातावरण बिघडलं असेल तर ते आज ठीक होईल आणि घरातील लहान मुलं दिवाळीत मस्ती करताना दिसतील. व्यवसाय करणाऱ्यांना आज चांगला नफा मिळेल आणि तुमच्या संपत्तीत चांगली वाढ होईल. संध्याकाळची वेळ एखाद्या धार्मिक स्थळी, मंदिरात वैगरे घालवाल.

वृश्चिक ( Scorpio Today Horoscope)  

वृश्चिक राशीचे लोक आज आपल्या मेहनतीचं फळ न मिळाल्याने नाराज होतील. दिवसाचा सुरुवात शांततेत जाईल, पण त्यानंतरचा दिवस अनावश्यक धावपळीने भरलेला असेल. अनिष्ट कामात वेळ वाया जाईल. खर्चावर नियंत्रण ठेवा, अन्यथा कर्ज घेण्याची परिस्थिती उद्भवू शकते. आज तुमची उधारी वर्तणूक मर्यादित ठेवा, अन्यथा तुम्ही पैशाशी संबंधित समस्यांमध्ये अडकाल. आर्थिक कारणांमुळे कुटुंबातील कोणाशी मतभेद होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक सदस्याच्या तब्येतीची तुम्हाला काळजी वाटेल. संध्याकाळी मंदिरात वैगरे धार्मिक स्थळी गेल्याने मानसिक शांती मिळेल.

धनु (Sagittarius Today Horoscope)

धनु राशीचे लोक आज सकाळपासूनच शुभ कार्यक्रमात सहभाग घेतील. घरापासून दूर राहणारा कुटुंबातील सदस्य दिवाळीच्या निमित्ताने घरी येऊ शकतो. दिवाळीमुळे अनेक पदार्थ आणि मिठाई घरोघरी तयार होणार असून सजावटीचं कामही सुरू राहणार आहे. नोकरीत असलेल्यांना त्यांच्या सहकाऱ्यांचं पूर्ण सहकार्य मिळेल आणि त्यांच्या मदतीने नवीन प्रकल्पांवर काम करता येईल. दिवाळीच्या खरेदीबाबत व्यवसायांची चांगली विक्री होईल. भावांसोबत सुरू असलेले मतभेद मिटतील आणि मित्रांसोबत धार्मिक स्थळी जाण्याचाही बेत असेल.

मकर (Capricorn Today Horoscope)

मकर राशीच्या लोकांसाठी सोमवार थोडासा चांगला ठरेल. दिवसाची सुरुवात अस्वस्थतेने होईल, नुकसानीच्या भीतीमुळे कोणतंही काम लवकर करावंसं वाटणार नाही. घरामध्ये काही समस्या निर्माण होतील, त्यामुळे धावपळ करण्याची परिस्थिती निर्माण होईल. आज नोकरी व्यवसायात जोखीम घेणं टाळा, समाधानी वृत्ती अंगीकारा. सहकारी समोरून चांगले असतील, पण मागून त्रास देऊ शकतात. कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम असेल आणि ते एकमेकांना मदत करण्यास तयार असतील. संध्याकाळी तुम्ही मुलांसोबत दिवाळीच्या खरेदीच्या मूडमध्ये असाल.

कुंभ (Aquarius Today Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र परिणाम देणारा असेल. तुम्ही कधी आनंदी, तर कधी उत्साही दिसाल. आज सकाळपासूनच व्यावसायिकांना पैशाची चिंता असेल, पण हळूहळू उत्पादनाची चांगली विक्रीही होईल. पूर्वनियोजित कामातून कमी फायदा होईल आणि चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करण्याची संधीही मिळेल. नोकरदारांनी स्वतःच्या व्यवसायात लक्ष द्यावं आणि कोणत्याही वादापासून दूर राहावं. कुटुंबातील एखाद्याच्या असभ्य वर्तनामुळे शांतिचं वातावरण अचानक बिघडेल. सायंकाळनंतर तब्येत बिघडू शकते.

मीन (Pisces Today Horoscope)

मीन राशीच्या लोकांसाठी सोमवारचा दिवस सामान्य राहणार आहे. घरातील वडीलधाऱ्यांच्या किंवा ज्येष्ठ नागरिकांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा तुम्हाला नंतर पश्चाताप करावा लागू शकतो. नोकरदार लोकांवर आज कामाचा ताण जास्त असेल आणि ऑफिसकडून दिवाळी भेट मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना आज नशिबाच्या पाठिंब्याने इतर अधिक लाभाच्या संधी मिळतील. तुमच्या कामातील दिरंगाईमुळे कुटुंबातील सदस्य नाराज होतील. मुलांच्या काही कामामुळे धावपळ होण्याची परिस्थिती निर्माण होईल, तब्येतीचीही पूर्ण काळजी घ्या.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Weekly Horoscope : लक्ष्मी नारायण राजयोगाने होणार आठवड्याची सुरुवात; 5 राशी जगणार राजासारखं जीवन, ऐन दिवाळीत लाभणार लक्ष्मीची कृपा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 07 PM 19 January 2024Maha kumbha IIT Baba : आयआयटी शिकलेला अभय सिंग का बनला संन्यासी? बाबा माझावर EXCLUSIVEMaha kumbha Time Baba : कुंभमेळ्यात घडीवाले बाबांची चर्चा, हातात आणि पायात घड्याळच घड्याळABP Majha Marathi News Headlines 06PM TOP Headlines 06 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget