Astrology : आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मिथुनसह 5 राशी जगणार राजासारखं जीवन, श्रीकृष्णाच्या कृपेने होणार अपार धनलाभ
Panchang 27 August 2024 : आज मंगळवारचा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे, याचा 5 राशींना सर्वाधिक लाभ होणार आहे. आज दहीहंडीच्या दिवशी वृषभसह 5 राशींवर श्रीकृष्णाची विशेष कृपा राहील. आजच्या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
Dahi Handi 2024 Shubh Yog : आज दहीहंडीला (Dahi Handi 2024) ग्रहांचा सेनापती मंगळ दुपारी 3.40 वाजता मिथुन राशीत प्रवेश करेल. ज्योतिषशास्त्रात मंगळ हा धैर्य, शौर्य आणि उत्साहाचं प्रतीक मानला जातो. मंगळाच्या राशी बदलाचा परिणाम देश आणि जगावर पडेल. आज बनत असलेल्या गजकेसरी योग आणि सर्वार्थ सिद्धी योगाच्या प्रभावामुळे 5 राशींना प्रत्येक कामात यश मिळेल. श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने त्यांचं जीवन आनंदाने भरून जाईल. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
वृषभ रास (Taurus)
दहीहंडीच्या शुभ मुहूर्तावर तयार झालेला गजकेसरी योग तुमच्या जीवनात समृद्धी आणि आनंद घेऊन येईल. तुमच्याकडे आज पैसे मिळवण्याची शुभ संधी आहे आणि तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रचंड फायदेही मिळतील. अनेक उत्तम संधी तुमच्या वाट्याला येऊ शकतात आणि तुम्हाला व्यवसायातही चांगलं उत्पन्न मिळेल. तुमची एखादी इच्छा बऱ्याच दिवसांपासून अपूर्ण राहिली असेल तर ती यावेळी पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुमच्या योजनांची कोणाशीही चर्चा करू नका आणि तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा.
मिथुन रास (Gemini)
दहीहंडीच्या दिवशी तयार झालेल्या शुभ योगामुळे तुम्हाला आर्थिक बाबतीत प्रचंड लाभ होईल. जमीन आणि मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या कामासाठी हा काळ अतिशय अनुकूल आहे. न्यायालयीन खटल्यांमध्येही निर्णय तुमच्या बाजूने येण्याचे संकेत आहेत. तुम्हाला तुमच्या व्यावसायिक जीवनात अनेक बदलांना सामोरं जावं लागेल, जे तुमच्या आयुष्यात यश मिळवून देईल. जर तुम्ही खूप दिवसांपासून परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी शुभ असू शकतो. वेळेचा सदुपयोग करा.
सिंह रास (Leo)
सिंह राशीच्या लोकांसाठी मंगळ संक्रमणाचा प्रभाव वरदानापेक्षा कमी नाही. तुम्हाला जे हवं आहे ते मिळवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चांगले संबंध निर्माण होतील. नोकरीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. सामाजिक जबाबदाऱ्या वाढतील. मोठ्या भावांसोबत मतभेद वाढू देऊ नका. जर तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये काही बदल करायचा असेल तर तुम्ही यावेळी हा धोका पत्करू शकता. तुमच्या यशाची शक्यता लक्षणीय वाढली आहे.
वृश्चिक रास (Scorpio)
दहीहंडीला होत असलेलं मंगळाचं संक्रमण वृश्चिक राशीच्या लोकांना उत्तम यश मिळवून देईल. जर तुम्हाला काही मोठं काम सुरू करायचं असेल तर त्या दृष्टीने ग्रहांचे परिणाम अनुकूल असतील. न्यायालयीन प्रकरणातील निर्णय तुमच्या बाजूने जाण्याचे संकेत आहेत. परदेशी नागरिकत्वासाठी केलेले प्रयत्नही यशस्वी होतील. मित्र आणि नातेवाईकांकडूनही तुम्हाला चांगली बातमी मिळेल. आरोग्याची काळजी घ्या आणि बाहेरचं खाणं टाळा.
कुंभ रास (Aquarius)
कुंभ राशीच्या लोकांना करिअरच्या दृष्टीने अनपेक्षित परिणाम मिळतील. परीक्षेत चांगले गुण मिळाल्यास विद्यार्थी आणि स्पर्धांची तयारी करणाऱ्यांचा आनंद द्विगुणित होईल. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. वरिष्ठांचं सहकार्यही मिळेल. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य आणि मोठ्या भावांपासून विभक्त होऊ नका. मुलांच्या सुख-सुविधांची पूर्तता होईल. नवविवाहित जोडप्याला मूल होण्याची शक्यता आहे. कुंभ राशीच्या लोकांना श्रीकृष्णाचा आशीर्वाद लाभेल आणि त्यांच्या जीवनात सुख-समृद्धी नांदेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :