एक्स्प्लोर

Astrology : आज ब्रह्म योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 5 राशींची चांदी, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले

Panchang 22 November 2024 : आज शुक्रवारचा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे, या दिवशी ब्रह्म योग निर्माण झाल्याने याचा सर्वाधिक लाभ 5 राशींना होणार आहे. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

Astrology Panchang 22 November 2024 : आज शुक्रवार, 22 नोव्हेंबर रोजी चंद्र सिंह राशीत प्रवेश करणार आहे. तसेच आज मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील सप्तमी तिथी असून या दिवशी ब्रह्मयोग, रवियोग आणि आश्लेषा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना (Zodiac Signs) या शुभ योगांचा फायदा होणार आहे, या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

आज शुक्रवार, 22 नोव्हेंबर रोजी चंद्र सिंह राशीत प्रवेश करणार आहे. तसेच आज मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील सप्तमी तिथी असून या दिवशी ब्रह्मयोग, रवियोग आणि आश्लेषा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना (Zodiac Signs) या शुभ योगांचा फायदा होणार आहे, या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया. 

मेष रास (Aries Horoscope Today)

आजचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरणार आहे. मेष राशीचे लोक आज नवीन मित्र आणि सहकारी बनवतील. आर्थिक बाबतीत बोलायचं झालं तर, आज तुमचं काम पैशामुळे अडकणार नाही. आज तुम्ही ऑनलाइन शॉपिंग देखील करू शकाल आणि पैसे देखील वाचवू शकाल. आज व्यावसायिकांना चांगला नफा मिळेल आणि तुमचा दैनंदिन खर्च सहज निघेल. भाड्याने राहणाऱ्या लोकांना नशिबाने साथ दिली तर त्यांचं स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न आज पूर्ण होऊ शकतं.

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. सिंह राशीच्या लोकांना आज त्यांच्या प्रयत्नांमध्ये यश मिळेल . आर्थिक बाबतीत बोलायचं झालं तर, आज देवी लक्ष्मीच्या कृपेने तुम्ही बचत करू शकाल तसेच पुरेसे पैसे कमवू शकाल आणि तुमचं लक्ष घरगुती गरजांवरही केंद्रित असेल. आज तुम्हाला तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी आणि नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी अनेक उत्तम कल्पना मिळू शकतात.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. वृश्चिक राशीच्या लोकांना आज सकाळपासून एकामागून एक अनेक चांगल्या बातम्या मिळतील, ज्यामुळे ते आनंदी दिसतील. तुम्हाला चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करण्याची संधी देखील मिळेल, ज्यामुळे भविष्यात चांगला नफा मिळेल. जर तुम्ही न्यायालयीन प्रकरणांमध्ये अडकले असाल, तर आज निर्णय तुमच्या बाजूने येण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना आज करिअरमध्ये प्रगतीची चांगली संधी मिळेल पण गाफील राहू नका.

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

आजचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी खूप खास असणार आहे. आर्थिक बाबतीत बोलायचं झालं तर, आज तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतील आणि तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून चांगला नफाही मिळेल. विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घ्यायचं असेल तर आजचा दिवस त्यांच्यासाठी चांगला असेल आणि त्यांची परदेशात जाण्याची इच्छाही पूर्ण होईल. आज ऑफिसमध्ये सर्वांशी चांगले संबंध राहतील, त्यामुळे हशा-मस्तीचं वातावरण असेल आणि वेळेवर काम पूर्ण होईल. तुम्ही संध्याकाळी मुलांसोबत काही खरेदीसाठी देखील जाऊ शकता.

मकर रास (Capricorn Horoscope Today)

आजचा दिवस मकर राशीच्या लोकांसाठी आशेचा नवीन किरण घेऊन आला आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करावं लागेल, तरच त्यांना परीक्षेत यश मिळू शकेल. कौटुंबिक व्यवसाय चालवणारे आज व्यवसायात काही नवीन तंत्रज्ञान स्वीकारतील, ज्याचा भविष्यात फायदा होईल. पैशामुळे जी काही कामं अडकली होती ती आज देवी लक्ष्मीच्या कृपेने सहज पूर्ण होतील. आज तुम्ही चैनीच्या वस्तूंवर चांगला पैसा खर्च कराल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Shukra Gochar 2024 : 22 डिसेंबरपासून 'या' राशींना सोन्याचे दिवस; शुक्राचं राशी परिवर्तन ठरणार लकी, सुख-संपत्ती होणार अपार वाढ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पोलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पोलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पोलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पोलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
Maharashtra Vidhan Sabha Exit Poll 2024: महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकालाची शक्यता, राज्यातील या 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकाल? राज्यातील 'या' 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
Embed widget