Astrology : आज सौभाग्य योगासह जुळून आले अनेक शुभ योग; कुंभसह 'या' 5 राशींचं नशीब पालटणार, होणार लाभच लाभ
Panchang 2 June 2024 : आज रविवारचा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे, याचा 5 राशींना सर्वाधिक लाभ होणार आहे. या 5 राशींवर आज लक्ष्मीची कृपा राहील, आजचा दिवस लाभाचा असेल. आजच्या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

Panchang 2 June 2024 : ग्रहांच्या स्थितीनुसार, आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. आज, रविवार, 2 जूनला चंद्र मेष राशीत प्रवेश करणार आहे. तसेच आज वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी असून या तिथीला अपरा एकादशीचं व्रत केलं जातं. अपरा एकादशीच्या दिवशी आयुष्मान योग, सौभाग्य योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि रेवती नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचं महत्त्व वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार 5 राशींना आज बनत असलेल्या शुभ योगांचा लाभ मिळेल. या भाग्यवान राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मिथुन रास (Gemini)
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ आणि फलदायी असणार आहे. मिथुन राशीचे लोक आज रविवारच्या सुट्टीचा पुरेपूर आनंद घेतील. तुमच्या कौटुंबिक नात्यांमध्ये काही दुरावा निर्माण होत असेल तर आज तुम्ही संवादातून तो दूर होईल. व्यापारी आज चांगला नफा कमावतील आणि नवीन व्यवसायात गुंतवणूक करण्यासही तयार होतील. तुम्ही मित्रांसोबत मजा करण्याच्या मूडमध्ये असाल आणि कुठेतरी जाण्याची किंवा चित्रपट पाहण्याची योजना कराल. अविवाहित लोक आज एखाद्या खास व्यक्तीला भेटू शकतात. वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं तर, तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी काही नवीन दागिने, भेटवस्तू इत्यादी आणू शकता, ज्यामुळे नातं आणखी मजबूत होईल.
कन्या रास (Virgo)
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. आज कन्या राशीचे लोक त्यांच्या विचारसरणीने लोकांना आकर्षित करण्यात यशस्वी होतील. रविवारच्या सुट्टीमुळे घरात लहान मुलांचा कल्लोळ असेल आणि तुम्ही कुटुंबासोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा बेतही कराल. तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ असेल. नोकरी करणारे लोक सध्याची कंपनी सोडून नोकरीचे नवीन पर्याय शोधू शकतात, ज्यात तुमचे मित्र तुम्हाला मदत करतील. आज तुमच्या सर्व समस्या दूर होतील. वैवाहिक जीवनाविषयी बोलायचं झाल्यास, तुमच्या जोडीदारासोबत तुमचं नातं मजबूत राहील, जरी काही नाराजी असली तरी प्रेम वाढेल.
वृश्चिक रास (Scorpio)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप खास असणार आहे. आज तुमची प्रतिमाही सुधारेल. आज रविवारच्या सुट्टीमुळे व्यावसायिकांना त्यांच्या क्षेत्रात भरपूर पैसे कमावण्याची संधी मिळेल, यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील आणि भाऊ-बहिणीच्या सहकार्याने घरातील प्रलंबित कामं पूर्ण होतील. तुमच्याकडे प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्याची क्षमता असेल. जर तुमच्या वडिलांशी तुमचे काही वाद चालू असेल तर ते आज संपतील आणि त्यांचा सल्ला तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना आज चांगला नफा मिळेल आणि त्यांचा व्यवसाय वाढवता येईल.
धनु रास (Sagittarius)
आजचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी चांगला असणार आहे. धनु राशीच्या लोकांना आज नशिबाने साथ दिल्यास त्यांचे अडकलेले पैसे परत मिळतील. ज्यांना फिरायला, शिक्षण किंवा नोकरीसाठी परदेशात जायचं आहे त्यांना आज या बाबतीत चांगली बातमी मिळू शकते, ज्यामुळे त्यांचं मन खूप आनंदी होईल. तुमच्या बुद्धिमत्तेचा वापर करून तुम्हाला आर्थिक लाभ मिळवण्याची संधी मिळेल आणि तुम्हाला पैशाशी संबंधित काही चांगली बातमी ऐकू येईल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील आणि रविवारच्या सुट्टीमुळे कुटुंबातील सदस्य एकमेकांसोबत मजा करण्याच्या मूडमध्ये असतील.
कुंभ रास (Aquarius)
आजचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी अनुकूल असणार आहे. ते मोठे निर्णय सहजपणे घेऊ शकतील. आज तुम्ही ऐषोआराम आणि वस्तूंवर खर्च कराल आणि त्यानंतरही तुमच्याकडे पुरेसा पैसा असेल. तुमचा पैसा कुठे अडकला असेल तर आज तो सहज सापडेल आणि तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. नोकरदार लोक रविवारच्या सुट्टीचा आनंद घेतील आणि पुढच्या दिवसाचं नियोजनही करतील. आजचा दिवस व्यावसायिकांसाठी उत्तम राहील आणि आर्थिक स्थिती सुधारण्यास सुरुवात होईल. कुटुंबात काही कलह चालू असेल तर ते आज संपेल आणि सर्वांशी संबंध चांगले राहतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
