Astrology : आज रामनवमीच्या दिवशी बनले अनेक शुभ योग; मेषसह 'या' 4 राशींच्या धनात होणार वाढ, गजकेसरी योग नशीब पालटणार
Panchang 17 April 2024 : रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर आज रवि योग, गजकेसरी योगासह अनेक शुभ योग तयार होत आहेत, त्यामुळे आजचा दिवस मेष राशीसह 4 राशींसाठी लाभदायक ठरणार आहे. या 4 राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
Astrology Today 17 April 2024 : आज, बुधवार, 17 एप्रिल, चैत्र मासातील शुक्ल पक्षाची नववी तिथी आहे, ही तिथी रामनवमी म्हणून ओळखली जाते. तसेच आज चंद्र स्वतःच्या राशीत, म्हणजेच कर्क राशीत असेल आणि गुरु मेष राशीत असेल, चंद्र आणि गुरूच्या या स्थितीमुळे गजकेसरी योग तयार होत आहे. राम नवमीचा दिवस ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीमुळे शुभ ठरणार आहे.
रामनवमीच्या दिवशी गजकेसरी योगासह रवि योग आणि आश्लेषा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचं महत्त्व अधिक वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 4 राशींना आज बनत असलेल्या शुभ योगांचा फायदा होणार आहे. या भाग्यवान 4 राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
आजचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी यशाचा असणार आहे. मेष राशीचे लोक आज कोणत्याही प्रकारच्या आव्हानांचा सामना सहजतेने करतील, सर्व परिस्थितीला धैर्याने सामोरे जातील, आपले ध्येय साध्य करण्यासाठी ते हार मानणार नाही. जर तुम्ही आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्येने त्रस्त असाल तर आज तुमची प्रतिकारशक्ती मजबूत होईल आणि तुमचं आरोग्यही सुधारेल. तुम्ही वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात संतुलन राखाल आणि आज नवीन कपडे खरेदी आणि परिधान करण्याची संधी मिळेल. रामनवमीमुळे घरात धार्मिक वातावरण असेल, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. तुम्हाला समाजात सन्मान आणि प्रसिद्धी मिळेल, ज्यामुळे तुमचं मन खूप आनंदी होईल. तुमच्या भावंडांसोबत तुमचे संबंध चांगले राहतील आणि नवविवाहित लोकांच्या घरी विशेष पाहुणे येण्याची शक्यता आहे.
तूळ रास (Libra)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा असेल. तूळ राशीच्या लोकांना आज पैसे कमावण्याचे इतर मार्ग सापडतील आणि त्यांच्या मालमत्तेतही चांगली वाढ होईल. रामनवमीच्या निमित्ताने तुम्हाला पैसे कमवण्याच्या अनेक संधी मिळतील आणि धार्मिक कार्यातही तुम्ही व्यस्त राहाल. तुमच्या जोडीदारासोबत तुमचे मैत्रीपूर्ण संबंध राहतील आणि तुम्ही एकत्र काही मालमत्ता खरेदी करू शकता. नोकरदार आणि व्यावसायिकांना आज प्रगतीच्या चांगल्या संधी मिळतील आणि तुमची प्रतिष्ठाही वाढेल. जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय चालवत असाल तर आज नफा मिळण्याची शुभ शक्यता आहे. तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल. तुमचं आरोग्य पूर्णपणे तंदुरुस्त राहील.
मकर रास (Capricorn)
आजचा दिवस मकर राशीच्या लोकांसाठी आनंदाचा असणार आहे. मकर राशीच्या लोकांना आज प्रत्येक कामात यश मिळेल आणि जुन्या गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळेल. नोकरीतील लोकांना ऑफिसमधील सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल, ज्यामुळे ते सर्व कामं सहजतेने पूर्ण करू शकतील आणि नोकरी बदलण्याचा विचार देखील करतील. व्यावसायिक आघाडीवर तुम्ही तुमच्या विरोधकांना मागे टाकण्यात यशस्वी व्हाल आणि प्रत्येक कामात पुढे जाल. आज तुम्हाला तुमचा एखादा प्रिय मित्र भेटेल. आज तुम्ही लोकांना चांगला सल्लाही देऊ शकाल. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत आनंदी वेळ घालवाल. धर्मादाय कार्यात तुम्ही व्यस्त राहाल आणि धार्मिक कार्यात पैसाही खर्च करू शकाल. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन चांगलं राहील.
मीन रास (Pisces)
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप खास असणार आहे. मीन राशीचे लोक आज आपल्या विरोधकांवर विजय मिळवण्यात यशस्वी होतील. तुम्ही तुमच्या गोड बोलण्याने लोकांची मनं जिंकण्याचा प्रयत्न कराल, ज्यामुळे तुमच्या आजूबाजूचं वातावरण चांगलं राहील. आत्मविश्वास आणि ऊर्जेमुळे तुम्ही कोणतंही कार्य पूर्ण करण्यास मागे हटणार नाही. आज व्यापाऱ्यांना मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे आणि ते त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा पुढे असतील. नोकरीच्या शोधात असलेल्यांना आज काही चांगली बातमी मिळू शकते आणि मित्रांसोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा विचारही करू शकता. वैवाहिक जीवनात जोडीदारासोबतच्या नात्यात आनंद राहील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :