एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Astrology : आज रवि योगासह बनले अनेक शुभ योग; मिथुनसह 5 राशींना होणार बक्कळ लाभ, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले

Panchang 15 August 2024 : आजचा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे, याचा 5 राशींना सर्वाधिक लाभ होणार आहे. आजच्या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

Astrology Panchang 15 August 2024 : आज 15 ऑगस्टला (Independence Day 2024), म्हणजेच स्वातंत्र्यदिनी चंद्र वृश्चिक राशीनंतर धनु राशीत जाणार आहे. याशिवाय सूर्य कर्क राशीत आणि बुध सिंह राशीत असल्यामुळे सूर्य आणि बुध यांचा द्विद्वादश योग आज तयार झाला आहे. तसेच आज श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथी असून या दिवशी रवियोग आणि ज्येष्ठ नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व वाढलं आहे. आज बनत असलेल्या शुभ योगांचा 3 राशींना फायदा होणार आहे, या भाग्यवान राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

मिथुन रास (Gemini)

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा स्वातंत्र्यदिन खास असणार आहे. मिथुन राशीच्या लोकांना आज परदेश दौऱ्यावर जाण्याची आणि जोडीदारासोबत आनंदाचे क्षण अनुभवण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवनात काही अडचण असेल तर ती आज संपेल, त्यामुळे कुटुंबात आनंदाची लहर येईल. घरातील मुलं शाळेच्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात, ज्यामुळे ते खूप आनंदी दिसतील. जमीन किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर आजचा दिवस चांगला असेल. तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर तुम्हाला त्यात चांगला नफा मिळेल. नोकरी करणारे आज मौजमजेच्या मूडमध्ये असतील आणि ते मित्रांसोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लॅन आखतील. 

सिंह रास (Leo)

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा स्वातंत्र्यदिन लाभदायक ठरणार आहे. सिंह राशीच्या लोकांना भगवान विष्णूच्या आशीर्वादाने आज आर्थिक लाभ होईल. आज तुम्हाला एखाद्या सरकारी योजनेचा लाभ मिळू शकेल आणि चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करण्याची संधीही मिळेल. आज काही खास लोकांशी तुमची ओळख वाढेल, ज्यांचा तुम्हाला नजीकच्या काळात फायदा होईल. तुमच्या व्यस्त वेळापत्रकात तुम्ही लव्ह लाईफसाठी वेळ काढू शकाल, यामुळे तुमचा लव्ह पार्टनर आनंदी होईल आणि नातेसंबंधही घट्ट होतील. व्यवसायात प्रगतीच्या अनेक संधी मिळतील आणि आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येईल. स्वातंत्र्य दिनामुळे आज मुलं खूप आनंदी दिसतील आणि दिवसभर मजेच्या मूडमध्येही असतील. 

धनु रास (Sagittarius)

आजचा स्वातंत्र्यदिन धनु राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे. धनु राशीच्या लोकांच्या आयुष्यात आज चांगले बदल होतील. कुटुंबाच्या गरजा आणि सर्वांच्या आरोग्याची पूर्ण काळजी तुम्ही घ्याल आणि प्रत्येक कामात 100 टक्के द्याल. स्वातंत्र्य दिनामुळे आज देशभक्तीपूर्ण वातावरण असेल आणि तुम्ही मित्रांसोबत बाहेर जाण्याचा किंवा चित्रपट पाहण्याचा बेतही कराल. पालकांच्या मदतीने कौटुंबिक व्यवसायातील समस्या दूर होतील आणि तुम्हाला चांगला नफा मिळू शकेल. नोकरदार लोक रजेचा आनंद घेतील. 

मकर रास (Gemini)

आजचा स्वातंत्र्यदिन मकर राशीच्या लोकांसाठी शुभ असणार आहे. आज तुम्ही कुटुंबाच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न कराल आणि तुम्हाला तुमच्या भावा-बहिणींचं पूर्ण सहकार्य मिळेल. आज स्वातंत्र्यदिनामुळे कर्मचाऱ्यांना कार्यालयात फारसं काम नसल्याने ते सहकाऱ्यांसोबत चेष्टा करण्यात वेळ घालवतील. जर तुम्ही कोणतीही मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी दिवस चांगला आहे. जे लोक प्रेम जीवनात आहेत ते त्यांच्या भविष्यासाठी योजना बनवतील.

कुंभ रास (Gemini)

आजचा स्वातंत्र्यदिन कुंभ राशीच्या लोकांसाठी खूप चांगला दिवस असणार आहे. विष्णू देवाच्या कृपेने तुमच्या सुखसोयींमध्ये वाढ होईल. अडकलेले पैसे वसूल करण्यात तुम्हाला यश मिळेल. तुमचं एखादं काम खूप दिवसांपासून प्रलंबित असेल, तर आज तुम्हाला ते पूर्ण करण्याची संधी मिळेल. सासरच्यांकडून आज तुम्हाला सन्मान मिळेल. जर तुम्ही एखाद्या आजाराने त्रस्त असाल तर त्यापासूनही तुम्हाला आराम मिळू शकतो. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Horoscope Today 15 August 2024 : आज भारताचा स्वातंत्र्य दिन; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Wai Assembly Constituency : वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Narayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रियाAditi Tatkare Win Vidhan Sabha Election | राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंचा दणदणीत विजय ABP MajhaRaju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Wai Assembly Constituency : वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35  वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35 वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
Solaur vidhansabha : राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
Man Vidhan Sabha Election Result 2024 :  जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
Embed widget