एक्स्प्लोर

Maharashtra Weather update: मुंबईत तापमानाचा पारा घसरला, पुण्यात कडाक्याची थंडी, परभणीत 10 अंश सेल्सिअसने हाडं गोठवली, राज्यातील तापमान किती?

Weather update: राज्यात किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली असून बहुतांश भागात थंडीची लाट पसरल्याचे चित्र आहे. मुंबई पुण्यासह कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातथंडीने हुडहुडी वाढली आहे.

Maharashtra Weather update:  राज्यात किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली असून बहुतांश भागात थंडीची लाट पसरल्याचे चित्र आहे. मुंबई पुण्यासह कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातथंडीने हुडहुडी वाढली आहे. पुण्यात किमान तापमानात घट होऊन तापमान 16 अंशांवरुन थेट 14.3 अंशावर आले आहे. तर पुढील चार दिवसात तापमान 10 अंशावर जाणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. तर मुंबईत किमान तापमानात हळू हळू घट होऊन मुंबईचा पारा घसण्यास सुरवात झाली आहे, शनिवारी पहाटे मुंबईच किमान तापमान 21.2 अंश इतकं होत, तर तेच तापमान रविवारी पहाटे 18 अंशांपर्यंत खाली घसरलं. पारा अचानक तीन अंशांनी खाली घसरल्याने पहाटेच्या वेळी का होईना मात्र हवेत गारवा जाणवतोय

Konkan : तळकोकणात थंडीची चाहूल, किमान तापमानात घट, पिकास पोषक वातावरण

दुसरीकडे, तळकोकणातही थंडीची चाहूल लागली असून किमान तापमानात घट झाली आहे. परिणामी आंबा, काजू पिकास पोषक असे वातावरण तयार झाले आहे. सिंधुदुर्गात आज 14 अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदवले गेले. गेले काही दिवस तळकोकणात अवकाळीचा मारा होता. नोव्हेंबर महिन्यात देखील अनेक भागात पाऊस कोसळला. मात्र आता किमान तापमानात घट व्हायला सुरुवात झाली आहे. काही भागात धुक्याने देखील हजेरी लावली आहे. कोकण पट्ट्यात किमान तापमानात फरक पडत आहे. येत्या काही दिवसांत किमान तापमानात अजून घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंबा, काजू पिकासाठी पोषक वातावरण तयार होत आहे.

Jalgaon : नाशिक, निफाड, जळगावचे तापमान नीचांकी पातळीवर

इतर जिल्ह्याप्रमाणे जळगाव जिल्ह्यात थंडीने आता जोर पकडला असून जळगावचे तापमान 10.5 इतक्या नीचांकी पातळीवर खाली डल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या चार दिवसपर्यंत जळगाव जिल्ह्यात अनेक भागात पाऊस आणि उकाडा असल्याचं चित्र असताना, पावसाने पाठ फिरवताच थंडीने जोर पकडला. तर सकाळच्या सुमारस जनजीवन विस्कळीत झाल्याचं दिसून येत आहे. अशातच थंडीमुळे रब्बी हंगामातील पिकांना फायदा होणार आहे.

गेल्या 24 तासात नाशिक आणि निफाडचा पारा 2 अंशांनी घसरला नाशिकमध्ये देखील तापमानाचा पारा घसरला. नाशिकचे तापमान 10.8 तर पोहचले आहे. तर निफाडमध्ये पारा 9.5 अंशावर असल्याची नोंद झालीय. गेल्या 24 तासात नाशिक आणि निफाडचा पारा 2 अंशांनी घसरला. दरम्यान, अचानक पारा घसरल्याने निफाडमध्ये ठीक ठिकाणी शेकोटी पेटायला लागल्या असून गुलाबी थंडीचा आनंद घेत विद्यार्थी शाळा महाविद्यालयात जात आहेत.

आज कोणत्या जिल्ह्यात किती तापमान ? (सकाळी 8.30 पर्यंत min temp)

मुंबई - 19 अंश सेल्सिअस
कुलाबा - २२ अंश सेल्सिअस
सातारा - 13.6 अंश सेल्सिअस
महाबळेश्वर- 12. 3 अंश सेल्सिअस
बीड - 11.5 अंश सेल्सिअस
पुणे - 13.2  अंश सेल्सिअस
रत्नागिरी - 19 अंश सेल्सिअस
संभाजीनगर - 11.8 अंश सेल्सिअस
नाशिक - 10.8 अंश सेल्सिअस
नवी मुंबई - 23.6 अंश सेल्सिअस
माथेरान - 15. 4 अंश सेल्सिअस
धाराशिव - 14.6 अंश सेल्सिअस
कोल्हापूर - 17.1 अंश सेल्सिअस
अहिल्यानगर - 11.3 अंश सेल्सिअस
सांगली - 14.4 अंश सेल्सिअस
नंदुरबार - 12.3 अंश सेल्सिअस
परभणी - 14 अंश सेल्सिअस
जेऊर - 9 अंश सेल्सिअस
बारामती - 12.6 अंश सेल्सिअस
नागपूर - 12.2 अंश सेल्सिअस

आणखी वाचा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

लेकासाठी सुनिल तटकरे मैदानात, थेट एकनाथ शिंदेंची घेतली भेट, अनिकेत तटकरेंची पोस्ट चर्चेत
लेकासाठी सुनिल तटकरे मैदानात, थेट एकनाथ शिंदेंची घेतली भेट, अनिकेत तटकरेंची पोस्ट चर्चेत
Manoj Jarange : मोठी बातमी! मनोज जरांगे यांना उलट्यांचा त्रास, डॉक्टरांकडून तपासणी; शिष्टमंडळ अन् मराठा अभ्यासकांची मीडियासमोर चर्चा 
मोठी बातमी! मनोज जरांगे यांना उलट्यांचा त्रास, डॉक्टरांकडून तपासणी; शिष्टमंडळ अन् मराठा अभ्यासकांची मीडियासमोर चर्चा 
Thane Metro : ठाण्यातील 12 हजार कोटींच्या अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोला नागरिकांचा तीव्र विरोध; 'पांढरा हत्ती' ठरण्याची तज्ज्ञांची भीती
ठाण्यातील 12 हजार कोटींच्या अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोला नागरिकांचा तीव्र विरोध; 'पांढरा हत्ती' ठरण्याची तज्ज्ञांची भीती
Bhimashankar Temple : भीमाशंकर मंदिर 'या' तारखेपासून पुन्हा दर्शनासाठी होणार सुरू! ऑनलाईन पास बंधनकारक; जाणून घ्या नवे नियम
भीमाशंकर मंदिर 'या' तारखेपासून पुन्हा दर्शनासाठी होणार सुरू! ऑनलाईन पास बंधनकारक; जाणून घ्या नवे नियम

व्हिडीओ

Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Prajkta Tanpure Join BJP : भाजपमध्ये प्रवेश करताच तनपुरेंच्या कार्यालयातून शरद पवारांचे फोटो गायब
Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thane Metro : ठाण्यातील 12 हजार कोटींच्या अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोला नागरिकांचा तीव्र विरोध; 'पांढरा हत्ती' ठरण्याची तज्ज्ञांची भीती
ठाण्यातील 12 हजार कोटींच्या अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोला नागरिकांचा तीव्र विरोध; 'पांढरा हत्ती' ठरण्याची तज्ज्ञांची भीती
दक्षिण दिल्लीत साकेत मेट्रो स्टेशनजवळ पाच मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती
दक्षिण दिल्लीत साकेत मेट्रो स्टेशनजवळ पाच मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती
IPL 2026 Final Prediction : बंगळुरू की गुजरात, अहमदाबादची खेळपट्टी कुणाला साथ देणार? आयपीएल फायनलचा सर्वात मोठा अंदाज समोर
बंगळुरू की गुजरात, अहमदाबादची खेळपट्टी कुणाला साथ देणार? आयपीएल फायनलचा सर्वात मोठा अंदाज समोर
Mamata Banerjee: 'शासक हत्यारे झालेत, भाजपला लाज वाटली पाहिजे..', खासदार पुतण्या अभिषेकवर प्राणघातक हल्ला होताच दीदी भडकल्या; काँग्रेस आणि सपाचाही सडकून प्रहार
'शासक हत्यारे झालेत, भाजपला लाज वाटली पाहिजे..', खासदार पुतण्या अभिषेकवर प्राणघातक हल्ला होताच दीदी भडकल्या; काँग्रेस आणि सपाचाही सडकून प्रहार
...तर मी मनोज जरांगे पाटलांची भेट घेईल, पंकजा मुंडेंचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र, उपोषणस्थळी जाण्याच्या सूचना
...तर मी मनोज जरांगे पाटलांची भेट घेईल, पंकजा मुंडेंचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र, उपोषणस्थळी जाण्याच्या सूचना
कर्नाटकी राजकारणात काँग्रेस संकटमोचकाची अखेर स्वप्नपूर्ती! सीएम पदासाठी डीकेंचं नाव जाहीर; मंत्रीमंडळातील भलत्याच फाॅर्म्युल्याची चर्चा अन् सिद्धरामय्यांनी सुद्धा डाव साधलाच!
कर्नाटकी राजकारणात काँग्रेस संकटमोचकाची अखेर स्वप्नपूर्ती! सीएम पदासाठी डीकेंचं नाव जाहीर; मंत्रीमंडळातील भलत्याच फाॅर्म्युल्याची चर्चा अन् सिद्धरामय्यांनी सुद्धा डाव साधलाच!
लग्नाचे आमिष दाखवून शोषण केलं, गर्भपातासाठीही भाग पाडलं, तरुणीच्या आरोपानंतर मीरा भाईंदरमध्ये गुन्हा दाखल
लग्नाचे आमिष दाखवून शोषण केलं, गर्भपातासाठीही भाग पाडलं, तरुणीच्या आरोपानंतर मीरा भाईंदरमध्ये गुन्हा दाखल
Vinesh Phogat: व्यवस्थेशी झुंजत असलेल्या विनेग फोगाटचं आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न भंगलं; अटीतटीच्या लढतीत सेमीफायनलमध्ये निसटता पराभव
व्यवस्थेशी झुंजत असलेल्या विनेग फोगाटचं आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न भंगलं; अटीतटीच्या लढतीत सेमीफायनलमध्ये निसटता पराभव
Embed widget