एक्स्प्लोर
Ambulance Scam: 'शासकीय निधीचा गैरवापर केला', Abdul Sattar यांना सिल्लोड कोर्टाचा मोठा दणका
माजी मंत्री आणि आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. 2014 साली आमदार निधीतून (MLA Fund) 16 लाख रुपये खर्चून दोन रुग्णवाहिका खरेदी करून त्या स्वतःच्याच शिक्षण संस्थेला दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. 'शासकीय परवानगीशिवाय आणि शासनाची दिशाभूल करून हा व्यवहार नियमबाह्य पद्धतीने केला गेला', असा आरोप सामाजिक कार्यकर्ते गणेश शंकरपल्ली यांनी केला आहे. याच प्रकरणात सिल्लोड न्यायालयाने (Sillod Court) पोलिसांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत, त्यामुळे सत्तार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सत्तार यांनी 2014 मध्ये आपल्या आमदार निधीमधून प्रगती शिक्षण संस्थेला (Pragati Shikshan Sanstha) या दोन रुग्णवाहिका दिल्या होत्या. या संस्थेवर सत्तार यांचे कुटुंबीय पदाधिकारी असून, ही माहिती लपवण्यात आल्याचा आरोप आहे. तक्रारदाराने पोलिसांत तक्रार करूनही कारवाई न झाल्याने अखेर न्यायालयात धाव घेतली होती.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















