Astrology : आज सिद्धी योगासह जुळून आले अनेक शुभ योग; मेषसह 'या' 5 राशींचं नशीब पालटणार, आर्थिक स्थिती मजबूत होणार
Panchang 13 June 2024 : आज गुरुवारचा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे, याचा 5 राशींना सर्वाधिक लाभ होणार आहे. या 5 राशींवर आज दत्तगुरुंची कृपा राहील, आजचा दिवस लाभाचा असेल. आजच्या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
Astrology 13 June 2024 : ग्रहांच्या स्थितीनुसार, आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. आज गुरुवार, 13 जून रोजी चंद्र सिंह राशीत भ्रमण करेल. आज सूर्य आणि बुध चंद्रापासून दहाव्या घरात स्थित आहेत, यामुळे अमला योग तयार होत आहे. तसेच आज ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी असून या दिवशी अमला योगासह सिद्धी योग, गजकेसरी योग आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचं महत्त्व वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार 5 राशींना आज बनत असलेल्या शुभ योगांचा लाभ मिळेल. या भाग्यवान राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
आजचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी लाभदायक आहे. मेष राशीच्या लोकांच्या मार्गात येणारे अडथळे किंवा समस्या आजपासून हळूहळू कमी होतील आणि संपत्तीत चांगली वाढ होईल. तुमचे संवाद कौशल्य चांगले होईल, लोक तुमच्या बोलण्याने प्रभावित होतील आणि तुम्ही नवीन मित्र देखील बनवाल. नोकरदार लोक त्यांच्या क्षमतेच्या जोरावर आज कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी करतील, ज्याची करिअरमध्ये प्रगती साधण्यास मदत होईल. आज तुम्हाला चांगला परतावा असलेल्या योजनांमध्ये गुंतवणूक करायला आवडेल, ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल. सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतल्याने तुम्हाला सन्मान मिळेल. आज तुम्हाला एखाद्या सरकारी योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात शांती आणि आनंद राहील, तुमच्या भावाचा सल्ला तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल.
तूळ रास (Libra)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक आहे. तूळ राशीच्या लोकांच्या धाडसात आणि शौर्यात आज वाढ होईल. आज तुम्हाला पैसे कमवण्याचे नवीन मार्ग सापडतील, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि बचत करण्याची तुमची क्षमताही वाढेल. जर तुम्हाला जमीन किंवा गाडी घ्यायची असेल तर आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ असेल, भगवान विष्णूच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. व्यावसायिकांना आपापल्या क्षेत्रात खूप फायदा होईल आणि तुम्ही स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यातही यशस्वी व्हाल. कौटुंबिक जीवनाबद्दल बोलताना, मुलांचा विकास पाहून तुम्हाला आनंद होईल, ज्यामुळे तुमची चिंता दूर होईल. तुम्हाला तुमचा जोडीदार आणि कुटुंबातील सदस्यांकडून प्रत्येक पावलावर साथ मिळेल.
धनु (Sagittarius)
आजचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी विशेष फलदायी असणार आहे. धनु राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल, ज्यामुळे तुमची सर्व रखडलेली कामं पूर्ण होऊ लागतील आणि आर्थिक स्थितीतही सुधारणा होण्याची शक्यता आहे. लव्ह लाईफबद्दल बोलताना, तुम्ही तुमच्या प्रियकरासोबत आनंदी राहाल आणि तुमच्या नात्याबद्दल तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी देखील बोलू शकता. नोकरी करणारे लोक त्यांच्या करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी नोकरी बदलण्याचा विचार करत असतील तर आज तुम्हाला चांगल्या संधी मिळू शकतात. नफा मिळवण्यासाठी व्यवसायात केलेले कठोर परिश्रम पणास येतील. जर कुटुंबात काही कलह चालू असेल तर ते आज संपतील.
मकर रास (Capricorn)
आजचा दिवस मकर राशीच्या लोकांसाठी अनुकूल असणार आहे. आज मकर राशीचे लोक जास्त खर्च करणार नाही आणि मोठ्या प्रमाणात पैशाची बचत करणं त्यांना शक्य होईल. आज तुम्ही नवीन व्यावसायिक योजनांवर लक्ष केंद्रित कराल, ज्यातून तुम्हाला भरपूर नफा मिळेल आणि तुम्ही इतर व्यवसायातही गुंतवणूक करू शकता. आज, व्यस्त असूनही तुम्ही तुमच्या लव्ह लाईफसाठी वेळ काढू शकाल, ज्यामुळे तुमचं नातं अधिक मजबूत होईल. नोकरदार लोक मित्रांच्या मदतीने आज एखाद्या दुसऱ्या कंपनीत मुलाखतीसाठी जाऊ शकतात, जिथे तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे. तुमची कौटुंबिक कामं पूर्ण होतील आणि भावंडांच्या नात्यात गोडवा येईल. तुम्हाला मित्रांकडूनही सहकार्य मिळेल आणि तुम्ही कुठेतरी बाहेर जाण्याचा बेत आखाल.
मीन रास (Pisces)
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. मीन राशीचे लोक आज उत्साहाने भरलेले असतील, ज्याचा उपयोग ते नवीन गोष्टी शिकण्यासाठी करतील. तुम्ही काही नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ असेल. विरोधकांच्या टीकेकडे लक्ष न देता तुमचं काम करत राहिल्यास भविष्यात यश तुमच्या पायाशी लोळेल. नोकरदार लोक त्यांच्या करिअरमध्ये यश मिळवतील. आज व्यावसायिकांना चांगला नफा मिळेल. लग्नासाठी पात्र लोकांसाठी आज काही चांगले प्रस्ताव येतील. तुम्हाला तुमच्या वडिलांचा आशीर्वाद मिळेल आणि तुमची संपत्तीही वाढेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :