(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Horoscope Today 13 June 2024 : आज 'या' राशींवर राहणार दत्तगुरुंची कृपा; कामातील अडथळे होणार दूर, वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 13 June 2024 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...
Horoscope Today 13 June 2024 : पंचांगानुसार, आज 13 जून 2024, गुरुवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष (Aries Horoscope Today)
व्यवसायात नवीन कामं मिळतील. घरातील व्यक्तींच्या प्रकृतीच्या तक्रारीकडे जरा जास्तच लक्ष द्यावं लागेल.
वृषभ (Taurus Horoscope Today)
परदेशी गमनाची संधी मिळेल. बऱ्याच दिवसांपासून बघितलेली स्वप्नं साकार होतील.
मिथुन (Gemini Horoscope Today)
शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याचा समतोल राखावा लागेल. अति संवेदनशील बनाल.
कर्क (Cancer Horoscope Today)
भागीदारीच्या व्यवसायामध्ये एकमेकांची मतं न पटल्यामुळे थोडे वाद विवाद संभवतात. महिलांना तडजोडीचं धोरण स्वीकारावं लागेल.
सिंह (Leo Horoscope Today)
पैशाची परिस्थिती थोडी नाजूक राहील. सुखदुःखाची आंदोलनं मनात चालू राहतील.
कन्या (Virgo Horoscope Today)
सद्य परिस्थितीशी खंबीरपणे सामना करण्याचा निश्चय करावा लागेल. पैसा मिळाला तरी खर्च व्हायला वेळ लागणार नाही.
तूळ (Libra Horoscope Today)
मुलांच्या करिअर बाबत जरा जास्त जागरूक व्हाल. कुटुंबामध्ये थोड्या थोड्या कारणावरून वाद-विवाद होतील.
वृश्चिक (Scorpio Horoscope Today)
आज काही प्रश्न मध्यस्थांमुळे सामोपचाराने सोडवले जातील. उद्या जे काम करणार आहात ते आजच करा.
धनु (Sagittarius Horoscope Today)
जोडीदाराच्या थंड प्रतिक्रियांमुळे घरातील प्रश्न जैसे थे राहतील. महिलांना त्यांच्या मनाप्रमाणे काम करता येणार नाही.
मकर (Capricorn Horoscope Today)
आज थोडे हळवे बनाल. एकांत वास आवडला तरी एकटं राहणं आवडणार नाही.
कुंभ (Aquarius Horoscope Today)
तुमचा दूरदर्शीपणा आज तुम्हाला खूप उपयोगी पडेल. कष्टही खूप कराल त्यामुळे थकवा येऊ शकतो.
मीन (Pisces Horoscope Today)
प्रकृती सांभाळून कष्टाची कामे अंगावर घ्या. एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडली तर रागाचा पारा लगेच चढेल.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा: