Astrology : आज सर्वार्थ सिद्धी योगासह बनले अनेक शुभ योग; 'या' 5 राशींना मिळणार विशेष लाभ, धनात होणार अपार वाढ
Panchang 05 October 2024 : आज शनिवारचा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे, या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग निर्माण झाल्याने याचा सर्वाधिक लाभ 5 राशींना होणार आहे. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
Astrology Panchang 02 October 2024 : आज शनिवार, 5 ऑक्टोबर रोजी चंद्र तूळ राशीत प्रवेश करणार आहे. तसेच आज आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी आहे. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी अनफा योगासह सर्वार्थ सिद्धी योग आणि स्वाती नक्षत्राचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना (Zodiac Signs) या शुभ संयोग योगांचा फायदा होणार आहे, या राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मिथुन रास (Gemini)
आजचा दिवस मिथुन राशीच्या लोकांसाठी चांगला असणार आहे. मिथुन राशीचे लोक आज इतरांच्या मदतीसाठी पुढे येतील आणि काही पैसे धार्मिक कामांवरही खर्च होऊ शकतात. शनिदेवाच्या कृपेने आज तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. पैशांची बचत करण्यासोबतच तुम्ही आज दीर्घकालीन गुंतवणूक देखील करू शकता, ज्यामुळे तुम्हाला भविष्यात चांगला नफा मिळेल. नोकरीत असलेल्यांना त्यांच्या करिअरमध्ये चांगली वाढ दिसेल. व्यवसाय करणारे आज जास्तीत जास्त नफा मिळवतील. आज तुम्हाला काही जुन्या मित्रांनाही भेटता येईल.
तूळ रास (Libra)
आजचा दिवस तूळ राशीच्या लोकांसाठी आशेचा नवीन किरण घेऊन आला आहे. आज तूळ राशीच्या लोकांचं आरोग्य सुधारेल आणि ते विचारपूर्वक पैशाशी संबंधित योजना बनवतील. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तम संधी मिळतील आणि प्रत्येक क्षेत्रात नाव कमावण्याची संधी मिळेल. जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय चालवत असाल तर आज तुम्हाला नफ्याच्या नवीन संधी मिळतील आणि तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येईल. शनिदेवाच्या कृपेने तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील सर्व समस्या हळूहळू संपतील आणि तुमची देवावरील श्रद्धा अधिक दृढ होईल.
वृश्चिक रास (Scorpio)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला असणार आहे. वृश्चिक राशीच्या लोकांची काही मौल्यवान वस्तू किंवा संपत्ती मिळण्याची इच्छा पूर्ण होईल, ज्यामुळे ते खूप आनंदी दिसतील आणि. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर आज तुम्हाला चांगला नफा कमावण्याची संधी मिळेल. नोकरी करणारे लोक दीर्घकाळानंतर सहकाऱ्यांसोबत मजा करण्याच्या मूडमध्ये असतील. तुमच्या सासऱ्यांसोबत तुमचे संबंध चांगले राहतील आणि ते तुम्हाला मदत करण्यास सदैव तयार असतील. तुमच्या जोडीदाराविषयी तुमचं प्रेम वाढेल आणि तुम्ही एकमेकांना समजून घेण्याचं काम कराल.
धनु रास (Sagittarius)
आजचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी आनंदाचा असणार आहे. नवरात्रीमुळे धनु राशीचे लोक आज धार्मिक कार्यात व्यस्त राहतील आणि त्यांना नफा मिळवण्याच्या चांगल्या संधीही मिळतील. व्यवसायात आर्थिक लाभामुळे तुमच्या आनंदाला पारोवार उरणार नाही. त्यानंतर आज तुम्ही तुमच्या जोडीदाराला खरेदीसाठी घेऊन जाऊ शकता. आज काम करणाऱ्यांना वरिष्ठांच्या मदतीने नवीन काही करण्याची संधी मिळेल, जिथे तुम्ही तुमची ताकद सर्वांना दाखवू शकाल. तुमच्या भावांच्या पाठिंब्याने आज अनेक घरगुती कामं पूर्ण होतील.
मीन रास (Pisces)
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल असणार आहे. मीन राशीच्या लोकांची प्रदीर्घ प्रलंबित कामं आज शनिदेवाच्या कृपेने पूर्ण होऊ शकतात. तुम्ही वृद्धांची सेवा करण्यासाठी आणि चांगल्या कामांवर पैसे खर्च कराल, ज्यामुळे तुम्हाला आनंद वाटेल. तुम्ही तुमच्या शत्रू आणि विरोधकांसाठी डोकेदुखी बनून राहाल, ज्यामुळे ते तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न करतील परंतु पूर्णपणे अयशस्वी ठरतील. जर तुम्हाला भागीदारीत व्यवसाय सुरू करायचा असेल तर आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. गुंतवणुकीसाठीही दिवस चांगला जाणार आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :