Astrology : आज रवि योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; सिंहसह 'या' 5 राशींवर असणार बाप्पाची कृपा
Astrology Panchang 04 December 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा परिणाम पाच राशींवर होणार आहे. या राशींवर गणेशाची कृपा असणार आहे.
Astrology Panchang 04 December 2024 : आज 4 डिसेंबर बुधवारचा दिवस. आज मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षाची तृतीया तिथी आहे. तसेच, आजच्या दिवशी रवि योग (Yog), अतिगंड योग आणि पूर्वाषाढ योगाचा शुभ संयोग जुळून आला आहे तसेच, काही राज्यांत आज विनायक चतुर्थी (Vinayk Chaturthi) साजरी होत असल्याने आजच्या दिवसाचं महत्त्व फार वाढलं आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा परिणाम पाच राशींवर होणार आहे. या राशींवर गणेशाची कृपा असणार आहे. त्यामुळे या लकी राशी नेमक्या कोणत्या आहेतते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. आज तुमच्या बौद्धिक क्षमतेचा चांगला विकास होईल. तसेच, तुम्ही ठरविलेली कामे सर्व सुरळीत मार्गी लागतील. तुमच्या व्यवसायातून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. शारीरिकदृष्ट्या तुम्ही संतुष्ट असाल.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्साहाचा असणार आहे. आज तुमच्या सकारात्मक बदल पाहायला मिळतीवल. तुमच्या वागणुकीने घरातील सदस्य देखील तुमच्यावर खुश होतील. आज जर तुम्हाला एखद्या योजनेत पैसे गुंतवायचे असतील तर त्यासाठी आजचा दिवस शुभ आहे.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. तुमच्या सुख-समृद्धीत चांगली वाढ होईल. तसेच, आज तुम्ही सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन कराल. तुमच्यात एकाग्रता दिसून येईल. तुमच्या वागणुकीत सकारात्मकता दिसून येईल. तसेच, अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील.
धनु रास (Sagittarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुम्ही खूप आशावादी असाल. तसेच, तुमच्या कामाप्रती तुम्ही खूप प्रामाणिक असाल. जर तुम्ही कुठे गुंतवणूक केली असेल तर त्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. आज दिवसभरात तुम्हाला एखादी शुभवार्ता ऐकायला मिळू शकते.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सकारात्मक असणार आहे. आज तुमच्या दिवसाची सुरुवात सकारात्मक होईल. तसेच, तुमचे मन धार्मिक कार्यात जास्त गुंतेल. त्यामुळे तुम्हाला प्रसन्न वाटेल. कुटुंबियांबरोबर तुमचे संबंध चांगले असतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: