Astrology : आज प्रिती योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 3 राशींना लाभणार लक्ष्मीची कृपा, धनात होणार दुप्पट वाढ
Panchang 01 November 2024 : आज शुक्रवारचा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे, या दिवशी प्रिती योग निर्माण झाल्याने याचा सर्वाधिक लाभ 3 राशींना होणार आहे. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
![Astrology : आज प्रिती योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 3 राशींना लाभणार लक्ष्मीची कृपा, धनात होणार दुप्पट वाढ Astrology Panchang 01 November 2024 Priti yog ayushman yog formed today are very auspicious for these zodiac signs horoscope today aries cancer scorpio are lucky zodiacs Astrology : आज प्रिती योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 3 राशींना लाभणार लक्ष्मीची कृपा, धनात होणार दुप्पट वाढ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/01/192595c63bfecf683e7e43ac2a4329171730424596277713_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Astrology Panchang 01 November 2024 : आज शुक्रवार, 1 नोव्हेंबर रोजी चंद्राचं शुक्राच्या तूळ राशीत भ्रमण होणार आहे. याशिवाय आज कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्याही असून या दिवशी दिवाळीचा सण साजरा करतात. आज लक्ष्मी पूदन देखील आहे. आज दिवाळीच्या दिवशी प्रीति योग, आयुष्मान योग आणि स्वाती नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 3 राशींना (Zodiac Signs) या शुभ योगांचा फायदा होणार आहे, या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
आजचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी सकारात्मक असणार आहे. मेष राशीच्या लोकांना लक्ष्मीच्या कृपेने आज अडकलेला पैसा मिळण्याची शक्यता आहे आणि दिवाळीमुळे घरात उत्साहाचं वातावरण राहील. जर तुम्हाला आज नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर दिवस चांगला आहे, लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुम्हाला चांगले लाभ मिळतील. आज तुम्ही जोखीम कमी असलेल्या ठिकाणी आणि दीर्घकालीन गुंतवणूक मिळू शकेल, अशा ठिकाणी गुंतवणूक कराल. दुकानदार आणि व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला असेल, ते दिवसभर कामात व्यस्त राहतील, ज्यामुळे त्यांना चांगला नफा मिळू शकेल. दिवाळीमुळे घरी एखादा खास पाहुणा येऊ शकतो. संध्याकाळी कुटुंबासह लक्ष्मीपूजन कराल आणि मित्रांना भेटाल.
कर्क रास (Cancer)
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. कर्क राशीच्या लोकांना आज सकाळपासूनच लक्ष्मीच्या कृपेने अनेक शुभवार्ता मिळतील, ज्यामुळे तुमच्या दिवसाची सुरुवात खूप चांगली होणार आहे. धार्मिक कार्यक्रमात तुम्ही उत्साहाने सहभागी व्हाल, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. आज दिवाळीच्या निमित्ताने तुम्ही घरातील कामात मदत कराल आणि नवीन पदार्थांचा आस्वादही घ्याल. आज तुम्ही तुमच्या कुटुंबासमवेत एखाद्या धार्मिक स्थळी सहलीची योजना आखू शकता, ज्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य खूप आनंदी दिसतील. आज व्यावसायिकांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आर्थिक स्थितीही सुधारेल. दिवाळीच्या दिवशी कुटुंबातील सर्व सदस्य आपापल्या कामात व्यस्त राहतील आणि एकमेकांना मदत करण्यासही तयार असतील.
वृश्चिक रास (Scorpio)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला असणार आहे. वृश्चिक राशीचे लोक आज त्यांच्या कामात समाधानी दिसतील आणि ते त्यांच्या जोडीदारासह घरातील खरेदीसाठी देखील जाऊ शकतात. काल केलेली गुंतवणूक तुम्हाला भविष्यात अनुकूल परतावा देईल आणि तुमच्या जीवनात सकारात्मक बदल अनुभवेल. अविवाहित लोकांसाठी आज चांगलं स्थळ येऊ शकतं. स्वत:चा व्यवसाय करणाऱ्यांना आज त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांकडून कठीण स्पर्धेला सामोरं जावं लागेल आणि चांगला नफा मिळवण्यातही ते यशस्वी होतील. कुटुंबातील कोणताही सदस्य घरापासून दूर राहत असेल तर तो आज दिवाळीच्या सुट्टीत घरी परतू शकतो. संध्याकाळी घरात हशा आणि मस्तीचं वातावरण असेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)