Astrology news : पुढच्या 87 दिवसांपर्यंत 'या' 3 राशी राहतील हॅप्पी हॅप्पी; शनीच्या परिवर्तनाने पालटणार नशीब
Astrology news : शनीच्या नक्षत्र परिवर्तनाचा सर्व 12 राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडतो. शनी सध्या कुंभ राशीत विराजमान आहे. तसेच, पूर्व भाद्रपद नक्षत्रच्या द्वितीय चरणात संक्रमण करणार आहे.
Astrology news : ज्योतिष शास्त्रानुसार, शनीचं (Shani Dev) राशी परिवर्तन नाही तर नक्षत्र परिवर्तन देखील विशेष मानलं जातं. शनीच्या (Lord Shani) नक्षत्र परिवर्तनाचा सर्व 12 राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडतो. शनी सध्या कुंभ राशीत विराजमान आहे. तसेच, पूर्व भाद्रपद नक्षत्रच्या द्वितीय चरणात संक्रमण करणार आहे.
येत्या 18 ऑगस्ट रोजी शनीची उलटी चाल सुरु होऊन पूर्व भाद्रपद नक्षत्रात पहिल्या चरणात प्रवेश करणार आहे. त्यानंतर 3 ऑक्टोबर रोजी शतभिषा नक्षत्राच्या चतुर्थ चरणात प्रवेश करणार आहे. पूर्व भाद्रपद नक्षत्राचा स्वामी गुरु आहे आणि शतभिषा नक्षत्राचा स्वामी राहू आहे. त्यामुळे गुरुच्या नक्षत्रात शनीचं संक्रमण येत्या 87 दिवसांपर्यंत कोणत्या राशींसाठी (Zodiac Signs) लाभदायक असणार आहे ते जाणून घेऊयात.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
शनीचं हे नक्षत्र परिवर्तन वृश्चिक राशीच्या लोकांसाठी फायदेशीर असणार आहे. या कालावधीत तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. तुमच्या धन-संपत्तीत चांगली वाढ होईल. तसेच, आई-वडिलांच्या तब्येती संदर्भात तुम्हाला शुभवार्ता मिळू शकते.तुमच्या कामकाजात चांगली प्रगती होईल.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी शनीच्या नक्षत्र परिवर्तनाने चांगलाच फायदा होणार आहे. कोर्ट कचेरीतील तुमची थांबलेली कामं पूर्ण होतील.तसेच, बिझनेस वर्गातील लोकांना या कालावधीत चांगली बातमी मिळू शकते. जर तुम्ही एखाद्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक केली असेल तर त्यातून तुम्हाला चांगला नफा मिळेल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
शनीचं नक्षत्र परिवर्तन कुंभ राशीच्या लोकांसाठी फार शुभ मानलं जाणार आहे. या कालावधीत कुटुंबीयांचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. शनीच्या कृपेने तुमच्या पद-प्रतिष्ठेत चांगली वाढ झालेली दिसेल. व्यापारी वर्गातील लोकांना चांगला लाभ मिळेल. तुमच्या मनातील इच्छा हळूहळू पूर्ण होतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :