(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Astrology : हिंदू नववर्षाची सुरुवात 3 राजयोगांनी; नवीन वर्षात 'या' 3 राशी होणार मालामाल, नोकरी-व्यवसायात गाठणार नवी उंची
Hindu New Year : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, यावेळी हिंदू नववर्षाच्या पहिल्याच दिवशी तीन अतिशय शुभ योग आणि राजयोग तयार होत आहेत, त्यामुळे पुढील एक वर्ष काही राशींसाठी शुभ ठरू शकतं, या 3 भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घ्या
Gudi Padwa 2024 Astrology : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, दरवर्षी हिंदू नववर्ष आणि नवविक्रम संवत्सराची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते. याच दिवशी चैत्र नवरात्री प्रतिपदा देखील सुरू होते. यंदाच्या हिंदू नववर्षाची सुरुवात 9 एप्रिलपासून होत आहे, या दिवशी तीन अतिशय शुभ योग आणि राजयोग बनले आहेत.
सर्वार्थ सिद्धी योग, गजकेसरी राजयोग आणि अमृत सिद्धी योगाने वर्षाची चांगली सुरुवात झाली आहे. यामुळे पुढील एक वर्ष काही राशींसाठी खूप शुभ असेल. मुख्यत: 3 राशींना नवीन वर्ष सुखाचं आणि समृद्धीचं जाणार आहे. वर्षभरात या राशींच्या धनसंपत्तीत वाढ होईल. तसेच या राशीच्या लोकांची प्रलंबित कामं पूर्ण होतील. या 3 राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
हिंदू नववर्ष तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. या वर्षी तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. राजकारणात सक्रिय असणारे निवडणूक जिंकू शकतात, तुम्हाला मंत्रीपदही मिळू शकतं. तुम्हाला या वर्षात अनपेक्षित आर्थिक लाभ होईल, तुमची तब्येतही सुधारेल. नोकरी आणि व्यवसायात चांगली प्रगती होईल. या वर्षी तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. तुम्ही या काळात तुमचं ध्येय पूर्ण कराल. तसेच या काळात नोकरदार लोकांना त्यांच्या आवडीनुसार नवीन नोकरी मिळू शकते. या वर्षी तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल.
कर्क रास (Cancer)
हिंदू नववर्ष तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकतं. या वर्षी तुम्ही नवीन गाडी किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. नोकरदारांना पगारवाढ आणि पदोन्नती मिळू शकते. व्यापारी वर्गातील लोक काही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असतील तर तुमचं हे नवीन काम लवकरच सुरू होऊ शकतं. तसेच व्यावसायिकांना यावेळी चांगला फायदा होईल, तुम्ही एखादी चांगली डील फायनल कराल. या वर्षी तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. तसेच, जर तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्हाला कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळू शकतं.
मकर रास (Capricorn)
हिंदू नववर्ष तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतं. या वर्षी तुम्हाला नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. तसेच या वर्षी तुम्ही काही मालमत्ता खरेदी करू शकता. तुम्हाला सन्मान आणि प्रतिष्ठा मिळू शकते. तर व्यापारी 1 मे नंतर एखादा नवीन व्यवसाय सुरू करू शकतात. यावेळी, तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो, त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Gudi Padwa 2024 : गुढीपाडवा सण का साजरा करतात, कधी विचार केलाय? जाणून घ्या गुढीपाडव्याचं महत्त्व