एक्स्प्लोर

Gudi Padwa 2024 : गुढीपाडवा सण का साजरा करतात, कधी विचार केलाय? जाणून घ्या गुढीपाडव्याचं महत्त्व

Gudi Padwa 2024 : हिंदू धर्मात गुढीपाडवा हा खूप महत्त्वाचा सण मानला जातो. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक. त्यामुळेच नवीन गोष्टी सुरू करण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो.

Gudi Padwa 2024 : गुढीपाडवा हा सण हिंदू धर्मात साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो, त्यामुळे या सणाचं महत्त्व अधिक आहे. हिदू कॅलेंडरनुसार, चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा (Gudi Padwa 2024) हा सण साजरा केला जातो. हा सण हिंदू धर्मात साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या दिवशी लोक सोन्याच्या खरेदीला किंवा नवीन वस्तूंच्या खरेदीला प्राधान्य देतात.

यंदाचा गुढीपाडवा हा 9 एप्रिल 2024 ला साजरा करण्यात येणार आहे. पण आपण गुढीपाडव्याचा सण का साजरा करतो? या सणामागची कहाणी तुम्हाला माहितीय का? तर जाणून घेऊया.

गुढीपाडवा का साजरा करतात?

सृष्टीची निर्मिती या दिवशी झाली

गुढीपाडवा विशेषतः महाराष्ट्रात साजरा केला जातो. हिंदू धर्मातील पौराणिक कथांनुसार, ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टीची निर्मिती केली. त्यामुळे गुढीपाडव्याचा हा सण नवीन वर्षाची सुरुवात म्हणून  ग्राह्य धरला जातो. ब्रम्हदेवाला सृष्टीचा निर्माता समजलं जातं.

भगवान श्रीरामाचा विजय दिन

प्रभू श्रीरामाने रावणावर विजय मिळवला आणि ते अयोध्येत परतले तेव्हा, त्या दिवसापासून गुढीपाडवा साजरा केला जातो, अशी मान्यता आहे. प्रभू श्रीरामाचं अयोध्येत आगमन झालं तेव्हा आनंद साजरा करण्यासाठी लोकांनी आपापल्या घरांवर ध्वज फडकावला होता.

शालीवाहन शक

शालीवाहन नावाच्या राजाने हूणांचा पराभव करून शालीवाहन शक सुरू केला. त्या दिवशी चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस होता.

इतर पौराणिक कथा

गुढीपाडव्याशी संबंधित अनेक पौराणिक कथा आहेत. एका कथेनुसार, या दिवशी भगवान विष्णूंनी मत्स्यावतार धारण करून पृथ्वीला जलप्रलयापासून वाचवलं. तर दुसऱ्या कथेनुसार, गुढीपाडव्याच्या दिवशी हनुमानाने सूर्याला ग्रहणापासून मुक्त केलं.

गुढीपाडव्याचे महत्त्व काय?

गुढीपाडवा सणापासून हिंदूधर्मीयांचं नववर्ष सुरू होतं. चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी गुढीपाडवा साजरा केला जातो. मराठी नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते.

नवीन कार्याला सुरुवात करण्यासाठी दिवस महत्त्वाचा

गुढीपाडव्याला अनेक लोक नवीन व्यवसाय सुरू करतात, नवीन गोष्टी शिकण्यास सुरुवात करतात आणि नवीन ध्येय ठरवतात.

खरेदीसाठी दिवस शुभ

घरात नवीन वस्तूंची खरेदी या दिवशीच केली जाते. गाडी, सोनं यासारख्या वस्तूंची खरेदी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर केली जाते. गुढीपाडव्याला पर्यावरणीय महत्त्व देखील आहे. या दिवशी लोक निसर्गाचे आभार मानून त्याचे रक्षण करण्याचा संकल्प करतात.

हेही वाचा:

Gudi Padwa 2024 :आला सण गुढीपाडव्याचा... यंदा 'या' मुहूर्तावर गुढी उभारणं ठरेल शुभ; वर्ष जाईल सुख-समृद्धीचं

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 27 November 2026: आज संकष्टी चतुर्थीचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य...
आज संकष्टी चतुर्थीचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य...
Lucky Zodiac Signs : उद्याचा दिवस 5 राशींसाठी ठरणार भाग्यशाली; देवी लक्ष्मीच्या कृपेने हातात येणार पैसा, बॅंक बॅलेन्स दुप्पट वाढणार
उद्याचा दिवस 5 राशींसाठी ठरणार भाग्यशाली; देवी लक्ष्मीच्या कृपेने हातात येणार पैसा, बॅंक बॅलेन्स दुप्पट वाढणार
Chanakya Niti : आयुष्यात नेहमीच जाणवते पैशांची तंगी; 'या' 3 स्वभावाच्या व्यक्तींवर लक्ष्मी कधीही प्रसन्न होत नाही, चाणक्य सांगतात...
आयुष्यात नेहमीच जाणवते पैशांची तंगी; 'या' 3 स्वभावाच्या व्यक्तींवर लक्ष्मी कधीही प्रसन्न होत नाही, चाणक्य सांगतात...
Gajkesari Rajyog 2026 : नोव्हेंबरचा शेवटचा दिवस 3 राशींसाठी भाग्याचा; गजकेसरी राजयोगामुळे हातात टिकणार पैसा, देवी लक्ष्मीचीही राहील कृपा
नोव्हेंबरचा शेवटचा दिवस 3 राशींसाठी भाग्याचा; गजकेसरी राजयोगामुळे हातात टिकणार पैसा, देवी लक्ष्मीचीही राहील कृपा

व्हिडीओ

No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report
Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..
Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vasai Crime News : वसईत बहिणीनेच भावाला चाकूने भोसकून संपवलं; घरात घेण्याच्या वादातून थरार, आरोपी ताब्यात
वसईत बहिणीनेच भावाला चाकूने भोसकून संपवलं; घरात घेण्याच्या वादातून थरार, आरोपी ताब्यात
Parliament Session : 30 नोव्हेंबर रोजी लोकसभा, तर 2 डिसेंबरला राज्यसभेचे अधिवेशन; मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकासाठी सरकारकडून मोठ्या हालचाली
30 नोव्हेंबर रोजी लोकसभा, तर 2 डिसेंबरला राज्यसभेचे अधिवेशन; मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकासाठी सरकारकडून मोठ्या हालचाली
Packaged Food Label : पॅकेटबंद खाद्यपदार्थांवर 'हाय फॅट, शुगर, सॉल्ट'चा इशारा देणारा षटकोन छापा, सुप्रीम कोर्टाचे FSSAI ला मोठे निर्देश
पॅकेटबंद खाद्यपदार्थांवर 'हाय फॅट, शुगर, सॉल्ट'चा इशारा देणारा षटकोन छापा, सुप्रीम कोर्टाचे FSSAI ला मोठे निर्देश
तलाठी कार्यालयात घुसून वाळू माफियाचा तलाठ्यावर हल्ला; रुग्णालयात उपचार सुरू, कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा
तलाठी कार्यालयात घुसून वाळू माफियाचा तलाठ्यावर हल्ला; रुग्णालयात उपचार सुरू, कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा
शरद पवारांच्या राष्ट्रवादीने प्रदेशाध्यक्ष बदलल्या; रोहिणी खडसेंच्या जागी अंजली साळवे, कोण आहेत नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष
शरद पवारांच्या राष्ट्रवादीने प्रदेशाध्यक्ष बदलल्या; रोहिणी खडसेंच्या जागी अंजली साळवे, कोण आहेत नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष
Sharankumar Limbale : बेळगाव पाकिस्तानात आहे का? मराठी बोलणारं सगळं जग महाराष्ट्रात आणणार का? साहित्य संमेलन अध्यक्षांची मुक्ताफळे, सीमाभागातील जनतेच्या जखमेवर मीठ
बेळगाव पाकिस्तानात आहे का? मराठी बोलणारं सगळं जग महाराष्ट्रात आणणार का? साहित्य संमेलन अध्यक्षांची मुक्ताफळे, सीमाभागातील जनतेच्या जखमेवर मीठ
ही बाब मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी; रोहित पाटलांची टीका, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मैदानात
ही बाब मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी; रोहित पाटलांची टीका, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मैदानात
महाबीजमध्ये 35 वर्षांपासून काम करणाऱ्या 26 कामगारांना थेट कामावरुन काढले, कामगारमंत्र्यांच्या जिल्ह्यातच अन्याय
महाबीजमध्ये 35 वर्षांपासून काम करणाऱ्या 26 कामगारांना थेट कामावरुन काढले, कामगारमंत्र्यांच्या जिल्ह्यातच अन्याय
Embed widget