(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aquarius Weekly Horoscope 05 To 11 August 2024 : कुंभ राशीसाठी नवीन आठवडा चढ-उतारांचा; करिअर, शिक्षणाच्या बाबतीत 'हा' निर्णय घेऊ नका, वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Aquarius Weekly Horoscope 05 To 11 August 2024 : कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? कुंभ राशीचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.
Aquarius Weekly Horoscope 05 To 11 August 2024 : राशीभविष्यानुसार, ऑगस्ट महिन्याचा दुसरा आठवडा उद्यापासून सुरु होणार आहे. या दरम्यान तुमचं लव्ह लाईफ बहरलेलं असेल. नोकरी-व्यवसायात तुम्हाला यश मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. एकूणच कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? कुंभ राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
कुंभ राशीचे प्रेमसंबंध (Aquarius Love Life Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा काहीसा चांगला असणार आहे. या आठवड्यात तुम्ही एकमेकांच्या नात्याला अधिक वेळ देणं गरजेचं आहे. पार्टनरबरोबर कोणतीही गोष्ट व्यक्त करताना काळजी घ्या. तसेच, जर तुमच्या दोघांचे विचार जरी सारखे नसतील तरी लगेच हायपर होऊ नका, शांतीने परिस्थिती हाताळा. सिंगल लोक मिंगल होण्याची शक्यता आहे.
कुंभ राशीचे करिअर (Aquarius Career Horoscope)
तुम्ही ऑफिसमधील पॉलिटिक्सपासून दूर राहणंच गरजेचं आहे. टीम प्रोजेक्टमध्ये सिनीअर्सकडून तुम्हाला चांगली मदत मिळू शकते. तसेच, जे उद्योगपती आहेत त्यांना आपल्या व्यवसायावर जास्त पैसा लावण्याची गरज भासू शकते. जे विद्यार्थी हायर एज्युकेशनच्या शोधात आहेत त्यांना लवकरच चांगल्या कॉलेजमध्ये संधी मिळू शकते. तसेच, आपल्या ज्युनिअर्सच्या पर्सनल गोष्टींमध्ये हस्तक्षेप करू नका. या आठवड्यात तुमचा कामानिमित्त प्रवास होईल. व्यावसायिक या आठवड्यात चांगला नफा कमवतील, तुम्ही एखादा नवीन जोड व्यवसाय देखील सुरू करू शकता.
कुंभ राशीची आर्थिक स्थिती (Aquarius Wealth Horoscope)
या आठवड्यात तुम्हाला छोट्या-मोठ्या आर्थिक समस्या जाणवतील. तसेच, आठवड्याबरोबर तुमचे दिवसही चांगले जातील. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी हा आठवडा चांगला असणार आहे. या आठवड्यत भावंडांसोबत चाललेले मालमत्तेशी संबंधित वाद सुटतील. वडिलधारे लोक मुलांमध्ये मालमत्तेची विभागणी करू शकतात.
कुंभ राशीचे आरोग्य (Aquarius Health Horoscope)
या आठवड्यात तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. काही कुंभ राशीच्या लोकांना त्वचेशी संबंधित समस्या, घशाशी संबंधित समस्या आणि ताप उद्भवण्याची शक्यता आहे. गाडी चालवताना सावधगिरी बाळगा, अन्यथा अपघात होण्याची शक्यता आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: