Anant Ambani Wedding: अन्नदान श्रेष्ठदान! धाकट्या लेकाच्या लग्नाआधी अंबानींनी केलं अन्नदान, जामनगरमध्ये उठल्या 60 हजार लोकांच्या पंगती
Anant Ambani Wedding: अंबानी कुटुंब नेहमीच अशा खास प्रसंगी अन्नदान करत असते. हिंदू धर्मात अन्नदान सर्व दानात श्रेष्ठ दान आहे अन्नदान म्हणजे जीवनदान देण्यासारखे आहे. अन्नदान हे श्रेष्ठ आणि पुण्यकारक मानले जाते.
Annadan : मुकेश अंबानींचा (Mukesh Ambani) धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांच्या तीन दिवसीय प्री-वेडिंग कार्यक्रमांना आजपासून जामनगरमध्ये सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षी दोघांचा साखरपुडा झाला होता, त्यानंतर आता जामनगरमध्ये प्री-वेडिंग होईल आणि लग्न मुंबईत होणार आहे. प्री - वेडिंगची सुरुवात सर्वात श्रेष्ठ मानल्या जाणाऱ्य अन्नदानाने केली आहे. यासाठी संपूर्ण अंबानी कुटुंबाने जामनगरमधील रिलायन्स टाउनशिपजवळील जोगवाड गावात सुमारे 60 हजार जणांना अन्नदान केले. अंबानी कुटुंब नेहमीच अशा खास प्रसंगी अन्नदान करत असते. हिंदू धर्मात अन्नदान सर्व दानात श्रेष्ठ दान आहे अन्नदान म्हणजे जीवनदान देण्यासारखे आहे. अन्नदान हे श्रेष्ठ आणि पुण्यकारक मानले जाते.
हिंदू धर्मात अन्नदान केल्याशिवाय कोणताही जप, तप, यज्ञ इत्यादी पूर्ण होत नाहीत. अन्न ही एकच गोष्ट आहे जी शरीराबरोबरच आत्म्यालाही तृप्त करते. त्यामुळेच काही दान करायचे असेल तर अन्नदान करा, असे सांगितले आहे. अन्नदान करण्याचे अनेक फायदे आहेत. अनंक अंबानी आणि राधिका मर्चंट हे नव्या आयुष्याला सुरवात करत आहे. नवी सुरुवत करताना आशीर्वाद महत्त्वाचा असतो. त्यामुळे अंबानी कुंटुबांने प्री वेडिंगची सुरुवात अन्नदानाने केली आहे. लग्न, वाढदिवस, पूजा अशा मंगलप्रसंगी जेवल्याशिवाय घराबाहेर पडू दिले जात नाही. आपल्याकडे आलेल्या पाहुण्याचा आत्मा तृप्त होऊन आशीर्वाद देईल आणि जीवनात आनंद येईल. अन्नदान केल्यावर लोकांच्या अंतःकरणातून निघणाऱ्या प्रार्थना आणि आशीर्वाद त्यांना जीवनातील संकटांपासून वाचवण्यासाठी ढालीसारखे काम करतात, असे म्हटले जाते.
अन्नदान का केले जाते?
अन्नदान करणे खूप महत्वाचे आहे कारण यामुळे व्यक्तीला त्वरित आशीर्वाद मिळतात. जेव्हा एखादी व्यक्ती लोकांना जेवण देते, तेव्हा तो तृप्त झाल्यावर लगेच आशीर्वाद देतो. म्हणूनच देवालाही नैवेद्य दाखवला जातो. अर्पण केल्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही. त्यामुळे पितृ पक्षामध्ये 15 दिवस ब्राह्मण, गरजू लोक, गायी, कावळे इत्यादींना दररोज अन्नदान केले जाते आणि या काळात अनेक प्रकारचे पदार्थही तयार केले जातात.
अन्नदान कधी करावे?
- वाढदिवस, लग्न, वास्तूशांती, पितृ पक्ष, पुण्यतिथी यासारख्या विशेष प्रसंगी तुम्ही गरीब आणि गरजूंना अन्नदान केलेच पाहिजे.
- ज्यावेळी तुम्ही अन्नदान करता त्यावेळी आग्रहाने तुमच्या पाहुण्यांना जेवण वाढावे.
- अन्न दान शक्य नसेल गरीबांना जेवणाची पाकिटे आणि सुका शिधा दान करावा.
- एखाद्या धार्मिक ठिकाणी किंवा कुठेही तुम्हाला जर एका व्यक्तीने गरजू जेवणाची विनंती केली तर त्या व्यक्तीला तुम्हाला जमेल ते जेवण द्यावे.
- जेव्हाही तुम्ही कुठेतरी अन्न किंवा पेय घेत असाल किंवा कुठेतरी बाहेर असाल आणि एखादी गरजू व्यक्ती तुम्हाला त्याला खाऊ घालण्याची विनंती करेल, तेव्हा त्याला नक्कीच खायला द्या.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा :