एक्स्प्लोर

Ambedkar Jayanti 2024 : आंबेडकर जयंतीदिनी बनले अनेक शुभ योग; मेषसह 'या' राशींचं भाग्य उजळणार, नोकरी-व्यवसायात मिळणार यश, करा 'हे' उपाय

Panchang 14 April 2024 : आज रवि योग, सुकर्मा योगासह अनेक शुभ योग तयार होत आहेत, त्यामुळे आजचा दिवस मेषसह 5 राशींसाठी लाभदायक ठरणार आहे. या 5 राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

Astrology Today 14 April 2024 : आज, रविवार, 14 एप्रिल, चैत्र नवरात्रीची सहावी माळ आहे. तसेच, आज चंद्र मिथुन राशीत प्रवेश करणार आहे आणि मेष राशीत सूर्य आणि गुरूसोबत बुध ग्रहाचा संयोग होणार आहे. चैत्र नवरात्रीच्या सहाव्या दिवशी सुकर्म योग, त्रिपुष्कर योग, रवियोग आणि अर्द्रा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचं महत्त्व अधिक वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना आज बनत असलेल्या शुभ योगांचा फायदा होणार आहे. या भाग्यवान 5 राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊया.

मेष (Aries Horoscope Today)

आजचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी खूप खास असणार आहे. मेष राशीच्या लोकांना आज सर्जनशील कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. आज तुम्हाला कुटुंबातील सदस्यांकडून काही चांगली बातमी मिळेल. कामाच्या शोधात असलेल्या लोकांना चांगल्या नोकरीची ऑफर मिळू शकते. आज तुमचा जाणकार लोकांशी संवादही वाढेल. वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतील. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत एखाद्या धार्मिक स्थळी जाऊ शकता. रविवारच्या सुट्टीमुळे जुन्या मित्रांना भेटण्याची आणि धार्मिक कार्यात उत्साहाने सहभागी होण्याची संधी मिळेल. कौटुंबिक जीवन चांगलं राहील. आज तुम्ही मुलांसोबत फिरायलाही जाऊ शकता.

मेष राशीसाठी रविवारचा उपाय : नोकरी आणि व्यवसायात प्रगतीसाठी तांब्याच्या भांड्यात तांदूळ, काही लाल मिरचीचे दाणे आणि लाल फुलं मिसळून सूर्यदेवाला अर्पण करा.

मिथुन (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक आहे. मिथुन राशीच्या लोकांच्या जीवनातील समस्या आजपासून कमी होतील. तुम्ही मित्रांसोबत नोकरी बदलण्याचा विचार देखील करू शकता. जर तुम्ही आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्येने त्रस्त असाल तर आज  तुमचं आरोग्य सुधारेल. अविवाहित लोकांना एखादी खास व्यक्ती भेटू शकते. तुम्ही कुटुंबातील तुमच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल आणि लोक तुमची प्रशंसा करतील. रविवारची सुट्टी असल्यामुळे आज तुम्ही संपूर्ण कुटुंबासह देवीच्या मंदिरात जाऊ शकता. आज व्यवसायिक नफा कमावण्यासाठी काही नवीन योजना आखतील, ज्या भविष्यात फायदेशीर ठरतील. आज तुम्ही चांगल्या मूडमध्ये असाल आणि संध्याकाळी मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल.

मिथुन राशीच्या लोकांसाठी रविवारचा उपाय : पैशाशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी पाण्यात गूळ आणि तूप अर्पण करा आणि सूर्य चालिसाचा पाठ करा.

वृश्चिक (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ आहे. विवाहयोग्य लोकांसाठी चांगले विवाह प्रस्ताव येतील आणि घरात उत्साहाचं वातावरण असेल. तुमच्या उत्पन्नात वाढ झाल्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. तुमच्या कोणत्याही कामात काही अडथळे येत असतील तर आज तुमच्या भावा-बहिणींच्या मदतीने ते दूर होतील. सामाजिक कार्यक्रमात तुम्ही उत्साहाने सहभागी व्हाल, जिथे तुमचा सन्मान लक्षणीय वाढेल. व्यापारी आज दिवसभर व्यावसायिक कामात व्यस्त राहतील आणि चांगला नफा कमावतील. तुम्ही तुमच्या जोडीदार आणि मुलांसोबत बाहेर फिरायला जाऊ शकता, जिथे तुमचा वेळ खूप छान जाईल आणि प्रत्येकजण आनंदी असेल.

वृश्चिक राशीसाठी रविवारचा उपाय : तांब्याची दोन नाणी घ्या. यापैकी एक हातात घ्या आणि मनात कोणताही संकल्प करून  ते वाहत्या पाण्यात टाका आणि दुसरं नेहमी खिशात ठेवा. तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल.

धनु (Sagittarius Horoscope Today) 

आजचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी चांगला असणार आहे. धनु राशीच्या लोकांना आज संपूर्ण कुटुंबासह मंदिरात वैगेरे जाता येईल. रविवारच्या सुट्टीमुळे घरातील अनेक कामं पूर्ण होतील. तुमचा पैसा कुठेतरी अडकला असेल तर, देवीच्या कृपेने तुम्हाला तुमचे पैसे आज परत मिळू शकतात. तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाचं नियोजन करावं लागेल. जे लोक प्रेमसंबंधात आहेत, ते आज त्यांच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवतील, ज्यामुळे तुमच्या नात्यात प्रेम आणि आपुलकी वाढेल. तुम्ही तुमच्या भावांकडून काही मदत मागितली तर आज तुम्हाला ती सहज मिळेल आणि तुमच्या व्यवसायात प्रगती झाल्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील.

धनु राशीसाठी रविवारचा उपाय : रविवारी रात्री पलंगाच्या कडेला दूध ठेवा आणि दुसऱ्या दिवशी ते बाभळीच्या झाडाच्या मुळांमध्ये टाका.

मीन (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सकारात्मक असणार आहे. आज प्रलंबित पैसे वसूल झाल्यामुळे मीन राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि तुमचे विरोधक देखील तुमचं काहीही नुकसान करू शकणार नाही. तुम्ही फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्या पालकांचा सल्ला जरूर घ्या. आज व्यवसायिकांना डोक्याने विचार करून काही योजना कराव्या लागतील, तरच त्यांना चांगला नफा मिळेल. आज मित्रांशी बोलल्याने तुमच्या काही जुन्या आठवणी ताज्या होतील आणि तुम्ही कामाचं नियोजन सुरू करू शकता. तुम्ही कुटुंबातील सदस्यांसह घराच्या नूतनीकरणावर चर्चा करू शकता आणि तुमच्या जोडीदारासोबत नवीन मालमत्ता खरेदी करू शकता.

मीन राशीसाठी रविवारचा उपाय : रविवारी तीन झाडू खरेदी करा आणि दुसऱ्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर जवळच्या मंदिरात ठेवा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Weekly Lucky Zodiacs : नवीन आठवडा 'या' 5 राशींसाठी ठरणार अत्यंत शुभ; विविध स्रोतांतून होणार धनप्राप्ती, नांदणार सुख-समृद्धी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kisse Pracharache Seg 02 : किस्से प्रचाराचे, रिपोर्टर 'माझा'चे; महायुती की मविआ कुणाची बाजी?Kisse Pracharache Seg 04 : किस्से प्रचाराचे, रिपोर्टर 'माझा'चे; महायुती की मविआ कुणाची बाजी?Kankavli Vidhan Sabha : निवडणूक निकालांसाठी प्रशासनाची जय्यत तयारी, कडेकोट सुरक्षा तैनातNashik Vidhan Sabha : दादासाहेब गायकवाड सभागृहात स्ट्राँग  रूमची उभारणी,प्रशासकीय यंत्रणा सज्ज

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
Embed widget