एक्स्प्लोर

शेतकऱ्यांनी पेरणी कधी करावी? पेरणीसाठी योग्य पाऊस झालाय का? तज्ज्ञांनी काय दिला सल्ला…

सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळं या काळात शेतकऱ्यांनी (Farmers) पेरणी (Sowing) करणं योग्य होईल का? असा सवाल उपस्थित केला जातोय. पाहुयात याबाबतची सविस्तर माहिती.

Agriculture News : राज्याच्या सर्वच भागात हळूहळू मान्सून (Monsoon) सक्रिय होत आहे. कोकणानंतर मान्सून आता मुंबईत (Mumbai) दाखल झाला आहे. 15 जूनपर्यंत राज्याच्या सर्व भागात मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवली जातेय. दरम्यान, सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळं या काळात शेतकऱ्यांनी (Farmers) पेरणी (Sowing) करणं योग्य होईल का? असा सवाल उपस्थित केला जातोय. याबाबत हवामान अभ्यासक आणि शेती प्रश्नाचे अभ्यासक माणिकराव खुळे यांनी माहिती दिली आहे. शेतकऱ्यांनी खात्रीच्या ओलीवरच व सिंचनाची काही सोय असेल अश्याच ठिकाणी स्वतःच्या निर्णयावरच पेरणीचे धाडस 20 जून दरम्यान करावे, असा सल्ला माणिकराव खुळे यांनी दिला आहे. ते नेमकं काय म्हणालेत ते पाहुयात.  

 20 जून दरम्यान शेतकऱ्यांनी पेरणी करावी

महाराष्ट्रात 15 जूनपर्यंत जो काही पाऊस होईल, त्या ओलीवरच चांगल्या प्रतीच्या जमिनीत व जिथे 10 से. मी.चांगली ओल साध्य झाली असेल म्हणजे पेर-उतार नंतर पीक रोप 30 ते 40 दिवस दम धरेल अशाच खात्रीच्या ठिकाणी, 20 जून दरम्यान पेरणी होवु शकते, असे माणिकराव खुळे म्हणाले. त्यामुळं शेतकऱ्यांनी खात्रीच्या ओलीवरच व सिंचनाची काही सोय असेल अशाच ठिकाणी स्वतःच्या निर्णयावरच पेरणीचे धाडस 20 जून दरम्यान करावे. कारण 15 जूननंतर कदाचित पुन्हा पावसाचा जोर कमी होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. म्हणून फार सावधगिरीने, संयमाने पेरणीचे पाऊल टाकावे असे माणिकराव खुळे म्हणाले.

शेती कामांना वेग

पावसाअभावी शेतीची काम खोळंबली होती. त्या कामांना आता वेग आला आला आहे. दरम्यान, 100 मिलीमीटर पाऊस पडेपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये असा सल्ला काही कृषी तज्ज्ञांनी दिला आहे. दुबार पेरणीची अडचण टाळण्यासाठी कृषी तज्ज्ञांनी हा सल्ला दिला आहे. अनेक भागांमध्ये पाऊस जरी होत असला तरीसुद्धा 75 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय कुठेही शेतकर्‍यांनी पेरणी करु नये. पेरणीची घाई करु नये असे कृषी तज्ज्ञांनी सांगितलं आहे. जोपर्यंत शेतामध्ये तीन ते चार इंच ओल निर्माण होत नाही तोपर्यंत पेरणी करणे हे धोकादायक ठरु शकते. दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर येऊ शकतं, जे आज परवडणार नाही. त्यामुळं शेतकऱ्यांनी आत्ताच पेरणीची घाई करु नये. चांगला पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी असं सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.

 महत्वाच्या बातम्या:

10 ते 14 जूनपर्यंत मान्सून संपूर्ण राज्य व्यापणार, पुढील चार दिवस 'या' भागात मुसळधार पाऊस, पंजाबराव डखांचा अंदाज

महत्त्वाच्या बातम्या

Parbhani: दुष्काळाने सोयाबीनचा हाती आलेला घास हिरावला! उरलं सुरलं पीक पदरात पाडण्यासाठी शेतकऱ्याची धडपड; परभणीतील विदारक चित्र
दुष्काळाने सोयाबीनचा हाती आलेला घास हिरावला! उरलं सुरलं पीक पदरात पाडण्यासाठी शेतकऱ्याची धडपड; परभणीतील विदारक चित्र
नानांमुळं आमच्या डोक्यावरचा हंडा खाली आला, पाण्याच्या थेंबा थेंबात त्यांची आठवण येत राहिल, नानांच्या आठवणीत महिला भावूक 
नानांमुळं आमच्या डोक्यावरचा हंडा खाली आला, पाण्याच्या थेंबा थेंबात त्यांची आठवण येत राहिल, नानांच्या आठवणीत महिला भावूक 
Jalgaon Drought: जळगावमध्ये चाऱ्याचं मोठं संकट; जनावरांसाठी जेमतेम महिनाभराचा चारा शिल्लक, जनावरं जगवायची कशी? शेतकऱ्यांनी मांडली व्यथा
जळगावमध्ये चाऱ्याचं मोठं संकट; जनावरांसाठी जेमतेम महिनाभराचा चारा शिल्लक, जनावरं जगवायची कशी? शेतकऱ्यांनी मांडली व्यथा
वर्षभरात साखरेच्या दरात 20 टक्के वाढ, साखर कंपन्यांच्या शेअर्समध्येही तेजी, दरात आणखी वाढ होणार का?
वर्षभरात साखरेच्या दरात 20 टक्के वाढ, साखर कंपन्यांच्या शेअर्समध्येही तेजी, दरात आणखी वाढ होणार का?

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Devendra Fadnavis: पदावर नसताना पेपर फुटला, मग MPSC अध्यक्षांचा राजीनामा कसा घेणार? तरीही चौकशीसाठी तयार : देवेंद्र फडणवीस
पदावर नसताना पेपर फुटला, मग MPSC अध्यक्षांचा राजीनामा कसा घेणार? तरीही चौकशीसाठी तयार : देवेंद्र फडणवीस
पुण्यातून मंगेश चिवटेंची माघार; अर्ज भरायला गेलल्या उदय सामंतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, भविष्यात ती रणनीती राहील
पुण्यातून मंगेश चिवटेंची माघार; अर्ज भरायला गेलल्या उदय सामंतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, भविष्यात ती रणनीती राहील
Nobel Peace Prize : डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल मिळावा म्हणून शिफारस करणाऱ्या पाकिस्तानची फजिती, शहबाझ शरीफ यांचा अपेक्षाभंग
ट्रम्प यांना शांततेचा नोबेल मिळावा म्हणून शिफारस करणाऱ्या पाकिस्तानची फजिती, शहबाझ शरीफ यांचा अपेक्षाभंग
Delhi CJP Protest: 'माशा मारण्यासाठी हातोड्याचा वापर करू नका..' सीजेपी आंदोलनापूर्वी देशव्यापी रेल्वेगाड्या, मेट्रो बंदीच्या फतव्यावर सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकारला फटकार
'माशा मारण्यासाठी हातोड्याचा वापर करू नका..' सीजेपी आंदोलनापूर्वी देशव्यापी रेल्वेगाड्या, मेट्रो बंदीच्या फतव्यावर सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकारला फटकार
Embed widget