एक्स्प्लोर

Lumpy Skin Disease : पशुपालकांनो सावधान! लम्पी स्कीन वाढतोय, देशातील 'या' राज्यात प्रादुर्भाव

राज्यातील अहमदनगर, जळगाव, अकोला, धुळे, पुणे, औरंगाबाद, लातूर व बीड या जिल्ह्यातील जनावरांमध्ये लम्पी आजार आढळून आला आहे. त्यामुळं पशुपालकांनी आपल्या जनावरांची योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे.

Lumpy Skin Disease : सध्या राज्यातील पशुपालक चिंतेत आहेत. कारण जनावरांवर लम्पी स्कीन (Lumpy Skin) या आजाराचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. राज्यातील अहमदनगर, जळगाव, अकोला, धुळे, पुणे, औरंगाबाद, लातूर व बीड या जिल्ह्यातील जनावरांमध्ये लम्पी आजार आढळून आला आहे. लम्पी त्वचा रोग हा केवळ गोवंश व महिष वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. हा रोग कीटकांपासून पसरतो. त्यामुळं पशुपालकांनी आपल्या जनावरांची योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे. देशातील विविध राज्यात याचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. दरम्यान, या आजाराची लक्षणं काय आहेत आणि पशुपालकांनी नेमकी काय काळजी घ्यावी याबाबतची माहिती पाहुयात...

भारतातील या राज्यात प्रादुर्भाव

2020-21 मध्ये राज्यातील 26 जिल्ह्यांमध्ये, तसेच 2021-22 मध्ये 10 जिल्ह्यात लम्पी त्वचा रोग प्रादुर्भाव आढळून आलेला होता. सध्या भारतातील राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाना, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्मीर, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि दिल्ली या राज्यात पशुधनामध्ये रोगाचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे.  राज्यात सर्वप्रथम  4 ऑगस्ट 2022 रोजी जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील चिनावल या गावामध्ये लम्पी स्कीन डिसिज सदृष्य रोगाची लागण झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनतर राज्यामध्ये अहमदनगर, अकोला, पुणे, धुळे, लातूर, औरंगाबाद, बीड, सातारा, बुलडाणा व अमरावती या जिल्ह्यामध्ये लम्पी त्वचा रोग प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनास आले आहे.

'लम्पी स्कीन' हा पशुधानातील वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार असला तरी पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. पशुपालकांनी काळजी सतर्क राहून काळजी घेण्याची आवश्यकता आहे. जनावरांची वेळीच काळजी घेतल्यास आपल्या जनावाराला लम्पी आजारा लागण होण्यापासून वाचवता येते. 

लम्पी स्कीन आजाराची प्रमुख लक्षणे काय?
 
या आजाराचा संसर्ग झाल्यास प्रथम जनावरांच्या डोळयातून आणि नाकातून पाणी येते.
लसिकाग्रंथीना सूज येते. 
सुरुवातीला जनावरांना ताप येतो. 
दुधाचे प्रमाण कमी होते. 
चारा खाणे, पाणी पिणे कमी होते. 
हळूहळू डोके, मान, मायांग, कास इत्यादी भागाच्या त्वचेवर 10 ते 50 मिमी व्यासाच्या गाठी येतात.
तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा खाण्यास त्रास होतो.
डोळ्यातील व्रणामुळे चिपडे येतात, तसेच डोळ्यांची दृष्टी बाधित होते. 
पायावर सूज येवून काही जनावरे लंगडतात.
 
पशुपालकांनी काय काळजी घ्यावी

लम्पी त्वचा रोग हा संसर्गजन्य रोग असल्याने उपचार करण्यापेक्षा रोग येऊच नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना व रोग आल्यास त्याचा प्रसार होऊ नये याकरिता पशुपालकांनी आवश्यक ती काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

बाह्य किटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गोठ्यांची व्यवस्थित स्वच्छता राखावी. 
निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून वेगळे बांधावे. 
गायी व म्हशींना एकत्रित ठेवण्यात येवू नये. 
रोग सदृश लक्षणे आढळल्यास जवळच्या पशुवैद्यकीय संस्था प्रमुखांना तातडीने संपर्क साधावा. 
बाधित जनावरांच्या पिण्याच्या पाण्याकरिता व तसेच चराईकरिता स्वतंत्र व्यवस्था करावी. 
गोठ्यात त्रयस्थांच्या भेटी टाळाव्यात.  
बाधित परिसरात स्वच्छता करावी व निर्जंतुक द्रावणाची परिसरात फवारणी करावी. 
फवारणीसाठी 1 टक्के फॉर्मलीन किंवा 2 ते 3 टक्के सोडियम हायपोक्लोराईट, फिनॉल 2 टक्के यांचा वापर करावा 
या रोगाने ग्रस्त जनावरांचा मृत्यू झाल्यास मृतदेहाची शास्त्रीय पद्धतीने कमीत कमी ८ फूट खोल खड्डयात गाडून विल्हेवाट लावावी.
मृत जनावरांच्या खाली व वर चुन्याची पावडर टाकण्यात यावी. 

महत्त्वाच्या बातम्या:

Indigenous vaccine : पशुपालकांना दिलासा! आता लंपी त्वचा आजारावर रामबाण उपाय, स्वदेशी 'लंपी प्रो वॅक्सीन' लसीचा कृषीमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

YS Jagan Mohan Reddy : माजी सीएम जगन मोहन रेड्डी आणि बहिणीमध्ये 20 एकर जमीन अन् कोट्यवधींच्या शेअर्सवरून वाद पेटला!
माजी सीएम जगन मोहन रेड्डी आणि बहिणीमध्ये 20 एकर जमीन अन् कोट्यवधींच्या शेअर्सवरून वाद पेटला
2024 मध्ये भाजपचा मुख्यमंत्री, तर 2029 ला मनसेचा मुख्यमंत्री लिहून घ्या : राज ठाकरे
2024 मध्ये भाजपचा मुख्यमंत्री, तर 2029 ला मनसेचा मुख्यमंत्री लिहून घ्या : राज ठाकरे
Raj Thackeray : कोणत्या बहिणीने फुकट पैसे मागितले? अशाने महाराष्ट्र दिवाळखोरीत निघेल; लाडकी बहिण योजनेवरून राज ठाकरेंनी फटकारले
कोणत्या बहिणीने फुकट पैसे मागितले? अशाने महाराष्ट्र दिवाळखोरीत निघेल; लाडकी बहिण योजनेवरून राज ठाकरेंनी फटकारले
तुळजापूरचं धोतर विधानसभेवर जाणारचं, काँग्रेसच्या माझी मंत्र्यानं हाती घेतला बंडाचा झेंडा
तुळजापूरचं धोतर विधानसभेवर जाणारचं, काँग्रेसच्या माझी मंत्र्यानं हाती घेतला बंडाचा झेंडा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Majha Vision : महाराष्ट्राचा चिखल, पवारांवर हल्ला, अमितची उमेदवारी; राज ठाकरे UNCUTABP Majha Headlines : 3 PM : 30 OCT 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaRaj Thackeray Majha Vision : अमित ठाकरे का उतरले मैदानात? वडिलांनीच सांगितली INSIDE STORYDevendra Fadnavis Majha Vision : मनसुख हिरेनची हत्या ते मलिकांना तिकीट, फडणवीसांनी सगळंच सांगितलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
YS Jagan Mohan Reddy : माजी सीएम जगन मोहन रेड्डी आणि बहिणीमध्ये 20 एकर जमीन अन् कोट्यवधींच्या शेअर्सवरून वाद पेटला!
माजी सीएम जगन मोहन रेड्डी आणि बहिणीमध्ये 20 एकर जमीन अन् कोट्यवधींच्या शेअर्सवरून वाद पेटला
2024 मध्ये भाजपचा मुख्यमंत्री, तर 2029 ला मनसेचा मुख्यमंत्री लिहून घ्या : राज ठाकरे
2024 मध्ये भाजपचा मुख्यमंत्री, तर 2029 ला मनसेचा मुख्यमंत्री लिहून घ्या : राज ठाकरे
Raj Thackeray : कोणत्या बहिणीने फुकट पैसे मागितले? अशाने महाराष्ट्र दिवाळखोरीत निघेल; लाडकी बहिण योजनेवरून राज ठाकरेंनी फटकारले
कोणत्या बहिणीने फुकट पैसे मागितले? अशाने महाराष्ट्र दिवाळखोरीत निघेल; लाडकी बहिण योजनेवरून राज ठाकरेंनी फटकारले
तुळजापूरचं धोतर विधानसभेवर जाणारचं, काँग्रेसच्या माझी मंत्र्यानं हाती घेतला बंडाचा झेंडा
तुळजापूरचं धोतर विधानसभेवर जाणारचं, काँग्रेसच्या माझी मंत्र्यानं हाती घेतला बंडाचा झेंडा
Ayushman Bharat Pradhan Mantri Jan Arogya Yojana : आजपासून 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या वृद्धांसाठी 5 लाख रुपयांचे मोफत उपचार
आजपासून 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या वृद्धांसाठी 5 लाख रुपयांचे मोफत उपचार
Video: अमित ठाकरेंसाठी माहीमच का निवडला; मनसे अध्यक्षांनी सांगितली 'राज की बात'
Video: अमित ठाकरेंसाठी माहीमच का निवडला; मनसे अध्यक्षांनी सांगितली 'राज की बात'
Raj Thackeray: अहो, माझ्या पक्षाची निशाणी कमावलेली, ढापलेली नव्हे; राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अहो, माझ्या पक्षाची निशाणी कमावलेली, ढापलेली नव्हे; राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
परमबीर सिंह आणि सचिन वाझेंनी मनसुख हिरेनची हत्या घडवून आणली, अनिल देशमुखांचा आरोप, म्हणाले, फडणवीसांना याची कल्पना होती
परमबीर सिंह आणि सचिन वाझेंनी मनसुख हिरेनची हत्या घडवून आणली, अनिल देशमुखांचा आरोप, म्हणाले, फडणवीसांना याची कल्पना होती
Embed widget