Indigenous vaccine : पशुपालकांना दिलासा! आता लंपी त्वचा आजारावर रामबाण उपाय, स्वदेशी 'लंपी प्रो वॅक्सीन' लसीचा कृषीमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
जनावरांमध्ये पसरलेल्या घातक अशा लंपी त्वचा आजारावर आता रामबाण उपाय शक्य होणार आहे. कारण लंपी त्वचा आजारावर आता 'लंपी प्रो वॅक्सीन' लस उपलब्ध झाली आहे.
Indigenous vaccine : देशभरातील पशुपालकांना दिलासा देणारी एक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे जनावरांमध्ये पसरलेल्या घातक अशा लंपी त्वचा आजारावर आता रामबाण उपाय शक्य होणार आहे. कारण लंपी त्वचा आजारावर आता 'लंपी प्रो वॅक्सीन' लस उपलब्ध झाली आहे. ही लस स्वदेशी आहे. नुकतेच केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते या लसीचा शुभारंभ करण्यात आला. यामुळं देशभरातील पशुपालकांना एक प्रकारचा दिलासा मिळाला आहे. विशेषत: राजस्थानमधील पशुपालकांना हा मोठा दिलासा आहे.
जनावरांमध्ये पसरलेल्या घातक अशा लंपी त्वचा आजारावर आता रामबाण उपाय होणार आहे. त्यावर आाता 'लंपी प्रो वॅक्सीन' लस आली आहे. असून केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते या लसीचा शुभारंभ करण्यात आला आहे. या आजाराने राजस्थानमधील 5 हजांरपेक्षा जास्त जनावरांचा मृत्यू झाला आहे. या लसीमुळे पशुपालकांना मोठा फायदा होणार आहे. जनावरांमध्ये त्यातल्या त्यात गायींमध्ये 2019 पासून वर्षभरात त्वचेवर सूज येणे गाठी होणे अशा प्रकारचा आजार पसरला होता. ज्याला लंपी त्वचा आजार असे संबोधले गेले. देशात राजस्थानमध्ये याचा मोठा फैलाव झाल्याने तिथे मोठ्या प्रमाणावर जनावरे दगावली आहेत. गायींनंतर हा आजार म्हशींमध्येही पसरणे सुरु झाले होते. मात्र, यावर आता लस आली आहे. या लसीला "लंपी प्रो वॅक्सीन" असे नाव देण्यात आले आहे.
दरम्यान हीलस बरेली येथील भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेच्या सहकार्याने भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या हिस्सार हरियाणा येथील राष्ट्रीय इक्वीन रिसर्च सेंटर अंतर्गत असलेल्या दोन संस्थांनी विकसित केली आहे. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते एका कार्यक्रमात या लसीचा शुभारंभ करण्यात आला आहे.
लंपी प्रो वॅक्सीन ही जनावरांसाठी प्रभावी ठरणार आहे. या लसींमुळं रोगप्रतिकारशक्ती ही 1 वर्ष असणार आहे. त्यामुळं याचा मोठा फायदा होणार असल्याचे मत परभणीच्या पशुवैद्यकीय व पशुविज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य विवेक देशमुख यांनी व्यक्त केले. या आजाराची लागण ही साधारणत : 50 ते 100 टक्के होती. यामध्ये मर कमी आहे. मात्र, अंगावर फोड येत असल्यामुळं गायींच्या दुधावर याचा मोठा परिणाम होतो. याचा प्रादुर्भाव हा किटरकांद्वारे होतो. डास आणि माशांद्वारे याचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळं पशुपालकांनी योग्य ती काळजी घेतली पाहिजे असे आवाहन देखील विवेक देशमुख यांनी केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या: