एक्स्प्लोर

'या' कारणामुळं भाजीपाल्याचं उत्पादन घटलं, दरात झाली वाढ; काही भाज्यांनी गाठलं 'शतक' 

अवकाळी पाऊस आणि थंडीचा परिणाम होऊ लागल्यानं भाजीपाला उत्पादनात घट झालीय. उत्पादनात घट झाल्यानं गेल्या आठवडाभरात भाजीपाल्याची आवक घटलीय. यामुळं भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे.

Vegetable prices : गेल्या 15 दिवसापूर्वी पडलेला अवकाळी पाऊस आणि थंडीचा परिणाम होऊ लागल्यानं भाजीपाला उत्पादनात घट झालीय. उत्पादनात घट झाल्यानं गेल्या आठवडाभरात भाजीपाल्याची आवक घटलीय. यामुळं भाज्यांच्या दरात 20 ते 30 रुपयांची वाढ (Vegetable prices) झालीय. पश्चिम महाराष्ट्र , उत्तर महाराष्ट्र मधून मुंबईच्या वाशी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात भाजीपाला येतो. मात्र, या भागात पडलेल्या आवकाळी पावसामुळं पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यातच आता थंडी पडू लागल्यानं भाजीपाल्याच्या वाढीवर परिणाम होत आहे. दरम्यान, अशातच सर्वच भाजीपाला 90 ते 100 रुपयांवर गेला आहे. 

राज्यातील वातावरणात सासत्यानं बदल होत आहे. कुठं थंडी तर कुठं ढगाळ वातावरण आहे. तर काही भागात अवकाळी पाऊस झाला आहे. या अवकाळी पावसाचा मोठा फटका काही शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळं भाजीपाला उत्पादनात मोठी घट झाली आहे. यामध्ये गवार आणि भेंडी 120 रुपये किलो झाली आहे. तसेच वांगे, दोडका आणि शेवगा भाजीने देखील शंभरी गाठली आहे. दुसरीकडे कांद्याने पन्नाशी गाठली आहे. 

कोणत्या भाजीला किती दर? (प्रति किलो)

वांगी - 80
कोबी - 40
फ्लॅावर - 70
काकडी - 50
गवार - १२०
वटाणा -60 ते 70
ढोबळी मिरची - 90
टोमॅटो - 40 ते 45
कार्ली - 80
दुधी - 60
भेंडी - 120
गाजर - 50
कांदा - 45 ते 50

प्रति जुडी 

पालक - 30
मेथी  - 30
कोथींबीर - 30

परभणीसह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर भाजीपाला उत्पादित केला जातो. खरिपात कमी झालेले पर्जन्यमान त्यातच आता रब्बीतही अवकाळीमुळे सर्वत्र नुकसान झाल्याने भाजीपाला उत्पादन घटले आहे.  त्यामुळे जिथं शेतकऱ्यांना वांगे, टोमॅटो, भेंडी, कांदे आदी भाजीपाल्याचे अपेक्षित उत्पादन होण्याऐवजी कमी झाले. ज्याचा परिणाम हा भावावर झाला आहे. महत्त्वाचं म्हणजे जे शेतकरी आपला भाजीपाला उत्पादन करुन स्वतः विक्री करतात त्यांना काहीसा यातून फायदा होतो. 

महत्त्वाच्या बातम्या:

Vegetables rates : देशभरात कोसळणाऱ्या पावसामुळं भाजीपाला पिकांचं नुकसान, टोमॅटोप्रमाणेच अन्य भाज्यांचेही दर वाढणार

महत्त्वाच्या बातम्या

Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget