एक्स्प्लोर

Tomato Price: टोमॅटोची लाली उतरली, शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान, बांधावर लाल चिखल

Tomato Price: उत्पन्न जाऊ द्या हे टोमॅटो शेतातून काढून बाहेर टाकायला सुद्धा या शेतकऱ्याला सध्या परवडत नाही.

Tomato Price: रस्त्यावर लाल टोमॅटोचा ढीग दिसला की प्रत्येकाला आपण शिकत असताना दहावीच्या वर्गात असलेल्या लाल चिखल या पाठाची नक्कीच आठवण होते.. आज हा लाल चिखल आठवण्याचं कारण आहे सध्या पडलेले टोमॅटोचे भाव आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नाचा झालेला लाल चिखल.. एकीकडे महागाई वाढत असताना शेतकऱ्यांच्या उत्पादनाला मात्र भाव मिळत नाही. 

शेताच्या बांधावर पडलेला टोमॅटोचा खच.. एरवी यापैकी एक ना एक टोमॅटोची काळजी घेणाऱ्या शेतकऱ्याने आता मात्र हे टोमॅटो चक्क बांधावर टाकून द्यायला सुरुवात केली आहे. बीडमधील चौसाळा मधल्या नंदू जोगदंड यांनी या दोन एकर टोमॅटो साठी अडीच लाख रुपयांचा खर्च केला आणि ज्यावेळी या टोमॅटोची पहिली तोडी केली आणि हा टोमॅटो बाजारात पाठवला..बाजारातील ही पट्टी बघीतली आणि नांदूच्या पाया खालची माती सरकली..पारंपरिक शेतीला फाटा देऊन शेतकरी भाजीपाला लागवडीकडे मोठ्या प्रमाणात वळत आहेत मात्र या शेतकऱ्यांना प्रत्येक वेळी चांगला भाव हाती लागल याची शाश्वती नाही उलट एकाच वेळी हे शेतकरी एखाद्या भाजीपाल्याची लागवड करतात आणि एकाच वेळी हा बाजारात आलेला भाजीपाला कवडीमोल दराने विकला जातो. 

या शेतामध्ये टोमॅटोची लागवड ज्यावेळेस चालू होते त्यावेळी बाजारामध्ये 15 ते 20 रुपये किलो दराने टोमॅटो विकले जात होते. त्यामुळे जर तो भाव या शेतकऱ्याला मिळाला असता तर या दोन एकर शेतीतून त्याला पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळालं असतं.. पण उत्पन्न जाऊ द्या हे टोमॅटो शेतातून काढून बाहेर टाकायला सुद्धा या शेतकऱ्याला सध्या परवडत नाही. खरिपाचे पीक घेतल्यानंतर शेतकरी या टोमॅटोची लागवड करतात आणि हिवाळ्याच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात बाजारात टोमॅटो विक्रीसाठी येतात.. इतर शेती पिकाप्रमाणे भाजीपाल्यांना हमीभाव नसतो त्यामुळे कधी पंधरा-वीस रुपयाला विकला जाणारा हा टोमॅटो आता चक्क एक रुपया आणि दोन रुपयांनी विकला जात आहे. 

चौसाळा परिसरात मोठ्या प्रमाणात शेतकरी भाजीपाल्याची शेती करतात मात्र सध्या पडलेल्या टोमॅटोच्या भावामुळे शेतातील बांधावर असा टोमॅटोचा लाल चिखल पाहायला मिळत आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येकाला या टोमॅटोकडे बघितले की हळहळ वाटते.. ज्या शेतकऱ्यांनी आपल्या हाताने हे टोमॅटो असे बांधावर टाकले आहेत, त्यांच्या मात्र हा स्वप्नाचा चिखल झालेला असतो. 

आणखी वाचा:

Red Chilli : मिरचीची 'लाली' उतरली, दरात तब्बल अडीच ते तीन हजार रुपयांची घट; शेतकरी अडचणीत

महत्त्वाच्या बातम्या

चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
Dattatray Bharne: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
Shetkari Kajmafi : मयत शेतकऱ्यांच्या नावावरील 'कर्जमाफी' कशी मिळेल? A to Z माहिती
मयत शेतकऱ्यांच्या नावावरील 'कर्जमाफी' कशी मिळेल? A to Z माहिती

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Embed widget