शाहू महाराजांना अभिवादन, सरकारवर हल्लाबोल! राजू शेट्टींच्या कैफियत यात्रेला सुरुवात, नेमक्या मागण्या काय?
शेतकऱ्यांच्या (Sugarcane Farmers) मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Saghtana) प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्या नेतृत्वात कैफियत यात्रेला सुरुवात झालीय.
Raju Shetti : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या (Sugarcane Farmers) मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Saghtana) प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्या नेतृत्वात कैफियत यात्रेला (Kaifiyat Yatra) सुरुवात झाली आहे. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिम्मीत्त त्यांना अभिवादन करुन या कैफियत यात्रेला सुरुवात झाली आहे. शाहू महाराजांचे जनकस्थळ कागल ते समाधिस्थळ कोल्हापूरपर्यंत ही कैफियत पदयात्रा असणार आहे.
राजू शेट्टींच्या मागण्या काय?
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ठरल्याप्रमाणे 100 व 50 रुपयाचा दुसरा हप्ता देण्याची राज्य सरकार व साखर कारखानदारांना सद्बुध्दी मिळावी. तसेच शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा, यासाठी शाहू महाराजांचे जनकस्थळ कागल ते समाधिस्थळ कोल्हापूर पर्यंत कैफियत पदयात्रेस सुरुवात झाली आहे. दरम्यान, राजू शेट्टींच्या या मागण्यासंदर्भात सरकार काय निर्णय घेणार पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.
काय म्हणाले राजू शेट्टी?
सरकारनं दिलेला शब्द पाळला नसल्याचे राजू शेट्टी म्हणाले. मागील वर्षी तुटलेल्या उसाची एफआरपी अधिक 100 रुपये मिळावेत, अशी आमची मागणी होती. त्यासाठी आम्ही शेतकऱ्यांनी महामार्ग रोखला. ज्या कारखान्याने तीन हजार रुपये दिले त्यांनी जादा पन्नास रुपये शेतकऱ्यांना द्यायचे अशी मागणी ठरली होती. त्यावेळी हा प्रस्ताव मांडण्यात आला होता. तो जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने मिटवण्यात आला होता. परंतु राज्य सरकारने याला परवानगी न दिल्याने शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत असे राजू शेट्टी म्हणाले. दरम्यान, सरकारनं सध्या जाहीर केलेले हमीभाव ही अडजेस्टमेंट असल्याचे राजू शेट्टी म्हणाले.
शेती प्रश्नावर राजू शेट्टींचा कायम लढा
दरम्यान, राजू शेट्टी हे सातत्यानं शेती प्रश्नावर लढत आहेत. ऊसाच्या दराच्या मुद्यावरुन तर ते सातत्यानं आंदलने करत असतात. ज्या कारखान्यांनी ऊसाची कमी एफआरपी दिली, त्याच्याविरोधात दरवर्षी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक भूमिका घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, यावेळच्या लोकसभा निवडणुकीतही (Loksabha Election) राजू शेट्टींना पराभवाचा सामना करावा लागला. पराभवानंतर कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये. चळवळीचा निखारा पेटता ठेवून राज्यभर विविध प्रश्नासाठी आंदोलने व मोर्चे चालूच ठेवावेत असे वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केलं होतं. खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी चळवळीचा मुकूट आपल्या डोक्यावर शोभून दिसतो असेही राजू शेट्टी म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या:
राजू शेट्टी म्हणजे महान व्यक्ती, ते राज्यातील 288 काय देशातील प्रत्येक विधानसभा लढवतील; रविकांत तुपकरांचा खोचक टोला