एक्स्प्लोर

sugarcane : ऊस गाळपास दिरंगाई; नुकसान झालेल्या उसाला प्रती टन पाचशे रुपयांची भरपाई द्यावी, किसान सभेची मागणी

अनेक विभागांमध्ये अतिरिक्त ऊस गाळपाचे प्रश्न निर्माण झाले आहेत. अनेक कारखान्यांनी ऊस पेमेंट देण्यामध्येही दिरंगाई चालवली आहे. याबाबत किसान सभेच्या शिष्टमंडळानं साखर आयुक्तांची भेट घेतली.

Sugarcane Farmers : राज्यात अतिरिक्त ऊस गाळपाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यभर अपेक्षेपेक्षा ऊस गाळप सर्वच कारखान्यांमध्ये दिरंगाईने होत आहे. अनेक विभागांमध्ये अतिरिक्त ऊस गाळपाचे प्रश्न निर्माण झाले आहेत. अनेक कारखान्यांनी ऊस पेमेंट देण्यामध्येही दिरंगाई चालवली आहे. या सर्व विषयांना अनुसरुन अखिल भारतीय किसान सभेच्या शिष्टमंडळानं पुणे येथील साखर संकुल येथे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची भेट घेतली. यावेळी गाळपास दिरंगाई झाल्यामुळं नुकसान झालेल्या उसाला प्रती टन पाचशे रुपये एवढी नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी राज्यातील कोणत्याही शेतकऱ्याचा ऊस, गाळपाअभावी शेतात राहणार नाही याची हमी यावेळी गायकवाड यांनी किसान सभेच्या शिष्टमंडळाला दिली.  
 
राज्यभरातील सर्व उसाचे संपूर्ण गाळप तातडीने पूर्ण व्हावं. ऊस पिकावर उचललेले पीक कर्ज विहित मुदतीत न भरल्यास शेतकरी थकबाकीदार बनल्यानं कर्ज व्याजमाफीच्या लाभापासून वंचित राहतात. एफआरपी चे तुकडे केल्यानेही शेतकरी थकबाकीदार बनतात. शेतकऱ्यांना यामुळं मोठा तोटा होतो. शेतकरी थकबाकीदार होऊ नये अशा प्रकारे ऊस गाळप व पेमेंटचे नियोजन करावं. राज्यातील काही भागात अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. अतिरिक्त उसाचे विहित वेळेत गाळप होईल यासाठी प्रशासनाने अचूक नियोजन करावं.  बीड, अहमदनगर, औरंगाबाद, परभणी यासह राज्यात ज्या जिल्ह्यांमध्ये ऊस उपलब्धतेच्या तुलनेत गाळप क्षमता कमी आहे अशा जिल्ह्यांमध्ये याबाबत ठोस उपाययोजना करावी. अतिरिक्त ऊस, कार्य क्षेत्राबाहेर वाहून नेवून गाळप करावा लागल्यास अशा उसाच्या वाहतुकीचा खर्च शेतकऱ्यांवर न लादता तो शासनाने उचलावा. गाळपास दिरंगाई झाल्यामुळं नुकसान झालेल्या उसाला प्रती टन पाचशे रुपये एवढी नुकसानभरपाई द्यावी. शेतकऱ्यांच्या अडचणींचा गैरफायदा घेत ऊस तोडणी मुकादम ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांकडून जास्तीचे प्रती एकरी 10,000 रुपये मागत आहेत. वाहतुकीवाले गाडीमागे 1000 रुपये घेत आहेत. थळातून रस्त्यापर्यंत गाडी काढण्यासाठी  शेतकर्‍यांना अतिरिक्त ट्रॅक्टर लावण्यासाठी प्रती गाडी 500 रुपये जास्तीचे मोजावे लागत आहेत. 

दरम्यान, अतिरिक्त ऊस गाळपाचा प्रश्‍न प्रलंबीत असलेल्या परभणी व बीड जिल्ह्यासाठी साखर आयुक्तांच्या वतीने प्रत्येकी विशेष दोन अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्याचे यावेळी साखर आयुक्त  गायकवाड यांनी मान्य केले. कोणत्याही शेतकऱ्याचा ऊस, गाळपाअभावी शेतात राहणार नाही याची हमी यावेळी गायकवाड यांनी किसान सभेच्या शिष्टमंडळाला दिली. 

14 दिवसाच्या आत एफआरपीप्रमाणे रक्कम मिळावी

कार्यक्षेत्राबाहेरील कारखाने वाहतुकीच्या खर्चाचे कारण सांगून ऊसाला एफआरपीपेक्षा कमी दर देत आहेत. वाढता उत्पादन खर्च व आता या अशा प्रकारची लूट यामुळं शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. प्रशासनानं याबाबत तातडीने लक्ष घालून शेतकऱ्यांची लूट थांबवावी. लुट करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात गंगाखेड शुगर,  ट्वेन्टी वन शुगर सोनपेठ, नरसिंह शुगर आमडापुर, जय महेश शुगर बजाजनगर हे  कारखाने 50 किमीच्या आत आहेत व त्यांची गाळप क्षमता मोठी आहे. पाथरीत रेणुका शुगर पाथरी व योगेश्वरी शुगर लिबा हे दोन कारखाने आहेत. पाथरी तालुक्यात सध्या सरासरी 20 लाख टन ऊस गाळपाअभावी ऊभा आहे. जर योग्य नियोजन झाले नाही तर ऊस गाळपाअभावी ऊभा राहू शकतो. प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन उपाययोजना कराव्यात.  शुगर केन कंट्रोल ऑर्डरप्रमाणे शेतकऱ्यांचा ऊस तुटून गेल्यानंतर 14 दिवसाच्या आत एफआरपीप्रमाणे एकरकमी पेमेंट मिळणे अपेक्षीत आहे. मात्र रिकवरी व तोडणी वाहतूक खर्चाचा  डाटा कोणता धरावयाचा व मागील गळीतात बंद झालेल्या कारखान्यासाठी एफआरपी कशी काढायची यासारख्या गोष्टीच्या आडून महाराष्ट्र सरकारने एफआरपीचे तुकडे पाडण्याचे धोरण घेतले आहे. किसान सभा या धोरणाचा तीव्र शब्दात धिक्कार करत आहे. 

 एफआरपीचे  तुकडे पाडू नये

सरकारनं अशाप्रकारे क्लुप्त्या काढून एफआरपीचे  तुकडे पाडण्याचे कारस्थान करु नये. कारखानदारांना सोयीचे होईल व शेतकरी अडचणीत येईल असे धोरण राज्य सरकारने घेऊ नये. सरकारच्या या धोरणामुळे शेतकऱ्यांना एक रकमी एफ. आर. पी. न मिळाल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात पीक कर्जासाठी थकबाकीदार होतील. शेतकर्‍यांना यामुळे सरकारच्या पीक कर्ज व्याज माफीचा लाभ मिळणार नाही. सरकारने याबाबत गांभीर्याने पुनर्विचार करावा व शेतकऱ्यांना एक रकमी एफआरपी मिळेल यासाठी ठोस धोरण घ्यावं. उसाचा उत्पादन खर्च सातत्यानं वाढत आहे मात्र गेल्या अनेक वर्षांमध्ये  एफआरपीच्या रकमेमध्ये पुरेशी वाढ करण्यात आलेली नाही.

इथेनॉल उत्पन्नातील योग्य वाटा शेतकऱ्यांना मिळावा

केंद्र सरकारने रास्त उत्पादन खर्च धरुन एफआरपीमध्ये पुरेशी वाढ करावी. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण वाढले आहे. उसाच्या रसापासून इथेनॉल बनविण्यासाठी परवानगी दिल्याने अनेक साखर कारखान्यांनी इथेनॉल उत्पादन वाढविले आहे. उसापासून साखर व इतर उपपदार्थ यातून मिळणारे उत्पन्न आणि ऊसापासून थेट इथेनॉल, यातून मिळणारे उत्पन्न याचा विचार करता इथेनॉल उत्पन्नातील योग्य वाटा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे, याबाबतचे न्याय्य धोरण जाहीर करण्यात यावं.  हंगामाच्या शेवटी तुटणाऱ्या उसाला चांगला उतारा मिळतो. मात्र, उसाच्या वजनात घट होते. त्यामुळं मार्च, एप्रिल, मे मध्ये तुटणाऱ्या उसाला जादा दर देण्यात यावा. अनेक साखर कारखान्यांकडून, स्थानिक राजकारणामुळे  विरोधी शेतकऱ्यांच्या ऊस नोंदी व्यवस्थित केल्या जात नाहीत. तसेच ऊस तोडणी सुध्दा क्रमपाळीनुसार होत नाही. यामध्ये अल्पभूधारक व चळवळीतील शेतकरी भरडला जातो. कारखाना सुरु होण्यापूर्वी सर्व गावांमध्ये सार्वजनिक ठिकाणी तोडणीचा प्रोग्राम प्रसिद्ध करण्यात यावा व त्यानुसारच ऊस तोडणी केली जावी. या मागण्या यावेळी किसान सभेच्यावतीनं करण्यात आल्या. 

महत्त्वाच्या बातम्या:

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
Mumbai Crime: परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Mahalakshmi Race Course वर थीम पार्कचा मार्ग मोकळा,120 एकर जागा BMC ला देण्यास मंजुरीMajha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 26 June 2024Shivnath Darade on Election : मुंबई शिक्षक मतदारसंघात महायुतीत चढाओढ, शिवनाथ दराडे ExclusiveMahendra Bhavsar Dhule : निवडणुकीत विजय आमचाच, महायुतीचे उमेदवार महेंद्र भावसार यांना विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
Mumbai Crime: परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
PM Modi: सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Embed widget