(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jarandeshwar Sugar Factory : नियमानुसार विक्री होऊनही जरंडेश्वरची चर्चा, मात्र, हर्षवर्धन पाटील सहकारमंत्री असताना....पाहा काय म्हणाले अजित पवार
जरंडेश्वरचे मूल्य हे 39 कोटी झाले असताना तो 65 कोटींना विकला गेला आहे. त्या कारखान्याची विक्री नियमानुसारच झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
Jarandeshwar Sugar Factory : जरंडेश्वर साखर कारखाना हा नियमानुसार 65 कोटींना विकला गेला आहे. जरंडेश्वरचे मूल्य हे 39 कोटी झाले असताना तो 65 कोटींना विकला गेला. परंतू, हर्षवर्धन पाटील सहकारमंत्री असताना संजय कारखाना हा केवळ 3 कोटींना विकला गेला. बाराशिव कारखाना 28 कोटींना विकला गेला. पण त्यावर कधीही चर्चा होत नसल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानपरिषदेत केले. आणखी राज्यातील 11 साखर कारखाने भाडेतत्वावर चालवायला द्यायचे आहेत. प्रसाद लाड हवा असेल तर सांगा असेही अजित पवार यावेळी म्हणाले.
काहीजण यामध्ये 10 हजार कोटींचा घोटाळा झाला असल्याचे म्हणतात. आमच्यावर यायला लागले तर थोडे बहुत तुमच्यावरही येणारच ना असा टोला देखील अजित पवार यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांना लगावला.
साखर कारखान्याला थकहमी द्यायची नाही
दरम्यान, राज्यातील ऊस संपेपर्यंत कोणताही साखर कारखाना बंद होवू देणार नाही. जर मे महिन्यानंतर ऊस शिल्लक राहिल्यास रिकव्हरी लॉस होईल. त्यासाठी राज्य सरकार मदतीचा विचार करेल असेही अजित पवार यांनी यावेळी विधानपरिषदेत सांगितले. मुख्यमंत्र्यांनी ठरवलंय की कुठल्याही साखर कारखान्याला राज्य सरकार थकहमी द्यायची नाही. आम्हाला पचवायला थोडं जड जातंय, पण आम्ही ते स्विकारले असल्याचे अजित पवार म्हणाले.
जरंडेश्वरचे मूल्य हे 39 कोटी झाले असताना तो 65 कोटींना गेला आहे. विदर्भ वगळता इतर कोणतेही कारखाने कमी पैशात विकले गेले नाहीत. कोणाला कारखाने चालवायची हौस असेल तर सांगा असेही अजित पवार यावेळी विधानपरिषदेत म्हणाले.
जरंडेश्वर प्रकरण नेमकं काय?
जरेंडेश्वर सहकारी साखर कारखाना हा सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथे आहे. सध्याच्या मालकांनी हा कारखाना 2010 सालात 65 कोटी 75 लाख रुपयांना खरेदी केला होता. हा कारखाना सध्या मेसर्स गुरू कमोडिटी सर्विसेस प्रा. ली यांच्या मालकीचा आहे. हा कारखाना मेसर्स जरेंडेश्वर शुगर मिल प्रा लिमिटेडला भाड्याने देण्यात आला आहे. मेसर्स जरडेश्वर प्रा लिमिटेड कंपनीत मेसर्स सपार्किंग सोईल प्रा लिमिटेड कंपनी ही भागीदार कंपनी आहे. ईडीने केलेल्या तपासात मेसर्स स्पार्कलिंग कंपनी ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित आहे.
तपासात जरांडेश्वर सहकारी साखर कारखान्याची 2010 सालात विक्री करण्यात आली होती. वेळी तो मूळ किंमतीच्या कमी किंमतीत विकण्यात आला होता. त्याचप्रमाणे त्याची योग्य कार्यपद्धतीने पाळण्यात आली नव्हती. याच काळात अजित पवार हे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर होते. याच काळात हा कारखाना मेसर्स गुरू कमोडिटी सर्विसेस प्रा.लिमिटेडला विकण्यात आला. नंतर तत्काळ हा कारखाना जरंडेश्वर शुगर मिल प्रा ली ला भाडे तत्वावर देण्यात आला. दरम्यान, थकीत कर्जामुळे कारखान्याचा लिलाव झाल्याचं म्हटलं जात आहे. परंतु या प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचे आरोप केले जात आहेत. माजी आमदार आणि माजी महलूसलमंत्री शालिनीताई पाटील या कारखान्याच्या संस्थापक आणि चेअरमन होत्या.
महत्त्वाच्या बातम्या:
- Prasad Lad : प्रसाद लाडांनी नियमांचं उल्लंघन केलं, आपचा आरोप तर लाड म्हणाले, मी माझ्या कंपनीचा नोकरदार!
- Action Against MSEB Officer : महावितरणमधील भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध ऊर्जामंत्र्यांनी उगारला कारवाईचा बडगा