PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार अकरावा हफ्ता, यादीत आपलं नाव कसं शोधाल?
PM Kisan Samman Nidhi : पीएम किसान योजनेसाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे. या योजनेचा अकरावा हफ्ता आज म्हणजेच 31 मे रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
PM Kisan Samman Nidhi Scheme : पीएम किसान योजनेसाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे. PM Kisan Samman Nidhi Scheme चा अकरावा हफ्ता आज म्हणजेच 31 मे रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिमल्यात आहे. इथल्या एका कार्यमक्रमादरम्यान ते देशभरातील शेतकऱ्यांना या योजनेचा हफ्ता जारी करतील. दरम्यान जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचा केवायसी अपडेट असणं अनिवार्य आहे. केवायसी अपडेट करण्याची तारीख देखील 31 मे आहे. जर या तारखेपर्यंत तुमचा केवायसी अपडेट नसेल तर तुम्हाला या योजनेला लाभ मिळू शकणार नाही.
PM Kisan Samman Nidhi Scheme अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा होता. दोन हजार रुपयांच्या तीन हफ्त्यांमध्ये ही रक्कम शेतकऱ्यांना मिळते. पहिला हफ्ता एप्रिल-जुलै दरम्यान, दुसरा हफ्ता ऑगस्ट-नोव्हेंबर दरम्यान आणि तिसरा हफ्ता डिसेंबर-मार्च दरम्यान शेतकऱ्यांना मिळतो.
अशाप्रकारे KYC ऑनलाईन अपडेट करा
स्टेप 1. pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा
स्टेप 2. उजव्या बाजूला असलेल्या eKYC पर्यायावर क्लिक करा
स्टेप 3. आधार कार्ड नंबर, कॅप्चा कोड अॅड करुन सर्चवर क्लिक करा
स्टेप 4. आधार कार्डला लिंक्ड असलेला मोबाईल नंबर नोंदवा
स्टेप 5. आता 'गेट ओटीपी'वर क्लिक करा आणि मोबाईलवर आलेला ओटीपी नोंदवा. यासोबतच तुमचा केवायसी अपडेट होईल.
Beneficiary Status तुमचं नाव कसं शोधाल?
स्टेप 1. पीएम किसान सम्मान निधिच्या pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा
स्टेप 2. 'Beneficiary Status' पर्यायावर क्लिक करा.
स्टेप 3. आधार नंबर, बँक खात्याचा क्रमांक किंवा मोबाईल नंबर यापैकी एकाची निवड करा
स्टेप 4. 'Get Data' वर क्लिक करा. यासोबतच लाभार्थ्यांना आपलं स्टेटस दिसेल
'पीएम किसान सम्मान निधि योजना' काय आहे?
या योजनेअंतर्गत लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना सरकारकडून प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन हफ्त्यांमध्ये वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात. या योजनेसाठी पात्र लाभार्थी कॉमन सर्विस सेंटरद्वारे (CSC) देखील नोंदणई करु शकतात. याशिवाय या योजनेसाठी राज्य सरकारने नामनिर्देशित केलेले स्थानिक पटवारी, महसूल अधिकारी आणि नोडल अधिकारीच शेतकऱ्यांची नोंदणी करत आहेत.