एक्स्प्लोर

Pesticide Online Sales : शेतकऱ्यांना आता घरबसल्या मिळणार कीटकनाशके, अॅमेझॉनसह फ्लिपकार्ट कंपन्यांकडून ऑनलाईन विक्री

शेतकरी आता शेतीसाठी लागणारी कीटकनाशके (Pesticide) घरी बसून मागवू शकतात. अमेझॉन (amazon) आणि फ्लिपकार्ट (flipkart) या प्रमुख ई-कॉमर्स कंपन्यांसह अन्य कंपन्यांकडून कीटनाशकांची विक्री केली जाणार आहे.

Pesticide Online Sales : केंद्र सरकारनं शेतकऱ्यांसाठी (Farmers) एक मोठा निर्णय घेतला आहे. आता शेतकरी त्यांच्या शेतीसाठी लागणारी कीटकनाशके (Pesticide) घरी बसून मागवू शकतात. कीटकनाशकांची खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना आता अन्य ठिकाणी जाण्याची गरज पडणार नाही. भारतातील अॅमेझॉन (amazon) आणि फ्लिपकार्ट (flipkart) या प्रमुख ई-कॉमर्स कंपन्यांसह अनेक ई-कॉमर्स कंपन्यांकडून ऑनलाईन कीटकनाशकांची विक्री केली जाणार आहे. कृषी मंत्रालयाने कीटकनाशक नियम 1971 मध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. 

गेल्या अनेक दिवसांपासूनची ही मागणी

मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत 1971 चे नियम बदलण्यात आले असून, कीटकनाशकांच्या व्यापारासाठी परवाना असलेल्या कंपन्या आता सर्व प्रकारची कीटकनाशके ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे शेतकऱ्यांना विकू शकतील. यासाठी परवानाधारक कंपन्यांची वैधता ठरवण्याची जबाबदारी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मची असणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून किटकनाशके थेट शेतकऱ्यांच्या दारात पोहोच व्हावी असी प्रकारची मागणी केली जात होती. ती किटकनाशके शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची परवानगी कंपन्यांना मिळावी अशी मागणी करण्यात येत होते. अखेर किटकनाशकांची विक्री करणाऱ्या कंपन्यांच्या मागणीला यश आलं आहे. यामुळं किटकनाशक उत्पादक कंपन्या आणि कृषी क्षेत्राशी संबंधित व्यवसायाचा विस्तार होण्यासही मदत होईल, असे कंपन्यांचं म्हणणं आहे.

शेतकऱ्यांचा वेळ वाचणार

कीटकनाशके थेट शेतकऱ्यांच्या दारात पोहोचवल्यास शेतकऱ्यांचा वेळही वाचणार आहे. शेतकऱ्यांना चांगली कीटकनाशके देखील उपलब्ध होतील. ही कीटकनाशके खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना कुठेही जावं लागणार नाही. घरपोच त्यांना कीटकनाशके मिळणार असल्यानं शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचं कंपन्यांनी म्हटलं आहे. भारतातील अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या प्रमुख ई-कॉमर्स कंपन्यांसह अनेक ई-कॉमर्स कंपन्यांच्या वेबसाइटवर कीटकनाशके उपलब्ध होणार आहेत. त्यामुळं आता शेतकऱ्यांना योग्य व सुरक्षित कीटकनाशके खरेदी करण्यासाठी फारसा पैसा खर्च करावा लागणार नाही. तसेच विनाकारण दुकानांमध्ये फिरण्याची  गरज पडणार नाही. शेतकरी फक्त ऑनलाइन ऑर्डर देऊन किटकनाशकांची होम डिलिव्हरी मिळवू शकतात.

बाजारात स्पर्धा वाढणार, शेतकऱ्यांना कीटकनाशके स्वस्त मिळणार

अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टला कायदेशीररित्या कीटकनाशकांची विक्री करण्यास हिरवा कंदील देण्यात आला आहे. कीटकनाशकांची विक्री करणाऱ्या कंपनीकडे परवाना असणे मात्र, बंधनकारक करण्यात आलं आहे. परवान्याचे नियम पाळणे कंपनीला बंधनकारक असणार आहे. परवान्याची पडताळणी करण्याची जबाबदारी ई-कॉमर्स कंपनीची असेल. यामुळं बाजारात स्पर्धा वाढणार आहे. यातून कीटकनाशके शेतकऱ्यांसाठी स्वस्त होणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

Nashik Farmers : शेतकऱ्यांनो सावधान! बनावट कीटकनाशकांचा सुळसुळाट, दिंडोरीत सहा लाखांचा साठा जप्त

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Land Scam News : 224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगल्यातील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगल्यातील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
Ind vs Aus 1st test : सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
Priyanka Gandhi : प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Avadiche Khane Ani Rajkiya Tane Bane : Bharatshet Gogawale यांच्याशी निवडणुकीच्या धामधुमीत गप्पाMahesh Sawant : माहीमच्या मुस्लिम समाजाचा मला पाठिंबा, महेश सावंतांचं वक्तव्य ABP MAJHAPratibha Pawar Baramati|प्रतिभा पवार,रेवती सुळेंना बारामतीतील टेक्सटाइल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलेAkbaruddin Owaisi Rally Sambhajinagar| जलील यांचा प्रचार, ओवैसींची भव्य रॅली, जेसीबीने फुलांची उधळण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Land Scam News : 224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगल्यातील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगल्यातील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
Ind vs Aus 1st test : सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
Priyanka Gandhi : प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
Manipur Violence : मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
Pratibha Pawar Car Stopped : 'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
Sharad Pawar : काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
Dhananjay Mahadik on Satej Patil : बंटी पाटील खुनशी आहेत, विश्वजित कदमांच्या वक्तव्याने सिद्ध झालं, कोल्हापूर अविकसित ठेवलं; खासदार महाडिकांचा हल्लाबोल
बंटी पाटील खुनशी आहेत हे विश्वजित कदमांच्या वक्तव्याने सिद्ध झालं, कोल्हापूर अविकसित ठेवलं; खासदार धनंजय महाडिकांचा हल्लाबोल
Embed widget