एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

Dragon Fruit : सातपुड्याच्या पायथ्याशी 'ड्रॅगन फ्रूट'चा मळा, आत्तापर्यंत 15 लाखांचं उत्पन्न, आदिवासी भागातल्या शेतकऱ्यांसमोर नवीन पर्याय

नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यातील  शहादा येथील शेतकरी राजेश पाटील (Rajesh Patil) यांनी 'ड्रॅगन फ्रूट'च्या  (Dragon Fruit) लागवडीचा  यशस्वी प्रयोग केलाय. कमी पाण्यात फायदेशीर होणारी ही शेती आहे.

Dragon Fruit : शेतकऱ्यांसमोर (Farmers) सातत्यानं वेगवेगळी संकट येतात. कधी अस्मानी तर कधी सुलतानी. मात्र, या संकटाचा सामना करत शेतकरी प्रतिकूल परिस्थितीतही चांगले प्रयोग करत आहेत. पारंपारिक शेतीला बगल देत शेतकरी नव नवीन प्रयोग करत असल्याचे दिसत आहे. नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यातील  शहादा येथील शेतकरी राजेश पाटील (Rajesh Patil) यांनी 'ड्रॅगन फ्रूट'च्या  (Dragon Fruit) लागवडीचा  यशस्वी प्रयोग केलाय. कमी पाण्यात फायदेशीर होणारी ही शेती आहे. ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीच्या माध्यमातून राजेश पाटील यांनी आदिवासी भागातील शेतकऱ्यांसमोर नवीन पर्याय उभा केला आहे.

सातपुड्याच्या पायथ्याशी पारंपरिक शेतीला फाटा देत राजेश पाटील या शेतकऱ्याने ड्रॅगन फ्रूटची यशस्वी शेती केली आहे. वातावरणात होणाऱ्या बदलामुळं पारंपारिक शेती पुरवडत नसल्याने शेतकरी वेगवेगळे प्रयोग करत आहे. असाच प्रयोग राजेश पाटील यांनी केला आहे. शहादा येथील शेतकरी राजेश पाटील यांच्याकडे 20 एकर जमीन असून ते पारंपरिक शेती करत होते. मात्र, नैसर्गिक आपत्तीमुळं त्यांना मोठं नुकसान होत पारंपरिक शेती करत असताना त्यांनी आपल्या पाच एकर क्षेत्रावर ड्रॅगन फ्रूटचा प्रयोग केला आहे. गेल्या वर्षी त्यांनी गुजरातहून  ड्रॅगन फ्रूटची रोपं आणली होती. आपल्या पाच एकर क्षेत्रात या रोपांची बाग लावली होती. एकूण आठ हजार रोपे त्यांनी लावली आहेत. ही रोपे आठ बाय बारा फूट या प्रमाणात लावण्यात आली आहेत. एकाच ठिकाणी चार रोपे लावून त्या ठिकाणी सहा फूट सिमेंटचा खांब उभा केला आहे. या खांबाला वरती गोल रिंग लावून त्याला छत्रीचा आकार दिला आहे. 

Dragon Fruit : सातपुड्याच्या पायथ्याशी 'ड्रॅगन फ्रूट'चा मळा, आत्तापर्यंत 15 लाखांचं उत्पन्न, आदिवासी भागातल्या शेतकऱ्यांसमोर नवीन पर्याय

आत्तापर्यंत 15 लाखांचे उत्पन्न 

दोन वर्षात ड्रॅगन फ्रूटचा ही रोपे साधारणत: पाच ते सहा फूट उंचीर्पयत वाढली आहेत. आता त्यांच्या बागेतील रोपे दोन वर्षाची झाली आहेत, त्यांचं आता उत्पादनही सुरू झालं आहे. आतापर्यंत 80 ते 90 क्विंटल उत्पादन निघाले आहे. त्यातून 15 लाखांचे उत्पन्न राजेश पाटील यांना मिळालं आहे. बाहेरील व्यापारी येऊन जागेवर 150 रुपये किलोने खरेदी करत असल्याची माहिती शेतकरी राजेश पाटील यांनी दिली आहे.

ड्रॅगन फ्रूटचे 25 वर्षापर्यंत उत्पादन घेता येते

या पिकाचे उत्पादन डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. ड्रॅगन फ्रूट या फळझाडाला 25 वर्षापर्यंत उत्पादन येते. दरवर्षी साधारणत: जून ते डिसेंबर या काळात त्याला फळधारणा होते. निवडूंगाच्या झाडाप्रमाणेच हे काटेरी झाड आहे. वर्षभरानंतर त्याला फळधारणा सुरु होते. पहिल्या वर्षी कमी फळधारणा होते. पण दुसऱ्या वर्षापासून मात्र त्याचे उत्पादन दोन ते चार पटीने वाढते. सातपुड्याच्या डोंगराळ भागात आदिवासी शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत, या शेतीकडे वळावे. यात चांगले उत्पादन मिळते आणि बाजारपेठ असल्यानं शेतकऱ्यांनी बाजारपेठेचा विचार करुन शेती करावी, असे आवाहन राजेश पाटील यांनी केलं आहे. शेतीतील समस्या आणि नैसर्गिक आपत्तीचं भांडवल न करता पाटील यांनी प्रयत्न करत आदिवासी भागात ड्रॅगन फ्रूटची शेती यशस्वी केली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

Dragon Fruit Health Benefits : ड्रॅगन फ्रूट आरोग्यासाठी गुणकारी; सेवन केल्यास 'या' आजारांपासून राहाल दूर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Baramati Vidhan Sabha | विधानसभा निवडणुकीसाठी बारामतीत राजकारण आणि भावनांचा खेळ Special ReportDevendra Fadnavis : जेव्हा मतदानाचा टक्का वाढतो तेव्हा भाजपला फायदा होतो:फडणवीस ABP MAJHAMaharashtra Politics Rada | नेत्यांचे 'राडे' राजकीय संस्कृतीचे 'धिंडवडे'Sharad Koli on Praniti Shinde : प्रणिती शिंदे तुला काय तुझ्याबापाला सुद्धा भीत नाही...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Maharashtra Exit Polls Result : राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
Embed widget