एक्स्प्लोर

मराठवाड्यातील चार जिल्ह्यात 8 लाख 25 हजार हेक्टरावरील शेतीचं नुकसान, 80 टक्के पिके गेली 

Agriculture : मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी, बीड या चार जिल्ह्यातील 80 टक्के पिके गेली, तर आता गेल्या 25 दिवसात पावसाने उघडीप घेतल्याने उर्वरित 20 टक्के पिकेही वाळली आहेत.

Farmer News : पावसाळ्याच्या सुरुवातीला झालेल्या बेफाम अतिवृष्टीने मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी, बीड या चार जिल्ह्यातील 80 टक्के पिके गेली, तर आता गेल्या 25 दिवसात पावसाने उघडीप घेतल्याने उर्वरित 20 टक्के पिकेही वाळली आहेत. दरम्यान उन्हामुळे वाळून जाणारी पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे.   अतिवृष्टीतील नुकसान भरपाईसाठी जिल्हा प्रशासनातर्फे  717 कोटी 88 लाखांची मागणी करण्यात आली आहे. 

नांदेडसह इतर जिल्ह्यात पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची सध्या  धडपड सुरू आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला झालेल्या बेफाम अतिवृष्टीने  सोयाबीन, उडीद, मूग, कापूस, केळी ही 8 लाख लागवड क्षेत्रावरील पैकी 80 टक्के पिके गेली आहेत. तर यात 4 लाख 50 हजार हेक्टर एवढा सोयाबीन पीक पेरा आहे. त्यातील 3 लाख 50 हजार हेक्टर वरील सोयाबीनचे नुकसान झाले आहे. आता गेल्या 25 दिवसात जिल्ह्यात पावसाने उघडीप घेतल्याने उर्वरित 20 टक्के पिकेही वाळून जात असल्याने, शेतकऱ्यांचे यावर्षी 100 टक्के नुकसान झालेय. दरम्यान उन्हामुळे वाळून जाणारी पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड चालू आहे. ज्यासाठी शेतकरी टँकरने, तुषारने शेतीला पाणी देत आहेत.  

एकट्या नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसह बाधित क्षेत्रात भर पडून एकूण सात लाख 41 हजार शेतकऱ्यांचे पाच लाख 27 हजार हेक्टर मधील खरीपासह बागायती व फळ पिकाचे 33% पेक्षा अधिक नुकसान झाल्याचा सुधारित अहवाल शासनाकडे पाठवला आहे. यात बाधितांना  एनडीआरएफ च्या नव्या निकषनुसार (दुप्पट भरपाई )भरपाईसाठी जिल्हा प्रशासनाने 717 कोटी 88 लाख 91 हजार 600 रुपयाची मागणी शासनाकडे केली आहे.

नांदेड जिल्ह्यात यंदा जुलै ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी होऊन अनेक मंडळात एकापेक्षा अधिक वेळात अतिवृष्टीची नोंद झाली होती. जुलै मध्ये तर एका महिन्यात विक्रमी 606 मिलिमीटर पाऊस होऊन पिकांची दाणादाण उडाली होती. अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना पूर येऊन नदीकाठची जमीन खरडून गेली सखल भागातील पिके पाण्याखाली गेली होती. जिल्ह्यात झालेल्या प्रचंड नैसर्गिक आपत्तीत जिरायती  मधील सोयाबीन, कपाशी, ज्वारी, तुर, उडीद, मूग या पाच लाख 27 हजार 141 हेक्टरवरील पिकांस सह 314 हेक्टरवरील  बागायती व 66 हेक्टरवरील पिकांचे 33% पेक्षा अधिक नुकसान झाले होते. यात सात लाख 41 हजार 946 शेतकऱ्यांना फटका बसला. या नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्वच सोळा तालुक्याकडून नुकसानीची अंतिम आकडेवारी घेतली. यासाठी  एनडीआरएफ च्या नव्या निकषानुसार (दुप्पट भरपाई) जिल्ह्यासाठी 717 कोटी 88 लाख 91 हजार 600 रुपयाची मागणी जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून राज्य शासनाकडे केली आहे. दरम्यान नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे एकूण 8 लाख हेक्टर लागवड क्षेत्रा पैकी, 5 लाख हेक्टरावरील पिके बाधित झाली आहेत.तर एकट्या सोयाबीन लागवड क्षेत्राचे 3 लाख 50 हजार हेक्टर वरील नुकसान झाले आहे. दरवर्षी जिल्ह्यातून जवळपास 32 लाख क्विंटल सोयाबीनचे उत्पादन होते. त्यामुळे या नुकसानीचा फटका मोठ्या प्रमाणात सोयाबीन उत्पादनावर होणार आहे.

नांदेड जिल्ह्यात एकूण लागवड क्षेत्र 8 लाख हेक्टर, बाधित क्षेत्र 5 लाख हेक्टर

सोयाबीन क्षेत्र 4 लाख 50 हजार हेक्टर
सोयाबीन नुकसान 3 लाख 50 हजार
गेल्या वर्षी सोयाबीन उत्पादन 4 लाख हेक्टर 
32 लाख क्विंटल उत्पादन
मागणी 717 कोटी 88 लाख रुपयांची नुकसान भरपाईची मागणी

परभणी जिल्ह्यातील एकूण पीक लागवड क्षेत्र 5 लाख 35 हजार
सोयाबीन लागवड क्षेत्र  3 लाख 75 हेक्टर
तर अतिवृष्टी व आता पावसाअभावी सोयाबीनचे 60 टक्के नुकसान झाले आहे.
हिंगोली जिल्ह्यातील एकुण पीक लागवड क्षेत्र - 3 लाख 70 हजार हेक्टर*
एकूण सोयाबीन लागवड  क्षेत्र -2 लाख 60 हजार हेक्टर 
हेक्टरी सोयाबीन उत्पादन 10  क्विंटल.

अतिवृष्टी व पावसायाअभावी 70 टक्के सोयाबीनचे नुकसान झालेय.
बीड जिल्ह्यातील एकूण पीक लागवड क्षेत्र साडेसात लाख हेक्टर आहे.
त्यापैकी साडेतीन लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली आहे. 
पावसाअभावी वेगवेगळ्या कारणाने जिल्ह्यातील 20 टक्के सोयाबीन बाधित झाले असल्याचा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे.
मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी, बीड या चार जिल्ह्यात एकूण 8 लाख 25 हजार हेक्टरावरील सोयाबीन पिकांचे नुकसान अतिवृष्टी आणि पावसाअभावी झाले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget