एक्स्प्लोर

Agriculture News : कृषी कल्याण विभाग आणि नाफेड यांच्यातील करारावर स्वाक्षऱ्या, आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षाला प्रोत्साहन देणार 

कृषी आणि कृषक कल्याण विभाग आणि नाफेड यांच्यातील सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष 2023  ला प्रोत्साहन देण्यासाठी हा करार झाला.

Agriculture News : आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष 2023  (International Year of Millets 2023 )  ला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी आणि कृषक कल्याण विभाग आणि नाफेड यांच्यातील सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. भरड धान्य आधारित उत्पादनांच्या प्रचार आणि विपणनासाठी दोन्ही संस्था एकत्र काम करणार आहेत. या अनुषंगाने हा करार करण्यात आला आहे. भरड धान्य आधारित उत्पादनांवर लक्ष केंद्रित करण्याच्या दृष्टीनं यावर आधारित उत्पादनांचे वितरण करण्यासाठी देखील यामुळं मदत होणार आहे. 

दोन्ही संस्था भरड धान्य आधारित उत्पादनांना पाठबळ देतील

भारत सरकारने (Government of India) संयुक्त राष्ट्रांसमोर प्रस्तावित केलेला आणि जगभरात साजरा होणारा आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष (IYoM) 2023 हा उपक्रम लक्षात घेऊन, भरड धान्य - आधारित उत्पादनांच्या प्रचार आणि विपणनासाठी दोन्ही संस्था एकत्र काम करणार आहेत. या अनुषंगानेच हा करार करण्यात आला आहे. जगभरात भरड धान्यांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी भारत तयारी करत  आहे. देशभरातील भरड धान्यावर आधारित उत्पादनांच्या वापरात जास्तीत जास्त वाढ करण्याच्या दृष्टीने, या दोन्ही संस्था भरड धान्य आधारित उत्पादनांना पाठबळ देतील. तसेच व्यवस्थापन, प्रचार करतील आणि बाजारपेठा उपलब्ध करुन देतील.

शेतकरी उत्पादक संस्था तयार करण्याचा उद्देश

कृषी आणि कृषक कल्याण विभाग आणि नाफेड, मूल्यवर्धित भरड धान्यांशी संबंधित उत्पादने विकसित करण्यासाठी, भरड धान्य -आधारित उत्पादनांची प्रक्रिया करणाऱ्यांना सल्लागार पाठबळाची सुविधा देण्यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात सहयोग करतील. भारतीय भरड धान्य संशोधन संस्थेशी आयआयएमआरशी (IIMR) संलग्न असलेल्या स्टार्ट अप्ससह इतर स्टार्ट अप्सचा समावेश करणे.  विशेषत: भरड धान्य-आधारित उत्पादनांची श्रेणी विकसित करण्यासाठी शेतकरी उत्पादक संस्था तयार करणे. नाफेड बाजार स्टोअर्स आणि नाफेडशी संलग्न इतर संस्थांच्या जाळ्यामार्फत भरड धान्य-आधारित उत्पादनांचा प्रचार आणि विक्री तसेच दिल्ली - एनसीआरमधील विविध ठिकाणी बाजरी-आधारित वेंडिंग मशीन्सची स्थापना करणे. भरड धान्य -आधारित उत्पादनांवर लक्ष केंद्रित करण्याच्या दृष्टीने यावर आधारित उत्पादनांचे वितरण करण्यासाठीही यामुळे मदत होणार आहे. 

70 पेक्षा जास्त देशांचा भारताला पाठिंबा

संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. यासंदर्भात भारत सरकारने पुढाकार घेऊन दिलेला प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांनी स्वीकारला होता. त्याला 70 पेक्षा जास्त देशांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळं भरड धान्यांचे  महत्त्व, शाश्वत शेतीमध्ये भरड धान्यांची  भूमिका तसेच स्मार्ट आणि सुपर फूड म्हणून भरड धान्यांचे  फायदे याबद्दल जगभरात जागरूकता निर्माण करण्यात मदत होईल. भारतात भरड धान्यांचे 170 लाख टनांपेक्षा जास्त उत्पादन झाले असून, भरड धान्यांचे आशिया खंडातील 80 टक्क्यांपेक्षा जास्त उत्पादन भारतात घेतले जात आहे. या विक्रमी उत्पादनासह भारत भरड धान्यांचे जागतिक केंद्र बनण्याच्या तयारीत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

Wheat Prices : सणासुदीच्या मुहूर्तावर गव्हाला झळाळी, किंमतीत तीन टक्क्यांची वाढ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

फडणवीसांना धक्का, अजित पवारांशी बंडखोरी; फलटणमध्ये नारळ फुटला, मोहिते पाटलांसाठी तुतारीही वाजली
फडणवीसांना धक्का, अजित पवारांशी बंडखोरी; फलटणमध्ये नारळ फुटला, मोहिते पाटलांसाठी तुतारीही वाजली
Bachchu Kadu Amravati Rada : जिंकण्यासाठी नवनीत राणा अमराववीत दंगल घडवणार, बच्चू कडूंचा गंभीर आरोप
जिंकण्यासाठी नवनीत राणा अमराववीत दंगल घडवणार, बच्चू कडूंचा गंभीर आरोप
''पार्थच्या सुरक्षेसाठी रणागाडा द्यायला पाहिजे होता, तो मोठा नेता''; रोहित पवारांचा तीव्र संताप
''पार्थच्या सुरक्षेसाठी रणागाडा द्यायला पाहिजे होता, तो मोठा नेता''; रोहित पवारांचा तीव्र संताप
Narayan Rane : नारायण राणेंच्या प्रचारपत्रकावरून बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे गायब; शिंदेंच्या शिवसैनिकांनी प्रचार थांबवला
नारायण राणेंच्या प्रचारपत्रकावरून बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे गायब; शिंदेंच्या शिवसैनिकांनी प्रचार थांबवला
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Mahadik on Satej Patil: सतेज पाटलांना कोल्हापुरात दंगल घडवायची आहे, धनंजय महाडिकांचा आरोपAkola Amit Shah : अकोल्यातून अमित शाह यांचा ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर हल्लाबोलBachchu Kadu Amravati Rada : जिंकण्यासाठी नवनीत राणा अमराववीत दंगल घडवणार, बच्चू कडूंचा गंभीर आरोपABP Majha Headlines : 07 PM: 23 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फडणवीसांना धक्का, अजित पवारांशी बंडखोरी; फलटणमध्ये नारळ फुटला, मोहिते पाटलांसाठी तुतारीही वाजली
फडणवीसांना धक्का, अजित पवारांशी बंडखोरी; फलटणमध्ये नारळ फुटला, मोहिते पाटलांसाठी तुतारीही वाजली
Bachchu Kadu Amravati Rada : जिंकण्यासाठी नवनीत राणा अमराववीत दंगल घडवणार, बच्चू कडूंचा गंभीर आरोप
जिंकण्यासाठी नवनीत राणा अमराववीत दंगल घडवणार, बच्चू कडूंचा गंभीर आरोप
''पार्थच्या सुरक्षेसाठी रणागाडा द्यायला पाहिजे होता, तो मोठा नेता''; रोहित पवारांचा तीव्र संताप
''पार्थच्या सुरक्षेसाठी रणागाडा द्यायला पाहिजे होता, तो मोठा नेता''; रोहित पवारांचा तीव्र संताप
Narayan Rane : नारायण राणेंच्या प्रचारपत्रकावरून बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे गायब; शिंदेंच्या शिवसैनिकांनी प्रचार थांबवला
नारायण राणेंच्या प्रचारपत्रकावरून बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे गायब; शिंदेंच्या शिवसैनिकांनी प्रचार थांबवला
Manoj Bajpayee : शेतकऱ्याचा मुलगा कसा झाला बॉलिवूड स्टार? वाचा मनोज वाजपेयीची अंगावर शहारे आणणारी संघर्षमय कहाणी
शेतकऱ्याचा मुलगा कसा झाला बॉलिवूड स्टार? वाचा मनोज वाजपेयीची अंगावर शहारे आणणारी संघर्षमय कहाणी
भाजपला का मतदान करावं?; रात्रीच्या अंधारात मराठा तरुणांनी आमदार महोदयांना घेरलं
भाजपला का मतदान करावं?; रात्रीच्या अंधारात मराठा तरुणांनी आमदार महोदयांना घेरलं
Bollywood Actress :
"त्याने मला मध्यरात्री 3 वाजता बोलावलं..."; लोकप्रिय अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव; म्हणाली,"मी रात्रभर रडत होते"
Bollywood Movies Updates : 30 रुपयांच्या तिकिटाकडेही प्रेक्षकांची पाठ, बॉलिवूड चिंतेत; मुंबईतील थिएटरला लागलं टाळं
30 रुपयांच्या तिकिटाकडेही प्रेक्षकांची पाठ, बॉलिवूड चिंतेत; मुंबईतील थिएटरला लागलं टाळं
Embed widget