एक्स्प्लोर

Piyush Goyal : विकसनशील राष्ट्रात दर्जेदार छोटे डेअरी फार्म तयार करावेत, आंतरराष्ट्रीय डेअरी फेडरेशनला मंत्री गोयल यांच्या सूचना

विकसनशील राष्ट्रांमध्ये छोटे डेअरी फार्म अधिक उत्पादनक्षम, शाश्वत, दर्जेदार बनवण्याच्या दिशेनं आंतरराष्ट्रीय डेअरी फेडरेशनने प्रयत्न करावेत असे मत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केलं.

Piyush Goyal : विकसनशील राष्ट्रांमध्ये छोटे डेअरी फार्म (Small dairy farm) अधिक उत्पादनक्षम, शाश्वत, दर्जेदार आणि फायदेशीर बनवण्याच्या दिशेनं आंतरराष्ट्रीय डेअरी फेडरेशनने (IDF) सातत्यपूर्ण प्रयत्न करावेत असे मत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी व्यक्त केलं. भारताला समस्येचा नव्हे तर समाधानाचा भाग व्हायचे आहे, याची हमी मी तुम्हाला देतो असेही ते म्हणाले. ग्रेटर नोएडा इथे आंतरराष्ट्रीय डेअरी फेडरेशनच्या जागतिक डेअरी संमेलन 2022 (WDS 2022) ला संबोधित करताना गोयल बोलत होते. 

दुग्धजन्य उत्पादनात आणखी वाढ होणार

शेती स्तरावर संशोधन, भारतातील विविध हवामान परिस्थितींचा अभ्यास करणं गरडेचं आहे. तसेच, जागतिक मानके आणि जागतिक उत्सर्जनविषयक मापदंडांशी जुळवून घेण्यास मदत करणारे उपाय शोधण्यासाठी आंतरराष्ट्रीय डेअरी फेडरेशनने देशात तज्ञांची एक छोटी समिती नेमण्याची शक्यता पडताळून पाहावी असेही गोयल म्हणाले. जगातील दुग्धजन्य उत्पादनाच्या सुमारे एक चतुर्थांश उत्पादन भारतात होते. जगातील दुग्धजन्य पदार्थांचा सर्वात मोठा उत्पादक देश म्हणून भारताची ओळख आहे. वाढता आंतरराष्ट्रीय सहभाग तसेच सरकार, सहकारी क्षेत्र आणि शेतकरी यांनी घेतलेल्या सशक्त पुढाकारामुळं, भारताच्या जागतिक दुग्धजन्य बाजारातील वाट्यात येत्या काही वर्षांत लक्षणीय वाढ होईल असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला. याचा भारतातील लहान आणि दुर्गम भागातील शेतकर्‍यांना खूप फायदा होईल. त्यांना आवश्यक असलेले पूरक उत्पन्न मिळेल तसेच त्यांच्या मुलांच्या पोषणातही योगदान मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. देशातील दुग्ध उत्पादनाचा एक तृतीयांश भाग शेतकरी त्यांच्या घरगुती वापरासाठी ठेवतात, हे आपण लक्षात घेतले पाहिजे, असेही गोयल म्हणाले.

अल्पभूधारक शेती फायदेशीर ठरण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करण्याची गरज

जागतिक उत्सर्जनावरील शेतीचा प्रभाव कमी करण्याच्या वैश्विक प्रयत्नांचा भाग बनण्यास भारत उत्सुक असल्याचे गोयल म्हणाले. भारतात अल्प भूधारक शेतकरी मोठ्या संख्येनं दुग्ध व्यवसायात आहेत. तर विकसित राष्ट्रांमध्ये तुलनेने कमी शेतकरी  दुग्ध उत्पादनात गुंतलेले आहेत. या तफावतीचं चित्र स्पष्ट करत मंत्र्यांनी  दुग्ध व्यवसायाशी संबंधित सर्व हितसंबंधीयांनी छोट्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी समकालीन आणि संबद्ध उपाय शोधण्याचे आवाहन केलं. 2047 मध्ये साजऱ्या केल्या जाणाऱ्या आपल्या स्वातंत्र्याच्या 100 व्या वर्धापन दिनापर्यंतच्या अमृत काळात, आपल्या देशातील 1.3 अब्ज लोकांपैकी प्रत्येकापर्यंत समृद्धी आणि विकासाची फळे पोहोचवण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार गोयल यांनी केला. अल्पभूधारक शेती फायदेशीर बनविण्याच्या दिशेने केंद्रित प्रयत्न करण्याचे आवाहन गोयल यांनी यावेळी केलं. 

महत्त्वाच्या बातम्या: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !

व्हिडीओ

Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट
Eknath Shinde Brother : साताऱ्यातील सावरी गावात शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टजवळ ड्रग्स सापडलं- अंधारे
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, आमदारकी जाणार? वकील काय म्हणाले?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
IPL Auction 2026: आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
Embed widget