Yavatmal: फणस शेतीतून साधलीय आर्थिक उन्नती, विदर्भातील शेतकऱ्याने घेतलं लाखोंचं उत्पन्न
Maharashtra Yavatmal Agriculture : शेतातील बांधावर वा काही गुंठे भागात फणस लावल्यास फायदेशीर ठरू शकते. एका झाडापासून तीन ते चार क्विंटल फणस निघतात.

Yavatmal Agriculture News : फणस म्हटले की डोळ्यासमोर येते कोकणातील फणसशेती. पण कष्टाच्या (Agriculture) जीवावर विदर्भाच्या जमिनीतही फणसाची शेती करता येऊ शकते हे एका शेतकऱ्याने सिद्ध केलंय. पारंपरिक पिकासोबतच वेगळी वाट आणि परीश्रमामध्ये सातत्य ठेवल्यावर काय होऊ शकते याचे उदाहरण यवतमाळच्या (Yavatmal) पुसद तालुक्यातील चिलवाडी शिवारात येथे पहावयास मिळते. बंडू जाधव या शेतकऱ्याने फणस शेती केली आणि बारा गुंठ्यातून भरघोस उत्पन्नही घेतलं आहे. जाधव यांनी आपल्या शेतात लागवड केलेल्या 30 झाडांमधून ते दरवर्षी सव्वा ते दीड लाखांपर्यंत उत्पन्न मिळवतात.
बंडू जाधव यांची 15 एकर शेती असून 12 गुंठ्यांत पंधरा वर्षांपूर्वी त्यांनी आंध्र प्रदेशातील फणस रोपांची लागवड केली. लागवडीनंतर पाच वर्षांनी त्याला फळे येऊ लागली. दरम्यान आंतरपीक म्हणून सोयाबीनचे उत्पन्न देखील घेतले तर आता झाडे मोठे झाल्यानंतर त्यात गुरांसाठी वैरण घेतल्या जाते. या फणस झाडांना बुरशीनाशक फवारणी शिवाय कुठलाही खर्च नाही. केवळ झाडांची फांदी छाटणी ते करतात. सद्यस्थितीत खोडांपासून फणसांची ही झाड फळांनी लगडली आहेत.
फणस हे कोरडवाहू फळझाड असून फणसाची झाडाला कुठलेही रासायनिक खते आणि कीटकनाशके न फवारणी करता वाढलेली दिसतात. फणसाचे पीक उष्ण कटिबंधातील हवामानात वाढणारे आहे. बंडू जाधव यांनी भौगोलिक स्थिती आणि पोषक वातावरणाचा अभ्यास करुन ही झाडे 15 वर्षांपूर्वी लावली मागील दहा वर्षापाऊसून उत्त्पन्न येण्यास सुरुवात झाली.
शेतकरी खरिपात सोयाबीन, कापूस, तूर तर रब्बी हंगामात गहू, हरबरा हे पिके घेतात. मात्र शेतातील बांधावर वा काही गुंठे भागात फणस लावल्यास फायदेशीर ठरू शकते. एका झाडापासून तीन ते चार क्विंटल फणस निघतात यासाठी त्यांना पुसद महागाव आर्मी यवतमाळ (Yavatmal) नांदेड येथील व्यापारी स्वतःच शेतामध्ये येऊन फणस खरेदी करतात त्यामुळे त्यांना मार्केट शोधण्याची कुठेच आवश्यकता नाही.
Maharahtra Yavatmal Agriculture News : बीडच्या तरुणाची दुग्ध व्यवसायातून लाखोंची कमाई
उच्च शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नसल्यानं अनेक तरुण हे व्यवसायाच्या शोधात असतात. अशाच एका उच्च शिक्षण घेतलेल्या बीड जिल्ह्यातील तरुणाने दूध व्यवसाय करत स्वत:ची प्रगती केली आहे. बीडमधल्या काथवटवाडी येथील चंद्रसेन पारखे असं या तरुणाचे नाव आहे. चंद्रसेन यांचे डीएडचं शिक्षण झालं आहे. मात्र, नोकरी मिळत नसल्यानं त्यांनी स्वतःचं दुधाचा व्यवसाय सुरु केला. याच व्यवसायातून ते नोकरदारापेक्षाही जास्त पैसे कमवत आहेत.
नोकरी मिळत नसल्याने 2014 साली चंद्रसेन पारखे यांनी दुधाचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला त्यांनी सहा म्हशी घेतल्या होत्या. त्यातून 30 ते 40 लिटर दुधाची विक्री ते करु लागले. दुधाच्या व्यवसायामध्ये चांगले पैसे मिळू शकतात असं त्यांना वाटल्यानंतर त्यांनी हा व्यवसाय वाढवण्याचा निर्णय घेतला. म्हशी बरोबरच त्यांनी गाई देखील विकत घेतल्या.
सध्या चंद्रसेन पारखे यांच्याकडे सात गाई आणि आठ म्हशी तसेच छोटी मोठी मिळून एकूण 32 जनावरं आहेत. दररोज गाईचे 100 लिटर तर म्हशीचे 50 लिटर निघते. या दुधाची विक्री ते जवळच असलेल्या एका डेरीवर करत आहेत. सध्या गाईच्या दुधाला 35 रुपये लिटरचा भाव मिळत आहे. तर म्हशीच्या दुधाला 40 ते 50 रुपये लिटरचा भाव मिळतोय. या दुधातून महिन्याला ते दीड लाख रुपयांचा उत्पन्न घेत आहेत. मजूर, जनावरांचा चारा आणि त्यांच्या देखरेखीचा खर्च वगळता महिन्याकाठी 40 ते 50 हजार रुपये या व्यवसायातून मिळवत आहेत.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
