एक्स्प्लोर

पश्चिम विदर्भात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या, सरकारची धोरणच शेतकऱ्याला मारक ठरतंय

Vidarbha Farmer Suicide : गेल्या पाच महिन्यात पश्चिम विदर्भातील अमरावतीमध्ये 143, यवतमाळमधील 132, बुलढाण्यात 83, अकोल्यात 82 तर वाशिममध्ये 21 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. 

अमरावती : पश्चिम विदर्भात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या (Vidarbha Farmer Suicide) होत असल्याचं आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. सरकार शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यात कमी पडलं आहे का असा प्रश्न विचारला जात आहे. आत्महत्या करणाऱ्यांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे. जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी गळफास लावत असून सरकारने या आत्महत्या थांबविण्यासाठी ठोस उपाय योजना करण्याची गरज आहे. 

कर्जाचा वाढता डोंगर अन् शेतकरी हतबल

पश्चिम विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असून जानेवारी ते मे या 5 महिन्यात तब्बल 461 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. एकट्या अमरावती जिल्ह्यात 143 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. नापिकी, अवकाळी पावसाने होणारे नुकसान यातून शेतकरी हतबल झालाय. यातच डोक्यावर वाढता कर्जाचा डोंगर, यातून आपला संसाराचा गाडा कसा हाकलायचा या विवंचनेत शेतकरी टोकाचं पाऊल उचलताना दिसतो आहे. 

सरकारने या शेतकऱ्यांना धीर देण्याची गरज आहे. सातत्याने होणाऱ्या आत्महत्या कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचं मत भाजपचे खासदार आणि माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी व्यक्त केली आहे.

कृषी मालावर टॅक्स, शेतकऱ्यांची डोकेदुखी

सरकारने कृषी मालावरती टॅक्स लावलेला आहे. मात्र हा टॅक्स शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरतोय. त्यामध्ये बियाणांची दरवाढ, यासोबतच बोगस बियाण्यांची होत असलेली विक्री यातून शेतकरी देखील बियाण्यांची प्रतवारी ओळखू शकत नाही. त्यामुळे अनेक ठिकाणावरून शेतकऱ्यांची फसवणूक देखील होत आहे. अशा सर्व परिस्थितीतून शेतकरी जात असताना त्याला नैराश्य येतं आणि शेतकरी कायमची जीवन यात्रा संपवण्याचा निर्णय घेतो.  

सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवतात. मात्र योजना शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याचा आरोप वारंवार होत आहे. त्यामुळे सरकारने शेतकरी योजना राबवताना शेवटच्या शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल अशा पद्धतीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.

दुसरीकडे आमदार बच्चू कडू यांनी तर शेतकऱ्यांनी हत्या करण्याची तयारी केली पाहिजे, मतदानाच्या रुपात हत्या केली पाहिजे असं वक्तव्य केलं. सरकारच्या या पॉलीसी शेतकऱ्यांना मारण्यासाठीच आहेत,  शेतकरी कसा मरेल यात राज्य सरकार सक्सेस झालं असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

मे महिन्यात पश्चिम विदर्भातील जिल्हानिहाय शेतकरी आत्महत्या

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखतDilip Walse Patil : शरद पवार म्हणाले गद्दार, सुट्टी नाही! दिलीप वळसे-पाटलांची पहिली प्रतिक्रियाMahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुनPrakash Mahajan on Amit Thackeray : भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा , मोदींच्या सभेचा मनसेला फायदा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Donald Trump : तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
Purva Walse Patil : शरद पवारांनी आंबेगावच्या सभेत दिलीप वळसे पाटील यांना गद्दार म्हटलं, पूर्वा वळसे पाटील पाण्याचा मुद्दा काढत म्हणाल्या.. होय...
शरद पवार यांच्याकडून दिलीप वळसे पाटील यांच्यावर आंबेगावत गद्दारीचा शिक्का मारला, पूर्वा वळसे पाटील म्हणाल्या...
Embed widget