एक्स्प्लोर

Maharashtra Dairy Farmers : प्रभात (लॅक्टीस) दूध कंपनीची मालमत्ता सील करा; दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीची मागणी

Maharashtra Dairy Farmers : शेतकऱ्यांच्या दुधाचे पैसे थकवल्यानंतर आता प्रभात (लॅक्टीस) कंपनी पोबारा करण्याची शक्यता दावा करत कंपनीची अकोले तालुक्यातील मालमत्ता सील करण्याची मागणी किसान सभेने केली आहे.

Maharashtra Dairy Farmers : प्रभातची (लॅक्टीस) अकोले (Akole) तालुक्यातील मालमत्ता सील करण्याची मागणी अखिल भारतीय किसान सभा (All India Kisan Sabha) आणि  दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने केली आहे. प्रभात (लॉक्टीलीस) दूध कंपनी अकोले तालुक्यातील दूध संकलन बंद करणार असल्याचे कंपनीचे कर्मचारी शेतकऱ्यांना सांगत आहेत. काही संकलन केंद्रांना तशा नोटिसाही पाठविण्यात आल्या आहेत. कंपनीकडून तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पैसे येणे बाकी आहे. शेतकऱ्यांचे हे पैसे न देताच कंपनीला पोबारा करता येऊ नये यासाठी पोलीसांनी व सरकारच्या दुग्धविकास विभागाने हस्तक्षेप करून अकोले तालुक्यातील कंपनीची  मालमत्ता सील करावी अशी मागणी किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने केली आहे.

शेतकऱ्यांच्या देणीबाबत मागील काही दिवसांपासून दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती आक्रमक झाली आहे. प्रभात कंपनीकडून दिवाळीपूर्वी अकोले तालुक्यात 85 हजार लिटर दूध संकलन करण्यात चे होते.  मात्र रीबिटबाबतचे 70 टक्के दूध कंपनीलाच घालण्याची सक्ती करणारे शेतकरी विरोधी धोरण व दूध वजन आणि गुणवत्ता मापनाबाबत संशयास्पद व्यवहारामुळे शेतकऱ्यांनी कंपनीकडे पाठ फिरवली असल्याचे समितीने म्हटले. कंपनीचे तालुक्यातील संकलन प्रतिदिन 85 हजार लिटरवरून 35 हजार लिटरवर खाली आले आहे. आपला व्यवहार सुधारून शेतकऱ्यांचा विश्वास पुन्हा मिळविण्याऐवजी कंपनीने पोबारा करण्याचे धोरण स्वीकारलेले दिसत असल्याचा आरोप किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे नेते डॉ. अजित नवले यांनी केला आहे. 

प्रभात कंपनीने रिबीटसाठी 70 टक्के दूध कंपनीलाच घालण्याची अट लावून तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना कोट्यावधी रुपयांचे रीबिट नाकारले आहे. कंपनीने शेतकऱ्यांना 31 मार्च 2021 पासून 30 सप्टेंबर  2022 या कालावधीतील रीबिटचा हिशोब द्यावा व येणे बाकी निघत असेल तर ते शेतकऱ्यांना  आदा करावे अशी साधी मागणी शेतकऱ्यांनी केली असल्याचे डॉ. नवले यांनी सांगितले. 

कंपनीने संकलन केंद्रावर बसविलेले मिल्कोमिटर इतरांच्या तुलनेत कमी रीडिंग दाखवत आहेत. परिणामी शेतकऱ्यांची लुट होत आहे. कंपनीने हे मिल्कोमिटर तपासून घ्यावेत व सदोष मिल्कोमिटर बदलावेत अशी शेतकऱ्यांची मागणी असल्याचे समितीचे नेते सदाशिव साबळे यांनी सांगितले.

रीबिट देण्यासाठी कंपनीने 70 दिवसांची अट लावल्यामुळे शेतकऱ्यांचे निवड स्वातंत्र्य धोक्यात आले आहे. मागील दिवसांचे रिबीट बुडेल या भीतीपोटी शेतकऱ्यांना  तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करायला लावला जातो आहे. प्रभातसह इतरही काही कंपन्यांनी शेतकऱ्यांना वेठीस धरण्याची ही नवी पद्धत दूध व्यवसायात आणली असल्याचा आरोप त्यांनी केला. सर्वच कंपन्यांनी ही जुल्मी पद्धत बंद करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

कंपनीकडून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पैसे येणे बाकी आहेत. दिवाळीपासून आजपर्यंतचे रीबिट येणे बाकी आहे. अशा पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यातील कंपनीची मालमत्ता पोलीसांनी सील करावी व  शेतकऱ्यांची संपूर्ण बाकी वसूल होईपर्यंत ही मालमत्ता ताब्यात ठेवावी, अशी मागणी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती  व किसान सभेने केली आहे. शेतकऱ्यांनी  मागण्यांचे निवेदन संघटनेने दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे, तसेच दुग्धआयुक्त, दुग्धविकास अधिकारी व संबंधित यंत्रणेला पाठविले असल्याची माहिती डॉ. अजित नवले यांनी दिली. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Philadelphia Plane Crash : विमानाने उड्डाण करताच अवघ्या 30 सेकंदात घनदाट लोकवस्तीवर कोसळले; भीषण दुर्घटनेत विमानातील सर्व मृत्यूमुखी पडल्याची भीती
Video : विमानाने उड्डाण करताच अवघ्या 30 सेकंदात घनदाट लोकवस्तीवर कोसळले; भीषण दुर्घटनेत विमानातील सर्व मृत्यूमुखी पडल्याची भीती
Rahul Gandhi : राहुल गांधी अमेरिकेत ज्या तरुणाला भेटले तो मायदेशी परतला; घर गहाण ठेवत 'डंकी' मार्गाने अमेरिकेत गेला, पण.. परतून येताच सांगितली भयावह कहाणी
राहुल गांधी अमेरिकेत ज्या तरुणाला भेटले तो मायदेशी परतला; घर गहाण ठेवत 'डंकी' मार्गाने अमेरिकेत गेला, पण.. परतून येताच सांगितली भयावह कहाणी
Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंचा थाटच न्यारा! 'तो' सोन्याचा मुकुट अमरावती भाजपकडे केला सुपूर्द; म्हणाले...
बावनकुळेंचा थाटच न्यारा! 'तो' सोनेरी मुकुट अमरावती भाजपकडे केला सुपूर्द; म्हणाले...
Beed:नामदेव शास्त्रींच्या वादग्रस्त वक्तव्यावरून मोठा खल, धनंजय देशमुख पुराव्यांसकट जाणार भगवानगडावर, मस्साजोग प्रकरणाला नवे वळण
नामदेव शास्त्रींच्या वादग्रस्त वक्तव्यावरून मोठा खल, धनंजय देशमुख पुराव्यांसकट जाणार भगवानगडावर, मस्साजोग प्रकरणाला नवे वळण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Union Budget 2025 : अर्थ बजेट : अर्थसंकल्पावर तज्ज्ञांचं मतं काय? सर्वसामान्य, शेतकरी काय मिळणार?ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 01 February 2025Nirmala Sitharaman Budget 2025 : निर्मला सीतारामण आठव्यांदा मांडणार अर्थसंकल्प; सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळणार?ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 01 February 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Philadelphia Plane Crash : विमानाने उड्डाण करताच अवघ्या 30 सेकंदात घनदाट लोकवस्तीवर कोसळले; भीषण दुर्घटनेत विमानातील सर्व मृत्यूमुखी पडल्याची भीती
Video : विमानाने उड्डाण करताच अवघ्या 30 सेकंदात घनदाट लोकवस्तीवर कोसळले; भीषण दुर्घटनेत विमानातील सर्व मृत्यूमुखी पडल्याची भीती
Rahul Gandhi : राहुल गांधी अमेरिकेत ज्या तरुणाला भेटले तो मायदेशी परतला; घर गहाण ठेवत 'डंकी' मार्गाने अमेरिकेत गेला, पण.. परतून येताच सांगितली भयावह कहाणी
राहुल गांधी अमेरिकेत ज्या तरुणाला भेटले तो मायदेशी परतला; घर गहाण ठेवत 'डंकी' मार्गाने अमेरिकेत गेला, पण.. परतून येताच सांगितली भयावह कहाणी
Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंचा थाटच न्यारा! 'तो' सोन्याचा मुकुट अमरावती भाजपकडे केला सुपूर्द; म्हणाले...
बावनकुळेंचा थाटच न्यारा! 'तो' सोनेरी मुकुट अमरावती भाजपकडे केला सुपूर्द; म्हणाले...
Beed:नामदेव शास्त्रींच्या वादग्रस्त वक्तव्यावरून मोठा खल, धनंजय देशमुख पुराव्यांसकट जाणार भगवानगडावर, मस्साजोग प्रकरणाला नवे वळण
नामदेव शास्त्रींच्या वादग्रस्त वक्तव्यावरून मोठा खल, धनंजय देशमुख पुराव्यांसकट जाणार भगवानगडावर, मस्साजोग प्रकरणाला नवे वळण
Budget 2025 Live Updates : बजेट सादर होण्यापूर्वीच दिलासा, गॅस सिंलिंडर किती रुपयांनी स्वस्त झाला? आजपासून 4 मोठे बदल
बजेट सादर होण्यापूर्वीच दिलासा, गॅस सिंलिंडर किती रुपयांनी स्वस्त झाला? आजपासून 4 मोठे बदल
Pushpa 2 : रिलीजच्या 50 दिवसांनंतरही 'पुष्पा 2' चा धमाका कायम, अल्लू अर्जूनच्या नावावर नवा विक्रम
रिलीजच्या 50 दिवसांनंतरही 'पुष्पा 2' चा धमाका कायम, अल्लू अर्जूनच्या नावावर नवा विक्रम
Sujay Vikhe : बाळासाहेब थोरातांच्या पराभवावर राज ठाकरेंना संशय; आता सुजय विखेंचा जोरदार पलटवार; म्हणाले, 'मी त्यांचा फार मोठा फॅन, पण...'
बाळासाहेब थोरातांच्या पराभवावर राज ठाकरेंना संशय; आता सुजय विखेंचा जोरदार पलटवार; म्हणाले, 'मी त्यांचा फार मोठा फॅन, पण...'
आम्ही आंबेडकरवादी संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांबरोबर खंबीरपणे उभे आहोत; नामदेवशास्त्रींच्या वक्तव्यानंतर 'या' नेत्याचा पलटवार
आंबेडकरवादी संतोष देशमुख कुटुंबीयांच्या खंबीरपणे उभे आहेत, नामदेवशास्त्रींच्या वक्तव्यानंतर 'या' नेत्याचा पलटवार
Embed widget