(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Milk Production : भारत जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश, जागतिक उत्पादनात 24 टक्के वाटा
Milk Production : भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक (Milk Production) देश ठरला आहे.
Milk Production : भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक (Milk Production) देश ठरला आहे. कारण जागतिक पातळीवरील दूध उत्पादनात भारताचा 24 टक्के वाटा आहे. जागतिक दूध उत्पादनात भारत (India) हा प्रथम स्थानी आहे. अन्न आणि कृषी संघटनेच्या कॉर्पोरेट सांख्यिकी डेटाबेस (एफएओएसटीएटी) मधील उत्पादनविषयक माहितीनुसार ही आकडेवारी समोर आली आहे. केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुपालन तसेच दुग्धविकास मंत्री पुरुषोत्तम रुपाला (Minister Parshottam Rupala) यांनी लोकसभेत लेखी उत्तराद्वारे ही माहिती दिली.
India Milk Production : गेल्या आठ वर्षांत भारतात दूध उत्पादनात 51 टक्क्यांची वाढ
वर्ष 2021-22 मध्ये जागतिक पातळीवरील दूध उत्पादनात 24 टक्के योगदान नोंदवत भारताने या क्षेत्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे. वर्ष 2014-15 ते 2021-22 अशा गेल्या आठ वर्षांच्या कालावधीत, भारतातील दूध उत्पादनात 51 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. तर वर्ष 2021-22 मध्ये देशातील दूध उत्पादन 22 कोटी टनांपर्यंत वाढल्याचे मंत्री पुरुषोत्तम रुपाला यावेळी म्हणाले.
Uttar Pradesh, Rajasthan : दूध उत्पादनात उत्तर प्रदेशसह राजस्थान आघाडीवर
भारतातील सर्वात जास्त दूध उत्पादक करणारे राज्य म्हणून उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि राजस्थानकडे (Rajasthan) पाहिले जाते. भारतात उत्तर प्रदेश हे राज्य दूध उत्पादनात पहिल्या क्रमांकावर आहे. तर राजस्थान दूध उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आहे. नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाने याबाबतची माहिती दिली होती. राजस्थाननंतर दूध उत्पादनात मध्य प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर आहे. गुजरात चौथ्या क्रमांकावर तर आंध्र प्रदेश पाचवा क्रमांक आणि पंजाब दूध उत्पादनात सहाव्या क्रमांकावर असल्याची माहिती नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाने दिली आहे.
Dairy Development : दुग्ध विकास क्षेत्राचं खरं नेतृत्व महिलांकडे
देशाच्या अर्थव्यवस्थेत दुग्ध व्यवसायाचे मोठे योगदान आहे. दूध उत्पादनात भारताचा जगात पहिला क्रमांक लागतो. जागतिक दूध उत्पादनात भारताचे योगदान हे 24 टक्के आहे. भारतातील दुग्ध सहकार हा जगातील एकमेव म्हणता येईल असा आहे. हा व्यवसाय गरीब देशांसाठी उद्योगांचे एक आदर्श उदाहरण ठरु शकेल असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी व्यक्त केले होते. भारताच्या दुग्ध विकास (Dairy Development) क्षेत्राचे खरे नेतृत्व महिलाच करत आहेत. कारण दुग्ध विकासात महिलांचे 70 टक्के प्रतिनिधित्व असल्याचंही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले होते.