एक्स्प्लोर

Maharashtra Budget 2023 : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी 'महाकृषी विकास अभियान', पाच वर्षात तीन हजार कोटी खर्च करणार 

Maharashtra Budget 2023 : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी आता महाकृषी विकास अभियान (Mahakrishi Vikas Abhiyan) राबवण्यात येणार आहे.

Maharashtra Budget 2023 : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Finance Minister Devendra Fadnavis) 2022-23 चा अर्थसंकल्प (Budget) सादर केला आहे. यामध्ये त्यांनी शेतीसाठी विविध योजनांची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी आता महाकृषी विकास अभियान (Mahakrishi Vikas Abhiyan) राबवण्यात येणार आहे. यासाठी पाच वर्षात तीन हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला जाणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली. 

एकात्मिक पीक आधारीत प्रकल्प आराखडा तयार करण्यात येणार 

राज्यातील शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी राज्या सरकारनं पावले उचलली आहेत. यासाठी आता महाकृषी विकास अभियान राबवण्यात येणार आहे. पीक, फळपीक घटकाच्या उत्पादनापासून ते मूल्यवर्धनासाठी तालुका तसेच जिल्हानिहाय शेतकरी गट, समूहासांसाठी योजना तयार करण्यात येणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली. एकात्मिक पीक आधारीत प्रकल्प आराखडा तयार करण्यात येणार आहे. यासाठी तीन हजार कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. 

नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय 

देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी विविध योजना जाहीर केल्या आहेत. यामध्ये नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. यासाठी तीन वर्षांत राज्यातील 25 लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रीय शेतीखाली येणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. एक हजार जैव निवीष्ठा केंद्र उभारण्यात येणार आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे. यासाठी  3 वर्षांत 1000 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.  शेतीच्या विकासासाठी सर्वसमावेशकता आवश्यक असल्याचे फडणवीस म्हणाले. 

राज्यात 'नमो शेतकरी सन्मान निधी' योजना

देवेंद्र फडणवीसांनी शेतीसाठी विविध योजना जाहीर केल्या आहेत. यामध्ये महत्वाची घोषणा म्हणजे केंद्र सरकारच्या पंतप्रधान सन्मान निधी (PM-Kisan Samman Nidhi)  योजनेच्या धर्तीवर राज्यात 'नमो शेतकरी सन्मान निधी' (NAMO Shetkari Maha Sanman Nidhi Maharashtra) योजनेची घोषणा करण्यात आली आहे.  या योजनेअंतर्गत वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यावर केंद्राच्या सहा हजार रुपयांसह महाराष्ट्राचे सहा हजार जमा होतील. म्हणजे वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यावर आता 12 हजार रुपये जमा होणार आहेत. 'नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा' लाभ राज्यातील 1 कोटी 15 लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे. यासाठी 2023-24 मध्ये  सहा हजार 900 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावीत असल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली. 

महत्त्वाच्या बातम्या:

Maharashtra Budget : फडणवीसांचा पहिल्याच चेंडूवर षटकार, केंद्राच्या धर्तीवर राज्याचाही सहा हजारांचा कृषी सन्मान निधी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Job Majha : नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेडमध्ये नोकरीची संधी, अटी काय?Maratha Samaj on Walmik Karad | वाल्मीक कराडची नार्को टेस्ट करा, नांदेड मधील मराठा समाजाची मागणीSantosh Deshmukh Muder Case | संतोष देशमुखांची हत्या नेमकी कशी केली? आरोपींनी सांगितली माहितीManoj Jarange Speech Dharashiv| धनंजय मुंडे टोळी थांबेव, माझ्या नादी लागू नको, जरांगेंचा कडक इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget