एक्स्प्लोर
(Source: Poll of Polls)
Pune 'पोलीस पुन्हा अपयशी', टोळीयुद्धात अल्पवयीन मुलांचा वापर, Ganesh Kale च्या हत्येने पुणे हादरल
पुण्यातील आंदेकर (Andekar) आणि कोमकर (Komkar) टोळीयुद्ध पुन्हा एकदा भडकले असून, गणेश काळेच्या (Ganesh Kale) हत्येने शहरात खळबळ उडाली आहे. 'गणेश काळेच्या हत्येमुळे पुण्यातल्या टोळीयुद्धाला लगाम घालण्यात पोलीस पुन्हा एकदा अपयशी ठरल्याची' चर्चा सुरू झाली आहे. या टोळीयुद्धात अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीसाठी वापर होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. १ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या गणेश काळेच्या हत्येतील चार आरोपींपैकी दोन जण अल्पवयीन असल्याची माहिती आहे. यापूर्वी, २ ऑक्टोबर २०२३ रोजी निखिल आखाडेच्या हत्येत दोन अल्पवयीन आरोपी होते. १ सप्टेंबर २०२४ रोजी माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येतील २१ आरोपींपैकी एक अल्पवयीन होता. त्यानंतर ४ सप्टेंबर २०२५ रोजी आयुष कोमकरच्या हत्येतही अल्पवयीन गुन्हेगारांचा सहभाग होता. या घटनांमुळे पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















