Maharashtra Budget : फडणवीसांचा पहिल्याच चेंडूवर षटकार, केंद्राच्या धर्तीवर राज्याचाही सहा हजारांचा कृषी सन्मान निधी
Maharashtra Budget : केंद्रातील पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर आता राज्यातही 'नमो शेतकरी सन्मान निधी' (NAMO Shetkari Maha Sanman Nidhi Maharashtra) योजनेची घोषणा केली.
Maharashtra Budget 2023 : अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा 2023-24 या वर्षाकरिता अर्थसंकल्प सादर केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा हा पहिला अर्थसंकल्प आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्री म्हणून मांडलेला पहिलाच अर्थसंकल्प सादर केला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी पेटारा उघडला आहे. केंद्रातील पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना (PM-Kisan Samman Nidhi) या धर्तीवर 'नमो शेतकरी सन्मान निधी' (NAMO Shetkari Maha Sanman Nidhi Maharashtra) योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यावर केंद्राच्या 6 हजार रुपयांसह महाराष्ट्राचे 6 हजार जमा होतील. म्हणजे वर्षाला शेतकऱ्याच्या खात्यावर 12 हजार रुपये जमा होतील.
नमो शेतकरी महा सन्मान निधी नेमका काय? (What is NAMO Shetkari Maha Sanman Nidhi)
- नमो शेतकरी महा सन्मान निधी ही केंद्राच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेसारखीच योजना आहे.
- या योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर महाराष्ट्र सरकार वर्षाला ६ हजार रुपये जमा करेल.
- केंद्र सरकारकडून दर तीन महिन्याला २ हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात.
- याप्रमाणेच आता राज्य सरकारही दर तीन महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यावर २ हजार रुपये जमा करेल.
- यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाला केंद्राचे ६ हजार आणि महाराष्ट्र सरकारचे ६ हजार रुपये असे एकूण १२ हजार रुपये जमा होतील.
2023-24 मध्ये सहा हजार 900 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावीत
'नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा' लाभ राज्यातील 1 कोटी 15 लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे. यासाठी 2023-24 मध्ये सहा हजार 900 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावीत असल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली.
नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणार
नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. तीन वर्षांत 25 लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रीय शेतीखाली येणार आहे. 1000 जैवनिविष्ठा स्त्रोत केंद्र स्थापन करणार आहे. डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे. 3 वर्षांत 1000 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.
(NAMO Shetkari Maha Sanman Nidhi Maharashtra scheme announced by FM Devendra Fadnavis know details PM-Kisan Samman Nidhi)
महत्त्वाच्या बातम्या: