Raju Shetti : कर्नाटकमध्ये शेतकऱ्यांना FRP पेक्षा 100 रुपये अधिक, महाराष्ट्र सरकारचे डोळे उघडणार का? राजू शेट्टींचा सवाल
FRP : कर्नाटक सरकारनं शेतकऱ्यांना FRP पेक्षा अधिक 100 रुपये देण्याचे आदेश साखर कारखान्यांना दिले आहेत. यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी सरकारवर टीका केली आहे.

Raju Shetti on FRP : ऊसाला मिळणाऱ्या FRP च्या मुद्यावरुन पुन्हा एकदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. केंद्र सरकारच्या प्रचलित इथेनॉल (Ethanol) खरेदीच्या धोरणामुळं ऊसाची FRP देऊनही साखर कारखान्यांकडे अतिरिक्त पैसे शिल्लक राहतात. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मागील वर्षासह या वर्षीच्या FRP बरोबर अधिकचे 200 रुपये द्यावेत, अशी मागणी सातत्यानं लावून धरली होती. मात्र, सरकारनं अद्याप याबबात कोणताही निर्णय घेतला नसल्याचे राजू शेट्टी म्हणाले. उलट कर्नाटक सरकारनं शेतकऱ्यांना FRP पेक्षा अधिक 100 रुपये देण्याचे आदेश साखर कारखान्यांना दिले आहेत. त्यामुळं राज्य सरकारचे आता तरी डोळे उघडणार का? असा सवाल शेट्टींनी केला आहे.
नेमकं काय म्हणाले राजू शेट्टी?
केंद्र सरकारच्या इथेनॉल खरेदीच्या धोरणामुळं ऊसाची FRP देऊनही साखर कारखान्यांकडे अतिरिक्त पैसे शिल्लक राहतात. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मागील वर्षासह या वर्षीच्या FRP बरोबर अधिकचे 200 रुपये द्यावेत अशी मागणी सातत्यानं केली होती. आता कर्नाटक सरकारने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या भुमिकेचे समर्थन केलं आहे. कारण कर्नाटक सरकारनं FRP अधिक 100 रुपये शेतकऱ्यांना देण्याचे आदेश साखर कारखान्यांना दिले असल्याचे राजू शेट्टींनी म्हटलं आहे. त्यामुळं महाराष्ट्र सरकारचे आता तकरी डोळे उघडतील का? असा सवाल राजू शेट्टींनी केला आहे.
काय आहे कर्नाटक सरकारचा पॅटर्न
कर्नाटकमध्ये FRP शिवाय इथेनॉल विक्रीतून येणाऱ्या रकमेचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे. FRP व्यतिरिक्त इथोनॉलचा लाभ शेतकऱ्यांना देण्याचा हा निर्णय ऐतिहासिक असल्याचं कर्नाटकचे मंत्री शंकर पाटील मुनेनकोप्पा यांनी सांगितलं आहे. इथेनॅाल विक्रीतून आलेली अधिकची रक्कम आता शेतकऱ्यांना मिळणार आहे. यामुळं आता शेतकऱ्यांना प्रतिटन 3 हजार 100 रूपये मिळू शकतात. FRP शिवाय इथेनॉलचा लाभ देण्याचा राज्याच्या साखर इतिहासातील हा पहिलाच निर्णय असल्याचे मंत्री शंकर पाटील मुनेनकोप्पा म्हणाले. या रकमेमुळं कर्नाटकातील शेतकऱ्यांना 204 कोटी रुपये अधिक मिळतील. केंद्राची FRP आणि इथेनॉलचा अधिकचा दर असे मिळून कर्नाटकातील शेतकऱ्यांना 3 हजार 100 रुपये प्रति टनापर्यंतचा दर मिळू शकेल असे पाटील यांनी सांगितले. कर्नाटक हे FRP पेक्षा अधिक दर देणारं देशातील पहिलं राज्य असल्याचा दावा मंत्री शंकर पाटील मुनेनकोप्पा यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
Sugarcane FRP : कर्नाटकचा FRP पॅटर्न, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना इथेनॉल विक्रीचाही मिळणार लाभ, देशात पहिलाच प्रयोग
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
