(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भाग्यवान गाय! एका गायीनं पालटलं कर्जबाजारी कुटुंबाचं नशीब, कसा घडला चमत्कार?
एका गायीच्या माध्यमातून एका कुटुंबाचे नशीब बदलले आहे. तुम्हाला खरे वाटणार नाही पण हे सत्य आहे.
Lucky Cow : एका गायीच्या माध्यमातून एका कुटुंबाचे नशीब बदलले आहे. तुम्हाला खरे वाटणार नाही पण हे सत्य आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका भाग्यवान गायी आणि कुटुंबाविषयी सांगणार आहोत. एक गाय संपूर्ण कुटुंबासाठी कशी भाग्यवान ठरली आणि मग त्या कुटुंबाचे नशीब बदलले. जे कुटुंब एकेकाळी गरिबीच्या भीषण टप्प्यातून जात होते. घरावर कर्जाचा डोंग होता. पण हे कुटुंब आज त्या गायींमुळं सुखी आणि समृद्ध जीवन जगत आहे. घरात गाय आल्याने कुटुंबाचे नशीब सुधारले, घरात सरकारी नोकरी लागली, व्यवसाय सुरु झाला आणि त्यानंतर कुटुंबाने मागे वळून पाहिले नाही.
ही चमत्काराची कहाणी आहे हरियाणा राज्यातील भिवानी जिल्ह्यातील तोशाम शहरातील हरिपूर गावातील एका कुटुंबाची. गावात राहणाऱ्या ऋतिककडे ही गाय आहे. या गायीने त्यांच्या कुटुंबाचे नशीबच पालटले आहे. शेतकऱ्याशी संवाद साधताना हृतिकने सांगितले की, काही वर्षांपूर्वी वडील रस्ते अपघातात जखमी झाले होते, त्यामुळे ते पूर्णपणे कर्जबाजारी झाले होते. संपूर्ण कुटुंब कर्जात इतके बुडाले होते की त्यांच्याकडे म्हैस घेण्यासही पैसे नव्हते. यानंतर हृतिकने एक गाय आणली. तिची सेवा आणि संगोपन सुरू केले. त्यानंतर काही काळातच ही गाय आपल्या कुटुंबासाठी भाग्यवान ठरु लागली आहे.
गाय देते 18 ते 20 लिटर दूध
गाय घरी आणल्यानंतर मिळालेल्या यशाची कहाणी सांगताना हृतिकने सांगितले की, गाय आणल्यानंतर तो खासगी पशुवैद्य म्हणून काम करू लागला. काम व्यवस्थित चालू झाले. त्यानंतर त्यांनी एका खासगी शाळेत भागीदारी केली. एवढेच नाही तर त्याच्या बहिणीला सरकारी शिक्षिकेची नोकरी लागली. हृतिक म्हणतो की आज त्याच्याकडे चांगले घर आहे. कार आहे, चांगला व्यवसाय आहे, बहिणीला नोकरी आहे, कुटुंबात प्रगती आहे आणि यामुळे आनंद मिळतो. हृतिक म्हणतो की त्याच्या घरात इतका आनंद फक्त एका गायीमुळे आला आहे, जिची ते सर्वजण सेवा करतात. हृतिक म्हणतो की त्यांची भाग्यवान गाय 18 ते 20 लिटर दूध देते. गाय गहू आणि बाजरी लापशी खाते. तसेच सफरचंद आणि गाजर मोठ्या उत्साहाने खाते. या गायीची किंमत चार लाख रुपये असल्याचे हृतिकचे म्हणणे आहे. पण तो करोडो रुपयांनाही विकणार नाही.
आजूबाजूच्या गावातील लोक गायीला पाहायला येतात
हृतिकच्या या भाग्यवान गायीची चर्चा परिसरातच नाही तर आजूबाजूच्या गावातही होत आहे. ते पाहण्यासाठी अनेक लोक येतात. गाय पाहण्यासाठी आलेल्या राहुलने सांगितले की, या गायीबद्दल बरीच चर्चा ऐकली होती म्हणून ती पाहण्यासाठी आलो. ते म्हणाले की ही गाय भाग्यवान असण्यासोबतच अतिशय सुंदर आणि शांत आहे. ही गाय देशी गाय असूनही ती 18 ते 20 लिटर दूध देते, ही मोठी गोष्ट आहे.
महत्त्वाच्या बातम्या: