एक्स्प्लोर

कोकणच्या हापूसवर अस्मानी संकट; यंदा केवळ 20% उत्पादन होणार? हजारो कोटींच्या व्यवसायाला फटका

वातावरणातील लहरीपणाचा फटका बसल्याने हापूस उत्पादक शेतकरी पूर्णपणे भरडला गेलाय.

Ratnagiri: हापूस! आपल्यापैकी अनेकांना आवडणारा आणि कोकणची ओळख बनलेला हा आंबा जगभर प्रसिद्ध आहे. मात्र, यंदा हाच हापूस कोकणातील शेतकऱ्यांसाठी मोठं संकट घेऊन आला आहे. शेतकऱ्यांच्या मते यंदा केवळ 20 टक्केच हापूस उत्पादन होणार आहे. त्यामुळे केवळ आंबा उत्पादकच नाही तर हापूसशी संबंधित सर्व पूरक व्यवसायांवरही मोठा परिणाम होताना दिसतोय. वातावरणातील लहरीपणाचा फटका बसल्याने हापूस उत्पादक शेतकरी पूर्णपणे भरडला गेलाय. (Kokan Alphanso)

शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट

“यंदा जगायचं कसं? आणि जगवायचं कसं?” असा मोठा प्रश्न कोकणातील बागायतदारांसमोर उभा ठाकलाय. वातावरणातील बदलांमुळे हापूस उत्पादन घटलं असून शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील पावस येथील आनंद देसाई यांच्यासारखे अनेक शेतकरी या संकटातून जात आहेत. वडिलोपार्जित हापूस बागा आणि कॅनिंग व्यवसाय सांभाळणाऱ्या देसाईंचं म्हणणं आहे की, यंदाची परिस्थिती अभूतपूर्व आहे.

हजारो कोटींच्या व्यवसायाला फटका

कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर हापूसची लागवड केली जाते. काही जाणकारांच्या मते, हापूस आणि त्याच्याशी संबंधित व्यवसायातून सुमारे 2500 कोटी रुपयांची उलाढाल होते. रत्नागिरीत सुमारे 1.20 लाख हेक्टर, सिंधुदुर्गात 34 ते 35 हजार हेक्टर आणि रायगडमध्ये 11 ते 12 हजार हेक्टर क्षेत्रावर आंबा लागवड आहे.

मात्र, यंदा उत्पादन घटल्यामुळे ट्रान्सपोर्ट, पॅकिंगसाठी लागणारे साहित्य, गवत, पेट्यांसाठी लाकूड, मजूर, गाड्या अशा सर्वच क्षेत्रांवर परिणाम झाला आहे. निरूळ गावातील स्वरूप गांगण यांसारखे हापूस वाहतूकदारही या संकटामुळे अडचणीत आले आहेत.

मजूर आणि कर्जाचा प्रश्न

कोकणात हापूसच्या हंगामात नेपाळमधून मोठ्या प्रमाणावर मजूर येतात. स्थानिक मजुरांनाही काम मिळतं. मात्र, यंदा उत्पादन घटल्यामुळे मजुरांना काम देणं आणि त्यांचे पगार देणं शेतकऱ्यांसाठी कठीण झालं आहे. अनेक शेतकऱ्यांवर आधीच लाखोंचं कर्ज असून त्यातून बाहेर पडण्याची चिंता वाढली आहे.

या अस्मानी संकटातून मार्ग काढण्यासाठी शेतकऱ्यांनी तज्ज्ञ मार्गदर्शनाची मागणी केली आहे. औषध फवारणी आणि शेती व्यवस्थापनाबाबत योग्य सल्ला मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाकडून यावर मार्गदर्शन मिळण्याची शेतकरी वाट पाहत आहेत.

निसर्गाचा फटका, शेतकरी हतबल

जगभरात कोकणच्या हापूसची ख्याती...पण, यंदा मात्र निसर्गाची वक्रदृष्टी त्याच्यावर पडलीय...निसर्गाच्या लहरीपणाच्या या चक्रात असलेला हापूस आणि त्यात भरडणारा कोकणातील शेतकरी यांची स्थिती यंदा मात्र बिकट आहे...त्यामुळे आता जगायचं कसं? आणि जगवायचं कसं? हाच सवाल उरात घेऊन कोकणातील शेतकरी परिस्थितीशी लढतोय....

महत्त्वाच्या बातम्या

कारखानदारांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, थकीत ऊसबिल आणि रिकव्हरी चोरीप्रश्नी राजू शेट्टी आक्रमक; थेट साखर आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक
कारखानदारांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, थकीत ऊसबिल आणि रिकव्हरी चोरीप्रश्नी राजू शेट्टी आक्रमक; थेट साखर आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक
सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
मोठी बातमी! पशुधनाचा मृत्यू झाल्यास मिळणार आर्थिक मदत, काय आहेत निकष? कोणत्या जनावरांसाठी किती मदत?
मोठी बातमी! पशुधनाचा मृत्यू झाल्यास मिळणार आर्थिक मदत, काय आहेत निकष? कोणत्या जनावरांसाठी किती मदत?
सोयाबीन पेरलं पण उगवलच नाही, तब्बल 844 हून अधिक शेतकऱ्यांच्या तक्रारी, बियाणांसंदर्भात महाबीजनं घेतला मोठा निर्णय
सोयाबीन पेरलं पण उगवलच नाही, तब्बल 844 हून अधिक शेतकऱ्यांच्या तक्रारी, बियाणांसंदर्भात महाबीजनं घेतला मोठा निर्णय

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe Marathi News: बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
Nashik Earthquake Marathi News: नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
Embed widget