Kisan Sabha : शेतकरी प्रश्नावरुन किसान सभा आक्रमक, 26 डिसेंबरला नागपूर विधिमंडळावर भव्य मोर्चा
शेतकऱ्यांसह शेतमजुरांच्या विविध मागण्यासंदर्भात किसान सभेच्या वतीनं 26 डिसेंबरला नागपूर विधिमंडळावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.
Kisan Sabha : शेतकरी आणि शेतमजुरांच्या प्रश्नावरुन महाराष्ट्र राज्य किसान सभा (Kisan Sabha) चांगलीच आक्रमक झाली आहे. शेतकऱ्यांसह शेतमजुरांच्या विविध मागण्यासंदर्भात मैदानात उतरण्याचा इशारा किसान सभेच्या वतीनं देण्यात आला आहे. येत्या 26 डिसेंबरला नागपूर विधिमंडळावर शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात मोठ्या संख्येनं शेतकरी आणि शेतमजुरांनी सहभागी व्हावं असं आवाहन राज्य किसान सभेच्या वतीनं करण्यात आलं आहे. याबाबतची माहिती किसान सभेचे नेते राजन क्षीरसागर यांनी दिली आहे.
डिसेंबर महिन्यात राज्य विविधमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणार आहे. या अधिवेशादरम्यान मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती राजन श्रीरसागर यांनी दिली. दरम्यान, वणी ते नागपूर अशी पदयात्रा करीत शेतकऱ्यांची संघर्ष दिंडी काढण्यात येणार आहे. शेतकरी आणि शेतमजुरांचा थेट नागपूर विधींडलावर मोर्चा नेणार असल्याचे किसान सभेच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. यासंबंधीचे एक पोस्टर देखील त्यांनी प्रकाशीत केलं आहे.
नेमक्या काय आहेत मागण्या?
- पुरग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या हक्कासाठी
- गायरान धारकांच्या हक्कासाठी तसेच वनजमिनींच्या पट्यासाठी हा मोर्चा निघणार आहे
- लुटारु पीक विमा कंपन्यांना धडा शिकवण्यासाठी आम्ही मैदानात उतरणार
- तांदूळ आणि सोयाबीन पिकांत्या रास्त हमाभावासाठी तसेच बोनस मिळवण्यासाठी मोर्चा
- प्रगल्पग्रस्तांच्या हक्कासाठी तसेच भुसंपादनाच्या मावेजासाठी
- मोटार पाईप लाईन तसेच शेतकऱ्यांना दिर्घ मुदतीचे कर्ज मिळावे यासाठी
- आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्ज माफीसाठी
- वीज हक्कासाठी
- शेतकऱ्यांच्या संपूर्ण वीज बिल माफीसाठी
- वन्य पशुमुळं होणारी मनुष्यहानी तसेच पीकहानी बंद करा
- घरकुलासाठी वाढीव अनुदजान व शेतकऱ्यांच्या जमीन हक्कासाठी
अशा विविध शेतकरी आणि शेतमजुरांच्या मागण्या आहेत. या मागण्यांसाठी आम्ही नागपूर विधिमंडळावर शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामुळं सरकार त्याआधी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करणार का? हे पाहमं महत्वाचं ठरणार आहे.
यंदा अतिवृष्टीचा पिकांना मोठा फटका
यावर्षी राज्याच्या बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला. अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीनं थैमान घातलं होतं. याच शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांची हातात आलेली उभी पीकं वाया गेली आहेत. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. अतिवृष्टीचा सर्वात मोठा फटका मराठवाडा आणि विदर्भाला बसला आहे. काही ठिकाणी पीक वाया गेली आहेत, तर काही ठिकाणी जमिनीही खरवडून गेल्या आहेत. दुसरीकडं अतिवृष्टीच्या तडाख्यातून वाचलेल्या पिकांवर रोगराईचा परिणाम झाला आहे. त्यामुळं उत्पादनात मोठी घट आली आहे. अशातच बँकांकडून शेतकऱ्यांनी कर्ज काढलं आहे. आता हे कर्ज कसं फेडायचं असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. त्यामुळं शेतकरी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: