Cotton News : देशात यंदा कापसाचं पुरेसं उत्पादन, वस्त्रोद्योग राज्यमंत्र्यांची माहिती, वाचा मागील पाच वर्षातील स्थिती
Cotton production : नैसर्गिक संकट येऊनसुद्धा देशात कापसाचं (Cotton) पुरेसं उत्पादन होण्याचा अंदाज केंद्र सरकारकडून (Central Government) व्यक्त करण्यात आला आहे.
Cotton production News : वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहेत. याचा परिणाम शेती पिकांवर होत असल्याचे चित्र दिसत आहे. विविध प्रकारची नैसर्गिक संकट येऊनसुद्धा देशात कापसाचं (Cotton) पुरेसं उत्पादन होण्याचा अंदाज केंद्र सरकारकडून (Central Government) व्यक्त करण्यात आला आहे. देशात कापसाचे उत्पादन अंदाजे 341.91 लाख गाठी असल्याची माहिती केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोश (Minister Darshana Jardosh) यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. तर देशात अंदाजे कापसाचा वापर हा 311 लाख गाठी असल्याचे दर्शना जरदोश यांनी सांगितले.
यावर्षी काही ठिकाणी अतिवृष्टीचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. यातून काही शेतकऱ्यांनी कशीबशी त्यांची पीक वाचवली होती, मात्र, पुन्हा परतीच्या पावसाचा काही ठिकाणी पिकांना मोठा फटका बसला आहे. विशेषत: महाराष्ट्रात मराठवाडा आणि विदर्भात शेती पिकांचं मोठं यावर्षी नुकसान झालं आहे. तिथे कापूस आणि सोयाबीन पिकांना फटका बसला आहे. मात्र, नैसर्गिक संकट येऊनसुद्धा एकूणच देशाचा विचार केला तर यावर्षी कापसाचं पुरेसं उत्पादन होणार असल्याची माहिती दर्शना जरदोश यांनी दिली.
मागील पाच वर्षात कापसाच्या उत्पादनाची स्थिती
मागील पाच वर्षाचा कापसाच्या उत्पादनाचा विचार केला तर 2017-18 साली कापसाचे विक्रमी उत्पादन झाले होते. 2017-18 साली कापसाचे 370 लाख गाठी इतके उत्पादन झाल्याची माहिती केंद्र सरकारच्या वतीनं देण्यात आली आहे. तर 2018-19 या वर्षात 333 लाख गाठी, 2019-20 मध्ये 365 तसेच 2020-21 मध्ये 352 लाख गाठी, तर 2021-22 मध्ये 312 लाख गाठी कापसाचे उत्पादन झाले आहे. तर 2022 ते 2023 या काळात देशात 341 लाख गाठी कापसाच्या उत्पादनाचा अंदाज असल्याची माहिती केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोश यांनी राज्यसभेत दिली आहे.
कापसाची उत्पादकता वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील
सर्वांगीण नियोजनाद्वारे अत्याधुनिक तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देऊन कापसाची उत्पादकता वाढवण्यासाठी वस्त्रोद्योग मंत्रालय कृषी विभागासह सर्व हितसंबंधितांसोबत सतत कार्यरत असल्याची माहिती दर्शना जरदोश यांनी दिली. देशांतर्गत उद्योगांना कापूस आणि धाग्याचा सुविहीत पुरवठा प्रथम सुनिश्चित करणं गरजेचं आहे. देशात रोजगार निर्मिती करणाऱ्या स्वदेशी उद्योगांना निर्यातीचा फटका बसता कामा नये. शेतकऱ्यांना उत्पादकता वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या: