एक्स्प्लोर

Jayakwadi Dam Water : जायकवाडीच्या पाणी पातळीत वाढ, गाळपेर जमिनीतील पिकं पाण्याखाली, शेतकऱ्यांना फटका

जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीतही (Jayakwadi Dam Water) मोठी वाढ झाली आहे. या धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळं गाळपेर जमिनीतील पिकं पाण्याखाली गेली आहेत.

Jayakwadi Dam Water : राज्याच्या विविध भागात चांगला पाऊस झाला आहे. तर काही ठिकाणी मुसळधार पावसामुळं जनजीवन देखील विस्कळीत झालं आहे. दरम्यान, या पावसामुळं धरणांच्या पाणी साठ्यात मोठी वाढ होत आहे. जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीतही (Jayakwadi Dam Water) मोठी वाढ झाली आहे. या धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्यानं पाण्याच्या फुगवट्यामुळं नगर जिल्ह्यातील गाळपेर जमिनीतील पिकं पाण्याखाली गेली आहेत. याचा राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
 
सलग चौथ्या वर्षी जायकवाडी पूर्ण क्षमतेनं भरण्याच्या मार्गावर

नाशिक आणि परिसरात झालेल्या दमदार पावसामुळं जायकवाडी धरणाच्या पाणी साठ्यात वाढ होत आहे. सलग चौथ्या वर्षी जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेनं भरण्याच्या मार्गावर आहे. सध्या धरणाची पाणीपातळी 82 टक्क्यांवर असून, त्यामुळं शेवगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची गाळपेर जमिनीतील पीकं पाण्याखाली गेली आहेत. शेतकऱ्यांची कापूस, तूर, मूग, बाजरी आणि उडीद ही पिकं पाण्याखाली गेली आहेत. शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या असंपादित जमिनीतील पिकांचं या वर्षी देखील मोठं नुकसान झालं आहे. 

Jayakwadi Dam Water : जायकवाडीच्या पाणी पातळीत वाढ, गाळपेर जमिनीतील पिकं पाण्याखाली, शेतकऱ्यांना फटका

दरवर्षी शेतकऱ्यांना फटका

दरम्यान, मागील तीन वर्षांपासून जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेनं भरत आहे. मागील वर्षी दहिगावने, घेवरी, भावीनिमगाव, शहरटाकळी, ढोरसडे, हिंगणगाव या गावातील शेतकऱ्यांच्या असंपादित शेतातही पाणी येऊन पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. आता यावर्षी देखील शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांमध्ये पाणी शिरलं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे. शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची असंपादित क्षेत्र 117.11 हेक्टर आहे. दरवर्षी तालुक्यातील 16 गावातील 119 शेतकऱ्यांचं जायकवाडीच्या जलफुगवट्यामुळं नुकसान होत असते. मात्र, शासन-प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले होते. 

जून महिन्यात पावसानं दडी मारली होती. मात्र, जुलै महिन्यात बहुंताश महाराष्ट्रात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत देखील झालं होतं. याचबरोब कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात देखील चांगला पाऊस झाला आहे. या पावसामुळं धरणांच्या पाणी साठ्यात झपाट्यानं वाढ होत असल्याचं चित्र दिसत आहे. मात्र, काहीठिकामी शेतकऱ्यांच्या पिकांना फटका बसत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

F-1 Visa : 'स्वतः देश सोडा, नाहीतर...', F-1 व्हिसावर शिकणाऱ्या अमेरिकेत शिकणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना धडकी भरवणारा ईमेल
'स्वतः देश सोडा, नाहीतर...', F-1 व्हिसावर शिकणाऱ्या अमेरिकेत शिकणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना धडकी भरवणारा ईमेल
Pragya Singh Thakur : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा मालेगाव दौरा अखेर रद्द, नेमकं कारण काय?
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा मालेगाव दौरा अखेर रद्द, नेमकं कारण काय?
Hemant Nimbalkar : कर्नाटकात नक्षलींचा बिमोड करणाऱ्या डॅशिंग 'कोल्हापूरकर' आयपीएस हेमंत निबाळकरांना मुख्यमंत्री पदक
कर्नाटकात नक्षलींचा बिमोड करणाऱ्या डॅशिंग 'कोल्हापूरकर' आयपीएस हेमंत निबाळकरांना मुख्यमंत्री पदक
Uk Visa Fee Hike : अमेरिकेनंतर आता ब्रिटनमध्ये सुद्धा जाणं आणि तिथं राहणं महाग झालं! जाणून घ्या तुमच्या व्हिसाची किंमत किती वाढणार?
अमेरिकेनंतर आता ब्रिटनमध्ये सुद्धा जाणं आणि तिथं राहणं महाग झालं! जाणून घ्या तुमच्या व्हिसाची किंमत किती वाढणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Palghar MNS : पालघरमध्ये मनसेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर  Avinash Jadhav यांच्या फोटोला काळं फासलंABP Majha Marathi News Headlines 3 PM Top Headlines 3 PM 30 March 2025 दुपारी 3 च्या हेडलाईन्सAnandache Paan : 'चिंतामणी: एक चिरंतन चिंतन' पुस्तकामागची गोष्ट, गायक पं.सी.आर.व्यास यांचा आयुष्यपटABP Majha Marathi News Headlines 02 PM TOP Headlines 02 PM 30 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
F-1 Visa : 'स्वतः देश सोडा, नाहीतर...', F-1 व्हिसावर शिकणाऱ्या अमेरिकेत शिकणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना धडकी भरवणारा ईमेल
'स्वतः देश सोडा, नाहीतर...', F-1 व्हिसावर शिकणाऱ्या अमेरिकेत शिकणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना धडकी भरवणारा ईमेल
Pragya Singh Thakur : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा मालेगाव दौरा अखेर रद्द, नेमकं कारण काय?
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा मालेगाव दौरा अखेर रद्द, नेमकं कारण काय?
Hemant Nimbalkar : कर्नाटकात नक्षलींचा बिमोड करणाऱ्या डॅशिंग 'कोल्हापूरकर' आयपीएस हेमंत निबाळकरांना मुख्यमंत्री पदक
कर्नाटकात नक्षलींचा बिमोड करणाऱ्या डॅशिंग 'कोल्हापूरकर' आयपीएस हेमंत निबाळकरांना मुख्यमंत्री पदक
Uk Visa Fee Hike : अमेरिकेनंतर आता ब्रिटनमध्ये सुद्धा जाणं आणि तिथं राहणं महाग झालं! जाणून घ्या तुमच्या व्हिसाची किंमत किती वाढणार?
अमेरिकेनंतर आता ब्रिटनमध्ये सुद्धा जाणं आणि तिथं राहणं महाग झालं! जाणून घ्या तुमच्या व्हिसाची किंमत किती वाढणार?
Trimbakeshwar Temple : आता शिर्डीप्रमाणेच त्र्यंबकेश्वर मंदिरात मिळणार बुंदीच्या लाडूचा प्रसाद; देवस्थान ट्रस्टचा निर्णय, गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सुरुवात
आता शिर्डीप्रमाणेच त्र्यंबकेश्वर मंदिरात मिळणार बुंदीच्या लाडूचा प्रसाद; देवस्थान ट्रस्टचा निर्णय, गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सुरुवात
पतंजलीनं आयुर्वेदाला आधुनिक जगाशी जोडलं, प्राकृतिक चिकित्सेला कसं मजबूत बनवलं?
पतंजलीनं आयुर्वेदाला आधुनिक जगाशी जोडलं, प्राकृतिक चिकित्सेला कसं मजबूत बनवलं?
PM Narendra Modi : देश गुलामीत होता, अनेक आक्रमणे आली, पण भारतीय चेतना कधीही संपली नाही; कारण..; पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 10 मुद्दे
देश गुलामीत होता, अनेक आक्रमणे आली, पण भारतीय चेतना कधीही संपली नाही; कारण..; पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 10 मुद्दे
Shirdi News : साईभक्तांना मिळणार पाच लाखापर्यंत विमा संरक्षण; गुढी पाडव्याच्या दिवशी साई संस्थानची मोठी घोषणा, नेमका कुणाला मिळणार लाभ?
साईभक्तांना मिळणार पाच लाखापर्यंत विमा संरक्षण; गुढी पाडव्याच्या दिवशी साई संस्थानची मोठी घोषणा, नेमका कुणाला मिळणार लाभ?
Embed widget