एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Nandurbar News : वादळाने होत्याच नव्हतं केलं, शंभर हेक्टरवरील केळी भुईसपाट, जनावरांना चारा म्हणून...

Nandurbar : नंदुरबार जिल्ह्यात (Nandurbar) चक्रीवादळामुळे केळीचे (Banana Crop) घड खाली पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात (Nandurbar) आलेल्या वादळाचा (Hurricane) सर्वाधिक फटका केळी बागांना बसला असून काढणीसाठी आलेले केळीचे (Banana Crop) घड खाली पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जमीनदोस्त झालेली केळी खरेदी करण्यासाठी व्यापाऱ्यांनी असमर्थता दाखवल्यानंतर शेतकऱ्यांनी केळी गुरांना चारा म्हणून टाकली आहेत. एकट्या शहादा तालुक्यात जवळपास शंभर हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील केळी पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

राज्यभरात मान्सूनपूर्व पावसाने (Rain) हजेरी लावल्याने अनेक भागात शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विजांच्या गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळतो आहे. यामुळे ऐन भरात आलेल्या पिकांचे नुकसान होत आहे. अशातच काल नाशिकसह (Nashik) पालघर, धुळे, जळगाव आदी भागात पावसाने हजेरी लावली. नंदुरबार जिल्ह्यालाही (Nandurbar District) पावसाने झोडपून काढले. जिल्ह्यातील शहादा तालुक्यात आलेल्या वादळाने केली पिकाचे मोठे नुकसान केले आहे. जवळपास शंभर हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील केळी पिकांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.  आहे. 

जळगावसह नंदुरबार, धुळे (Dhule) जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर केळी पिकाचे उत्पादन घेतले जाते. मात्र यंदा अवकाळी पावसाने शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अशातच आता मान्सूनच्या तोंडावर मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची मेहनत वाया गेली आहे. शेतकऱ्यांनी रक्ताचे पाणी करून उत्पादित केलेली केळी ऐन काढणीच्या वेळेस आलेल्या वादळात उद्धवस्त झाली आहे. वादळ इतके भीषण होते की शेकडो हेक्टरवरील केळीच्या बागा उद्धवस्त झाल्या आहेत. शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही निघणार नसल्याची परिस्थिती आहे. तर वादळामुळे पडलेल्या केळीला खरेदी करण्यासाठी व्यापारी पुढे येत नसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. वादळात नुकसान झालेली केळी व्यापारी खरेदी करत नसल्याने शेतकऱ्यांनी ती जनावरांना चारा म्हणून टाकण्यास सुरुवात केली आहे. 

पिक जनावरांना टाकण्याची वेळ 

पशुपालक दीपक भरवाड म्हणाले कि, अचानक आलेल्या वादळामध्ये मोठ्या प्रमाणात केळीचे नुकसान झाले असून केळी व्यापारी खरेदी करत  नसल्याने शेतकऱ्यांनी आम्हाला बोलावून केळी चाऱ्यासाठी जनावरांना दिली आहे. माझ्याकडे चाळीस ते पन्नास जनावरे असून त्यांचे पाच ते सहा दिवसाच्या चाऱ्याची व्यवस्था झाली आहे. निसर्गाच्या कृपेमुळे बारा महिने राबराब राबवून पिकवलेल्या पिक जनावरांना टाकण्याची वेळ नंदुरबार जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांवर आले आहे आता तरी मायबाप सरकारने केळी उत्पादक शेतकऱ्यांना ठोस मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rashtriya Swayamsevak Sangh : राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही ठरवलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावेत!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही ठरवलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावेत!
भाजपच्या सर्वच विजयी उमेदवारांची यादी; 132 आमदार विधानसभेत, कोणत्या मतदारसंघात कोण?
भाजपच्या सर्वच विजयी उमेदवारांची यादी; 132 आमदार विधानसभेत, कोणत्या मतदारसंघात कोण?
Maharashtra Assembly Election Result 2024 : उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत एकमेव मुस्लीम शिलेदार दिला, महायुतीच्या मतांच्या चक्रीवादळात जिंकला की हरला?
उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत एकमेव मुस्लीम शिलेदार दिला, महायुतीच्या मतांच्या चक्रीवादळात जिंकला की हरला?
Devendra Fadnavis : सत्तास्थापनेपूर्वी नवा ट्विस्ट, अजितदादा गटाचे आमदार मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देण्याच्या तयारीत
सत्तास्थापनेपूर्वी नवा ट्विस्ट, अजितदादा गटाचे आमदार मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देण्याच्या तयारीत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule Full PC : विधानसभा निवडणूक संपताच भाजपच्या सदस्यता नोंदणीला प्रारंभ होणारMaharashtra Assembly Seat Sharing : महाराष्ट्राच्या नव्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी ?Prakashrao Abitkar : जनता माझ्यासोबत असल्यानंच माझा विजय - प्रकाश आबिटकरABP Majha Headlines :  2 PM : 24 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rashtriya Swayamsevak Sangh : राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही ठरवलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावेत!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही ठरवलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावेत!
भाजपच्या सर्वच विजयी उमेदवारांची यादी; 132 आमदार विधानसभेत, कोणत्या मतदारसंघात कोण?
भाजपच्या सर्वच विजयी उमेदवारांची यादी; 132 आमदार विधानसभेत, कोणत्या मतदारसंघात कोण?
Maharashtra Assembly Election Result 2024 : उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत एकमेव मुस्लीम शिलेदार दिला, महायुतीच्या मतांच्या चक्रीवादळात जिंकला की हरला?
उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत एकमेव मुस्लीम शिलेदार दिला, महायुतीच्या मतांच्या चक्रीवादळात जिंकला की हरला?
Devendra Fadnavis : सत्तास्थापनेपूर्वी नवा ट्विस्ट, अजितदादा गटाचे आमदार मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देण्याच्या तयारीत
सत्तास्थापनेपूर्वी नवा ट्विस्ट, अजितदादा गटाचे आमदार मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देण्याच्या तयारीत
Maharashtra Assembly Election Results 2024: बालेकिल्ल्यात महायुतीचंच पारडं जड! छत्रपती संभाजीनगरचे आमदार कोण? वाचा मतदारसंघनिहाय संपूर्ण यादी
बालेकिल्ल्यात महायुतीचंच पारडं जड! छत्रपती संभाजीनगरचे आमदार कोण? वाचा मतदारसंघनिहाय संपूर्ण यादी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळणार? तानाजी सावंतांना मंत्रीपदाची लॉटरी लागणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळणार? तानाजी सावंतांना मंत्रीपदाची लॉटरी लागणार
MLA List Maharashtra 2024 : महाराष्ट्रातील सर्व 288 आमदारांची यादी 2024, जिल्हानिहाय आमदारांची नावे, कोणत्या पक्षाला किती जागा?
महाराष्ट्रातील सर्व 288 आमदारांची यादी, जिल्हानिहाय आमदारांची नावे, कोणत्या पक्षाला किती जागा?
Pune Paschim Assembly Election Winner List 2024 : कोल्हापूर, साताऱ्यातून काँग्रेस हद्दपार, सांगलीत फक्त एक; पश्चिम महाराष्ट्रातील 58 आमदारांची यादी एकाच ठिकाणी
कोल्हापूर, साताऱ्यातून काँग्रेस हद्दपार, सांगलीत फक्त एक; पश्चिम महाराष्ट्रातील 58 आमदारांची यादी एकाच ठिकाणी
Embed widget