Grapes: पावसामुळे द्राक्षाचा हंगाम लांबणार? द्राक्षांच्या निर्यात धोरणांमुळे शेतकरी त्रस्त
महाराष्ट्रातून उदयोग इतर राज्यात गेल्याने राजकरण आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा द्राक्ष उत्पदकांचे प्रश्न समस्या सोडावाव्या एवढीच अपेक्षा शेतकरी करत आहे.
नाशिक: नाशिक जिल्ह्यातील पावसाने दहा बारा दिवसापूर्वी माघार घेतली. मात्र आपल्या पाऊलखुणा शेतातील पाण्याच्या रूपाने आजही कायम आहत. पाण्याचा निचरा होत नसल्यानं आजही जिल्ह्यातील अनेक शेतात पाणी आहे. परिणामी शेतीकामे रखडली आहे, दरवर्षी साधारणपणे सप्टेंबर अखेरपर्यंत पाऊस थांबतो आणि ऑक्टोबर महिन्यातंय द्राक्ष बागांच्या छाटणीला सुरवात होते. आत नोव्हेंबर एक दिवसावर आला तरीही अनेक शेतात छाटणीला सुरवात झाली नाही तर काही शेतकऱ्यांनी नुकतीच छाटणी हाती घेतली आहे. ऐन थंडीत छाटणी होत असल्यानं द्राक्ष मण्यांची फुगवण होणार नाही, रोगराई पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे आतापासूनच औषध फवारणीला सुरवात झाली असून खर्चही वाढत आहे. रेंगाळलेला पाऊस आणि लवकर पडलेली थंडी यामुळं द्राक्ष हंगाम एक दीड महिना पुढे ढकलला गेला आहे .त्यामुळे द्राक्ष चाखण्यासाठी वेळ तर लागेलच पण शेतरक्यांचं मालाला भावही मिळणार नाहीये.
अस्मानी आणि सुलतानी संकटावर मात करून शेतकरी आतंरराष्ट्रीय बाजारपेठेत चिली, दक्षिण आफ्रिका, पेरू, इजिप्त या देशांना आव्हान देतो. मात्र राज्य आणि केंद्र सरकराचे पाठबळ कमी पडते. निर्यातीला पोषक धोरण नसल्यानं त्याचा फटका द्राक्ष उत्पादकांना बसतोय. युरोपमध्ये द्राक्ष निर्यात करतांना इतर देशांना शून्य टक्के ड्युटी लागते तर भारताकडून आठ टक्के वसूल केली जाते. मागील वर्षी बांगलादेशाने इम्पोर्ट ड्युटी किलोमागे 50 रुपयांवरून 70 रुपये वाढविल्याने सीमा भागातच द्राक्षे फेकून देण्याची वेळ आली होती.
चीन, रशिया, युक्रेन या देशात मागील वर्षी निर्यात झाली नाही. असे संकट एकामागोमाग एक येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातून उदयोग इतर राज्यात गेल्याने राजकरण आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा द्राक्ष उत्पदकांचे प्रश्न समस्या सोडावाव्या एवढीच अपेक्षा शेतकरी करत आहे. नवनवीन पेटंट सरकारने शोधण्याची गरज आहे. परकीय चलन मिळवून देण्याची ताकद महाराष्ट्रात असताना इतर देशातील फळ आपल्याकडे येतात आणि आपली फळ बाजूला पडतात अशी खंत शेतकरी व्यक्त करतोय.
- 1960 नंतर एकही नवीन द्राक्षाची जात आपण शोधली नाही
- नवीन पेटंट व्हरायटी आणू शकलो नाही
- थॉमसन या एकमेव जातीच्या सोनाका, माणिकचमन, शरद सीडलेस अशा पोट जाती सध्या आहेत
- राज्यात साधारणपणे चार लाख एकर क्षेत्रावर द्राक्ष पीक घेतले जाते.
- नाशिकव्यतिरिक बारामतीजवळील बोरी, सांगली, सोलापूर या भागातही द्राक्षाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते.
- वर्षभर प्रत्येक एका एकराला शेतकरी व्यतिरिक्त दोन मजूर जरी पकडले तरी आठ लाख रोजगार होतो.
- ज्यावेळी छाटणी, हार्वेस्टिंगचा हंगाम असतो त्यावेळी हीच संख्या तिपटीने वाढते
- या व्यतिरिक्त खत, औषध कम्पनी विक्रेते, दळणवळण व्यवस्था या सर्वांचा सहभाग बघता शकडो कटींची उलाढाल होत असते.
पळत्याच्या मागे धावण्यापेक्षा आपल्या शेतीला, शेतीपूरक उद्योगांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. हंगाम सुरु होण्याच्या आधीच जर सरकारने लक्ष घातले तर आनंदाचा शिधा देऊन दिवाळी गोड करण्यापेक्षा शेतकऱ्यांचे आपल्या श्रमाचे मोल मिळाल्यानेच त्यांचे आयुष्य रसरशीत द्राक्षाप्रमाणे गोड होण्यास वेळ लागणार नाही.