Nandurbar sowing : नंदूरबार जिल्ह्यात समाधानकारक पाऊस, 71 टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण
नंदूरबार जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळं पेरणीच्या कामांना वेग आला आहे.
Nandurbar sowing : राज्यात विविध ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे. या पावसामुळं शेतीच्या कामांना चांगलाच वेग आला आहे. राज्यात बऱ्यापैकी क्षेत्रावर पेरणी झाली आहे. दरम्यान, नंदूरबार जिल्ह्यातही समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळं पेरणीच्या कामांना वेग आला आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत 71 टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. यामध्ये सर्वाधिक क्षेत्रावर सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे.
दरम्यान, राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. मात्र, काही ठिकाणी शेती पिकांसाठी हा पाऊस फायद्याचा ठरला आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी केली आहे. त्यांच्या पिकांसाठी हा पाऊस फायद्याचा ठरला आहे. नंदूरबार जिल्ह्यात जून महिन्यात पेरणीयोग्य पाऊस नसल्यानं पेरण्या रखडल्या होत्या. शेतकऱ्यांना समाधानकारक पावसाची प्रतीक्षा होती. मात्र, गेल्या आठवडाभरापासून झालेल्या दमदार पावसामुळं पेरण्यांना वेग आला आहे. नंदूरबार जिल्ह्यात यावर्षी तीन लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते, त्यापैकी 2 लाख 9 हजार 724 क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. एकूण निर्धारित क्षेत्राच्या पेरणीचं लक्षांक पूर्ण होणार आहे.
कापसाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता
यावर्षी कापसाबरोबरच सोयाबीनची देखील मोठ्या प्रमाणावर पेरणी करण्यात आली आहे. निर्धारित क्षेत्रात यावर्षी संपूर्ण पेरणी पूर्ण होणार आहे. आठवडाभरात झालेल्या पावसामुळे नवापूर तळोदा अक्कलकुवा तालुक्यात भात लागवडीला वेग आला आहे. यावर्षी कापसाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता कृषी विभागाच्या वतीने व्यक्त केली आहे.
नंदूरबार जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या पेरणीची टक्केवारी
नंदुरबार जिल्ह्यात खरीप हंगामासाठी जिल्ह्यात 71 टक्के पेरणी पूर्ण
दोन लाख 09 हजार 724 क्षेत्रावर पेरणी झाली आहे
सोयाबीन पेरणीची टक्केवारी 87 टक्के
भात पेरणीची टक्केवारी 55 टक्के
कापूस पेरणीच्या टक्केवारी 86.06 टक्के
मका पेरणीच्या टक्केवारी 66.74 टक्के
ज्वारी पेरणीच्या टक्केवारी 56.48 टक्के
राज्यातील बहुंताश भागात चांगला पाऊस झाल्यानं शेतीच्या कामांना वेग आला आहे. शेतकऱ्यांना बऱ्यापैकी पेरणीची कामं पूर्ण केली आहे. जून महिन्यात पावसानं दांडी मारली होती. मात्र, जुलै महिन्यात सुरुवातीपासूनचं पावसाचा जोर वाढल्याचे पाहायला मिळालं.
महत्त्वाच्या बातम्या: